आमच्याबद्दल (About Us)

नमस्कार मित्रांनो,

MajhiExam.in वर तुमचं मनापासून स्वागत! मी तेजस्विनी भोसले गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील सामान्य लोकांपर्यंत सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि परीक्षांची माहिती सोप्या मराठी भाषेत पोहोचवण्याचं काम करते आहे.

ही वेबसाईट सुरू का केली?

आपल्या राज्यात आणि केंद्रात दरवर्षी शेकडो योजना, शिष्यवृत्ती योजना आणि परीक्षांच्या जाहिराती निघतात. पण खरी अडचण अशी असते की या सगळ्या माहितीचा घोळ इतका असतो की सामान्य माणसाला नक्की आपण पात्र आहोत की नाही, अर्ज कसा करायचा, कागदपत्रं कोणती लागतील हेच कळत नाही. आणि याच गोंधळात अनेकांचा हक्काचा फायदा हुकतो.

म्हणून मी MajhiExam.in सुरू केली. इथे प्रत्येक योजना, प्रत्येक परीक्षेची माहिती अगदी घरगुती भाषेत, तुमच्या शेजारच्या मैत्रिणीने सांगावी अशा पद्धतीने दिली जाते. पात्रता काय, कागदपत्रं कोणती, अर्ज कुठे आणि कसा करायचा हे सगळं एका जागी.

इथे तुम्हाला काय मिळेल?

महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची अद्ययावत माहिती, केंद्र सरकारच्या विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांसाठीच्या योजना, स्पर्धा परीक्षा आणि भरतीसंबंधी माहिती, तसंच शिष्यवृत्ती आणि अनुदान योजनांचं सविस्तर मार्गदर्शन इथे नियमित दिलं जातं. प्रत्येक लेख शासन निर्णय (GR) आणि अधिकृत स्रोतांचा आधार घेऊनच लिहिला जातो.

माहितीची विश्वासार्हता

MajhiExam.in वरची माहिती अधिकृत शासकीय संकेतस्थळं, शासन निर्णय आणि सरकारी जाहिरातींच्या आधारे तयार केली जाते. तरीही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित शासकीय पोर्टलवर एकदा खात्री करून घेण्याची विनंती आहे, कारण योजनांचे नियम आणि तारखा वेळोवेळी बदलू शकतात.

एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट सांगते की MajhiExam.in ही कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत वेबसाईट नाही. आम्ही फक्त माहिती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कोणतेही अर्ज इथून स्वीकारले जात नाहीत किंवा कोणत्याही सरकारी प्रक्रियेशी आमचा थेट संबंध नाही.

संपर्क करा

तुम्हाला एखादी योजना कव्हर करून हवी असेल, माहितीत काही चूक आढळली असेल, किंवा फक्त बोलायचं असेल तरी बिनधास्त संपर्क करा:

📧 majhiexam@gmail.com
🌐 majhiexam.com/contact-us/

तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांमुळेच ही वेबसाईट अधिक चांगली होत जाते. भेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

— तेजस्विनी भोसले, MajhiExam.in