भावांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझ्या ओळखीमध्ये एक मुलगा आहे जो की जळगाव जवळच्या एका छोट्या गावात राहत होत. त्याच्या घरची परिस्थिती ही खूप बेताची होती पण 12वी मधे त्याला चांगले मार्क्स देखील मिळाले होते. त्याने Mechanical इंजिनिअरिंग ला एडमिशन घेतलं. पण त्याच्या कॉलेज ची फी भरायला पैसे नाहीत या कारणामुळे Engineering सोडण्याचा त्याने विचार केला होता आणि घरात त्याचे आई वडील दोघेही शेती करतात आणि एक दिवस त्याच्या कॉलेज च्या नोटिस बोर्ड वर त्याला AICTE YASHASVI Scholarship 2026 बद्दल कळलं. त्याने अर्ज केला आणि दरवर्षी 50 हजार रुपये स्लॉलरशीप मिळायला लागली. आज तो Engineer आहे आणि नोकरी करतोय.
त्यामुळे मी यब्बदलाची सर्व माहिती सांगणार आहे म्हणजे तुमच्या घरात शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये कोणी इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाचं शिक्षण घेत असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण ही माहिती त्यांच्या खूप जास्त कामात येणार आहे.
AICTE YASHASVI Scholarship 2026 म्हणजे नक्की काय? हे पण समजून घेऊया.
आजच्या नवीन AI च्या काळात इंजिनिअरिंग सारख्या कोर्सचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. फी म्हणा वसतिगृह म्हणा पुस्तके किंवा सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार केला तर खूप खर्च होतो. अनेक हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन AICTE म्हणजेच All India Council for Technical Education यांनी YASHASVI ही स्लॉलरशिप योजना सुरू केली आहे.
यात YASHASVI म्हणजे Young Achievers Scholarship and Holistic Academic Skills Venture Initiative. ही योजना 2024, 25 या वर्षापासून सुरू झाली. या योजनेचा प्रमुख उद्देश इंजिनिअरिंगच्या महत्त्वाच्या कोर्सेस मधे शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.
आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे इंजिनिअरिंग फिल्ड सोडावी लागू नये या कारणामुळे सरकार दरवर्षी थेट बँक खात्यात स्लॉलरशिप टाकत असते. आणि ते पण एक दोन हजार नाही तर तब्बल 50 हजार रुपयांपर्यंत विद्यार्थ्यांना मदत होते.
या शिष्यवृत्तीचा प्रमुख उद्देश काय आहे? हे लक्षात घेऊ.
आता हे नीट समजून घेऊया. आपल्या देशातील उत्पादन व्यवसाय आणि टेक्निकल क्षेत्राच्या विकासात इंजिनिअरिंग च मोठं योगदान आहे. पण गेल्या काही वर्षांत विद्यार्थी या कडे कमी वळत आहेत. ज्यात आर्थिक अडचण हे एक मोठं कारण आहे. म्हणूनच AICTE ने हे पाऊल उचललं आणि AICTE YASHASVI Scholarship 2026 सुरू केली
खाली या आपण योजनेचे मुख्य उद्देश दिले आहेत. इंजिनिअरिंगच्या महत्त्वाच्या फिल्ड मधे शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. आर्थिक अडचणींमुळे इंजिनिअरिंग सोडावी लागू नये यासाठी पाठबळ देणे. देशातील टेक्निकल क्षेत्र आणि उत्पादन व्यवसायासाठी चांगले इंजिनिअर तयार करणे. गरजू पण हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाची महत्त्वाची संधी मिळवून देणे.
या स्लॉलरशिप चा फायदा कोणत्या कोणत्या शाखांच्या विद्यार्थ्यांना मिळतो? चला समजून घेऊ
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट. ही स्लॉलरशिप सर्व इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी नाही. AICTE ने काही महत्त्वाच्या शाखा ठरवल्या आहेत. त्या खाली बघूया.
Civil Engineering असेल, Chemical Engineering असेल, Electrical Engineering असेल, Electronics and Communication Engineering असेल, Mechanical Engineering असेल, Agriculture Engineering असेल किंवा Textile Technology असेल तर तुम्ही या स्लॉलरशिप पात्र आहात.
