PM USP Scholarship yojna 2026: १२वी नंतर केंद्र सरकारची स्लॉलरशिप, पात्रता, रक्कम आणि संपूर्ण माहिती.

भावांनो समजा तुमच्या घरात बारावी उत्तीर्ण झालेला मुलगा असो किंवा मुलगी तुमची घरची परिस्थिती सामान्य आहे. पुढे शिकायचं आहे पण फी कुठून आणायची हा प्रश्न आहे. अशा वेळी जर कोणी सांगितलं की सरकार तुम्हाला दरवर्षी २० हजार रुपये थेट बँक खात्यात देतं तर तुम्ही विश्वास ठेवाल का?

बहुतेक नाही ठेवणार. पण हे खरं आहे. भारत सरकारने PM USP Scholarship yojna 2026 या नावाने एक मोठी स्लॉलरशिप योजना सुरू केली आहे. दरवर्षी देशभरातील 82 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पण दुर्दैवाने खूप कमी विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती असते. आणि माहिती नसल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थी या संधीपासून वंचित राहतात.

त्यामुळे आज मी तुम्हाला PM USP Scholarship yojna 2026 ची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे तुमच्या घरात शेजारी नातेवाईकांमध्ये कोणी बारावीनंतर शिक्षण घेत असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत आठवणीनं पाठवा.

PM USP Scholarship yojna 2026 म्हणजे नक्की काय? हे पण समजून घेऊया.

PM USP म्हणजे Pradhan Mantri Uchchatar Shiksha Protsahan आणि CSSS म्हणजे Central Sector Scheme of Scholarship for College and University Students भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ही योजना सुरू केली आहे.

आता तुम्हाला जर सांगायचं तर बारावीत चांगले मार्क्स मिळवलेल्या पण घरची परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे शिकता यावं यासाठी सरकार दरवर्षी थेट बँक खात्यात पैसे देतं. कोणाकडे जायची गरज नाही कोणाला विनंती करायची गरज नाही. फक्त अर्ज करायचा आणि पैसे थेट खात्यात येतात.

ही स्लॉलरशिप नक्की कोणा कोणासाठी आहे?

आता सगळ्यात आधी हे समजून घेऊया. ही स्लॉलरशिप फक्त महाराष्ट्रासाठी नाही. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी आहे. महाराष्ट्र असो गुजरात असो उत्तर प्रदेश असो बिहार असो सगळ्या राज्यांतील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. CBSE असो ICSE असो किंवा राज्य मंडळ असो कोणत्याही बोर्डातून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत.

आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत 50% शिष्यवृत्त्या फक्त मुलींसाठी राखीव आहेत. म्हणजे मुलींना उच्च शिक्षणासाठी खूप मोठी संधी आहे. हा सरकारचा खूप चांगला निर्णय आहे.

कोणत्या अभ्यासक्रमांसाठी ही स्लॉलरशिप मिळते?

आता तुम्ही विचारणार की कोणत्या अभ्यासक्रमांसाठी ही स्लॉलरशिप मिळते? तर खाली पूर्ण यादीच बघूया.

PM USP Scholarship yojna 2026 या योजनेत BA असेल BCom असेल BSc असेल BBA असेल BCA असेल MA असेल MCom असेल MSc असेल BTech असेल BE असेल MBBS असेल आणि इतर व्यावसायिक education घेण्यासाठी असेल तर तुम्ही या स्लॉलरशिप पात्र आहात.

पण एक महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही वारंवार म्हणजे प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन शिक्षण घेत असणं हे आवश्यक आहे.

कोणते विद्यार्थी पात्र नाहीत? हे पण आधी जाणून घ्या.

हे खूपच महत्त्वाचं आहे कारण अनेक विद्यार्थी हे न वाचता अर्ज करतात आणि नंतर अर्ज नाकारला जातो. distance education करणारे विद्यार्थी पात्र नाहीत. केवळ डिप्लोमा करणारे विद्यार्थी पात्र नाहीत. आधीच दुसरी स्लॉलरशिप घेणारे विद्यार्थी पात्र नाहीत. फी परताव्याच्या योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी पण पात्र नाहीत.

या स्लॉलरशिप साठी पात्रता काय आहे? हे खाली बघूया.

आता एक एक मुद्दा नीट समजून घेऊया.पहिली अट म्हणजे बारावीत वरच्या 20% मधे असणं आवश्यक आहे याचा अर्थ नेमका 80th Percentile च्या वर असणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या बोर्डात जेवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी वरच्या 20 टक्क्यांत तुम्ही असणं हे गरजेचं आहे.