उदाहरण म्हणजे समजा एका मित्राने Mechanical Engineering ला प्रवेश घेतला आहे आणि घरचं उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे तर तो या शिष्यवृत्तीसाठी नक्की पात्र ठरतो. पण जर कोणी Computer Science किंवा IT शाखेत शिकत असेल तर मात्र त्यांना या स्लॉलरशिप लाभ मिळत नाही हे लक्षात असू द्या.
या स्लॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे?
पहिली अट म्हणजे तुमच कॉलेज हे AICTE मान्यताप्राप्त असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ज्या संस्थेत शिकता ती AICTE ने मान्यता दिलेली असली पाहिजे. तुमचं कॉलेज AICTE ने मान्यता दिलेलं आहे की नाही हे तुम्हाला AICTE च्या संकेतस्थळावर जाऊनसुधा तपासता येतं.
दुसरी अट तुम्ही इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात असणं आवश्यक आहे. किंवा Lateral Entry द्वारे दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतलेलं असणं आवश्यक आहे.
तिसरी अट म्हणजे तुमच्या कुटुंबाचं प्रटेक वर्षाच उत्पन्न सर्व मिळून 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कडून मिळालेलं खार उत्पन्न प्रमाणपत्र असाव लागतं. हे प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलदार किंवा संबंधित शासकीय कार्यालयातून मिळून जाईल.
चौथी अट म्हणजे पात्रता परीक्षेनंतर आणि प्रवेशाच्या वर्षामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावं आणि जर जास्त अंतर असेल तर तुम्ही पात्र ठरणार नाही. म्हणून बारावी झाल्यावर लगेच इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या स्लॉलरशिपचा जास्त फायदा होतो.
या स्लॉलरशिप विद्यार्थ्यांना किती पैसे मिळतात?
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रतेक वर्षी 50 हजार रुपये स्लॉलरशिप मिळते. पहिल्या वर्षापासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 4 वर्षे म्हणजेच एकूण 2 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळतो. Lateral Entry च्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 वर्षे म्हणजेच एकूण 1.5 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळतो.
उदाहरण म्हणजे पूजाने Civil Engineering च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला आहे. तिला दरवर्षी 50 हजार रुपये प्रमाणे 4 वर्षांसाठी म्हणजे एकूण 2 लाख रुपयांची मदत मिळू शकते. म्हणजे संपूर्ण इंजिनिअरिंगमध्ये तिला आर्थिक काळजी नाही. फीचा एक मोठा भाग या शिष्यवृत्तीतून निघतो.
डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 30 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. पहिल्या वर्षापासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 वर्षे म्हणजेच एकूण 90 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळतो. Lateral Entry विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 2 वर्षे म्हणजेच एकूण 60 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळतो.
उदाहरण म्हणजे अमोलने Electrical Engineering डिप्लोमाला प्रवेश घेतला आहे. त्याला दरवर्षी 30 हजार रुपये प्रमाणे 3 वर्षांसाठी म्हणजे एकूण 90 हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. म्हणजे डिप्लोमा करताना आर्थिक अडचण खूपच कमी होते.
आता हे पैसे थेट DBT म्हणजेच Direct Benefit Transfer द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.
यात एकूण किती स्लॉलरशिप मिळतात?
मित्रांनो AICTE YASHASVI Scholarship 2026 या योजनेत प्रत्येक वर्षाला देशभरात एकूण 5200 शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्यापैकी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 2593 आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी 2607 शिष्यवृत्त्या आहेत.
आता महाराष्ट्राचं बघायचं तर आपल्या राज्यासाठी इंजिनिअरिंगसाठी 318 आणि डिप्लोमासाठी 280 म्हणजे एकूण 598 शिष्यवृत्त्या आहेत. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे लाखो विद्यार्थी आहेत पण शिष्यवृत्त्या मात्र फक्त 598 आहेत. म्हणून वेळेत अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे. उशीर केला तर संधी जाऊ शकते.
या स्लॉलरशिप साठी निवड नेमकी कशी होते?
अनेक पोरांना वाटतं यासाठी मुलाखत होईल किंवा वेगळी परीक्षा आपल्याला द्यावी लागेल. पण या AICTE YASHASVI Scholarship 2026 मधे असं काही नाही. निवड ही पूर्णपणे गुणांच्या आधारे होते.