दुसरी अट म्हणजे तुम्ही मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठात रेग्युलर प्रवेश घेतलेला असावा.

तिसरी अट म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सर्व मार्गांनी मिळून 4.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. हे प्रमाणपत्र तहसीलदार किंवा संबंधित शासकीय कार्यालयातून काढता येतं.

या स्लॉलरशिप मधे नक्की किती पैसे मिळतात?

आता सगळ्यात महत्त्वाच पदवीच्या म्हणजेच BA, BCom, BSc, BBA, BCA सारख्या अभ्यासक्रमांच्या पहिल्या तीन वर्षांसाठी दरवर्षी 12 हजार रुपये मिळतात. म्हणजे तीन वर्षांत एकूण 36 हजार रुपये मिळतात.

आता एक उदाहरण घेऊया. समजा सागरने BCom ला एडमिशन घेतला आहे. त्याला दरवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे तीन वर्षांत एकूण 36 हजार रुपये मिळतात. सागराच्या घरी दरमहा 1000 रुपये येतात म्हणजे फी आणि पुस्तकांचा मोठा भाग यातूनच निघतो.

पदवीच्या पुढचं शिक्षण म्हणजेच MA, MCom, MSc करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 20 हजार रुपये मिळतात.

BTech किंवा BE करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन वर्षांसाठी दरवर्षी 12 हजार रुपये आणि चौथ्या वर्षी 20 हजार रुपये मिळतात. म्हणजे संपूर्ण इंजिनिअरिंगमध्ये एकूण 56 हजार रुपयांपर्यंत फायदा होतो.

5 वर्षांचे व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षी 20 हजार रुपये आणि पाचव्या वर्षी 20 हजार रुपये मिळतात.

हे सगळे पैसे थेट DBT म्हणजेच Direct Benefit Transfer द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.

या स्लॉलरशिप साठी आरक्षण मिळतं का?

तर होय. या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या आरक्षण धोरणानुसार लाभ दिला जातो. SC साठी 15%, ST साठी 7.5% OBC साठी 27% आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5% आरक्षण आहे. म्हणजे समाजातील सगळ्या घटकांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळते.

विद्यार्थ्यांना स्लॉलरशिप मिळाल्यानंतर कोणत्या अटी पाळाव्या लागतात? चला बघूया

मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे. एकदा स्लॉलरशिप मिळाली की ती ऑटोमैटिक पुढे सुरू राहत नाही.

दरवर्षीच्या परीक्षेत किमान 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. कॉलेजमध्ये किमान 75% उपस्थिती असणं आवश्यक आहे. रॅगिंग शिस्तभंग किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी आढळल्यास स्लॉलरशिप रद्द होऊ शकते.

म्हणजे स्लॉलरशिप मिळाली म्हणून निवांत बसायचं नाही. दरवर्षी अभ्यास करायचा उत्तीर्ण व्हायचं आणि renew करायचं तरच स्लॉलरशिप सुरू राहते.

कॉलेज बदललं तर मिळणारी स्लॉलरशिप बंद होते का?

अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो. तर उत्तर आहे नाही. तुम्ही कॉलेज बदलू शकता. पण अभ्यासक्रम तोच असावा आणि नवीन कॉलेजकडे वैध AISHE Code असावा. या दोन अटी पूर्ण झाल्या तर स्लॉलरशिप सुरू राहते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो अनेकांना माहीत नसतो.

मित्रांनो महत्त्वाची गोष्ट या स्लॉलरशिप साथी अर्ज कसा करायचा?

मित्रांनो अनेकांना वाटतं सरकारी स्लॉलरशिप साठी अर्ज करणं म्हणजे खूप अवघड असतं. पण हे खूप सोपं आहे.

सर्वात आधी National Scholarship Portal म्हणजेच NSP वर जायचं. तिथे ऑनलाइन अर्ज भरायचा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची.

अर्ज केल्यानंतर पडताळणी दोन टप्प्यांत होते. पहिल्या टप्प्यात तुमचं कॉलेज अर्जाची डेटेल चेक करतं. दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून अंतिम पडताळणी होते. त्यानंतर निवड झाल्यावर DBT द्वारे थेट बँक खात्यात पैसे येतात.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जाची शेवटची तारीख जाहीर झाली की लगेच अर्ज करा. उशीर केल्यास संधी जाऊ शकते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

ही कागदपत्रे आधीच तयार ठेवायला पाहिजे म्हणजे वेळ आली की लगेच अर्ज करता येईल. बारावीचा रिसल्ट लागेल. कुटुंबाचं उत्पन्न प्रमाणपत्र लागेल. मान्यताप्राप्त कॉलेजचं प्रवेश पत्र लागेल. आधार कार्ड लागेल. बँक खात्याची माहिती लागेल. जातीचा दाखला लागू असल्यास लागेल. पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल.

या योजनेच्या महत्त्वाच्या लिंक्स

Official Scheme Guidelinesलिंक
National Scholarship Portal लिंक

PM USP Scholarship yojna 2026 या स्लॉलरशिप चे पैसे जमा झाले की नाही हे कसं तपासायचं?

हे पण खूप सोपं आहे. PFMS संकेतस्थळावर जाऊन तुमची स्लॉलरशिप रक्कम तपासता येते. यासाठी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा NSP अर्ज क्रमांक वापरता येतो. म्हणजे पैसे आले की नाही हे घरी बसून तपासता येतं.

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

अर्ज वेळेत भरा. उत्पन्न प्रमाणपत्र योग्य असावं. बँक खाते विद्यार्थ्याच्याच नावावर असावं. कॉलेजची माहिती अचूक भरावी. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती देऊ नये नाहीतर अर्ज नाकारला जाऊ शकतो. नूतनीकरण अर्ज वेळेत करावा.

थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो.

ही शिष्यवृत्ती भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे. बारावीत वरच्या 20% असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. कुटुंबाच्या उत्पन्नाची मर्यादा 4.5 लाख रुपये प्रत्येक वर्षी आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळतात. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी 20 हजार रुपये मिळतात. देशभरात दरवर्षी 82 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. 50% शिष्यवृत्त्या मुलींसाठी राखीव आहेत. अर्ज NSP संकेतस्थळावर ऑनलाइन करायचा आहे. पैसे DBT द्वारे थेट बँक खात्यात येतात.

या स्लॉलरशिप चा निष्कर्ष समजून घेऊ.

PM USP Scholarship yojna 2026 ही बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत पण गुणवंत विद्यार्थ्यांना या स्लॉलरशिप मोठा आधार मिळतो. दरवर्षी हजारो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.

जर तुम्ही नुकतेच बारावी उत्तीर्ण झाला असाल घरचं वार्षिक उत्पन्न 4.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही नियमित पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असेल तर PM USP Scholarship yojna 2026 साठी आजच NSP संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा.

आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहितच आहे. तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये गावात कोणी बारावीनंतर शिक्षण घेत असेल त्यांना ही पोस्ट नक्की पाठवा. एखाद्या विद्यार्थ्याला स्लॉलरशिप मिळवून द्यायला तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

PM USP Scholarship yojna 2026 म्हणजे काय?

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली ही एक स्लॉलरशिप योजना आहे ज्यात बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते.

या स्लॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किती आहे?

कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 4.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.

पदवीच्या विद्यार्थ्यांना किती स्लॉलरशिप मिळते?

पदवीच्या पहिल्या तीन वर्षांसाठी दरवर्षी 12000 रुपये मिळतात.

योजनेत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना किती स्लॉलरशिप मिळते?

पदव्युत्तर शिक्षणासाठी दरवर्षी 20000 रुपये मिळतात.

या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

National Scholarship Portal म्हणजेच NSP वर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

स्लॉलरशिप पुढे सुरू राहण्यासाठी काय करायला लागतं?

PM USP Scholarship yojna 2026 या योजनेत दरवर्षी किमान 50 टक्के गुण मिळवणं आणि 75 टक्के उपस्थिती असणं आवश्यक आहे.

स्लॉलरशिप साठी पैसे कसे मिळतात?

DBT म्हणजेच Direct Benefit Transfer द्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा होतात.

दरवर्षी किती विद्यार्थ्यांना स्लॉलरशिप मिळते?

देशभरात दरवर्षी सुमारे 82000 विद्यार्थ्यांना नवीन शिष्यवृत्ती दिली जाते.

मुलींसाठी विशेष तरतूद या योजनेत आहे का?

मुलींसाठी विशेष तरतूद आहे का? होय. एकूण स्लॉलरशिप पैकी 50 टक्के स्लॉलरशिप मुलींसाठी राखीव आहेत.

कॉलेज बदललं तर स्लॉलरशिप बंद होते का?

नाही. अभ्यासक्रम तोच असेल आणि नवीन कॉलेजकडे वैध AISHE Code असेल तर शिष्यवृत्ती सुरू राहते.

Leave a Comment