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची निवड बारावीमधे मिळालेल्या गुणांच्या आधारे ठरते आणि ज्यांचे गुण जास्त त्यांना पहिले प्राधान्य मिळते. Lateral Entry विद्यार्थ्यांची निवड डिप्लोमाच्या सर्व 6 सेमिस्टर च्या सरासरी गुणांच्या आधारे होते. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या गुणांच्या आधारे होते. म्हणून तुमचे दहावी आणि बारावीतले चांगले गुण इथे खूप महत्त्वाचे ठरतात.
आता हा विचार पण येऊ शकतो समजा दोन विद्यार्थ्यांचे गुण जर समान असतील तर काय होतं? इंजिनिअरिंगसाठी आधी बारावीचे गुण बघतात नंतर दहावीचे गुण बघतात आणि तरीही समान राहिले तर जास्त वय असलेल्या विद्यार्थ्याला प्राधान्य मिळते. डिप्लोमासाठी दहावीचे गुण बघतात आणि नंतर जास्त वयाच्या विद्यार्थ्याला प्राधान्य मिळते.
या स्लॉलरशिप चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
जर विद्यार्थ्याला या स्लॉलरशिप चा फायदा घ्यायचा असेल तर ही कागदपत्रे आधीच तयार ठेवायला पाहिजे म्हणजे वेळ आली की लगेच अर्ज करता येईल.
दहावी आणि बारावीचे मार्कशीट लागेल. AICTE मान्यताप्राप्त कॉलेजचं प्रवेश पत्र लागेल. कुटुंबाचं उत्पन्न दाखला म्हणजे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे हे सिद्ध करणारं प्रमाणपत्र लागेल. आधार कार्ड लागेल. बँक खात्याची माहिती लागेल. जातीचा दाखला लागू असल्यास लागेल. पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल.
स्लॉलरशिप ची अर्ज प्रक्रिया कशी आहे?
मित्रांनो अनेकांना वाटतं सरकारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणं म्हणजे खूप अवघड असतं. पण AICTE YASHASVI Scholarship 2026 ला अर्ज कारणे हे खूप सोपं आहे.
सर्वात आधी AICTE च्या स्लॉलरशिप च्या वेबसाईटवर जायचं आणि ऑनलाइन अर्ज करायचा आहे . त्यानंतर तुमचं कॉलेज अर्जाची पडताळणी करते. शेवटी AICTE कडून शेवटची तपासणी होते. निवड झाल्यावर SMS किंवा Email द्वारे माहितो दिली जाते आणि DBT द्वारे थेट बँक खात्यात पैसे येतात.
आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जाची शेवटची तारीख जाहीर झाली की लगेच अर्ज करा. उशीर केल्यास संधी जाऊ शकते. AICTE च्या अधिकृत संकेतस्थळावर सूचना येताच अर्ज करायला सुरुवात करा.
AICTE YASHASVI Scholarship 2026 साठीच्या महत्त्वाच्या लिंक.
ही स्लॉलरशिप पुढे सुरू ठेवण्यासाठी काय करायला लागतं?
मित्रांनो हे पण खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्हाला AICTE YASHASVI Scholarship 2026 मिळाली की ती आपोआप पुढे सुरू राहत नाही. तुम्हाला दरवर्षी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. यासाठी पास झाल्याचं मार्कशीट द्याव लागतं. कॉलेजच्या प्रमुखांचं प्रमाणपत्र लागतं आणि ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली म्हणून निवांत बसायचं नाही. तुम्ही दरवर्षी अभ्यास करायचा उत्तीर्ण व्हायचं आणि पुन्हा नोंदणी करायचं. म्हणजे स्लॉलरशिप सुरू राहते.
AICTE YASHASVI Scholarship 2026 कधी बंद होऊ शकते? हे पण जाणून घ्या.
हे खूप महत्त्वाचं आहे की शिक्षण घेतांना पुढील वर्गात नापास झाल्यास स्लॉलरशिप लगेच बंद होते. शिक्षण अर्धवट सोडल्यास पुढील स्लॉलरशिप मिळत नाही. मुख्य शाखा सोडून दुसऱ्या शाखेला गेल्यास स्लॉलरशिप बंद होते आणि आधी मिळालेली सगळी रक्कम AICTE ला परत करावी लागू शकते. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणाहून स्लॉलरशिप किंवा आर्थिक मदत घेत असाल तर YASHASVI स्लॉलरशिप बंद होऊ शकते आणि मिळालेली रक्कम परत करावी लागू शकते.
त्यामुळे एकदा तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली की अभ्यास करण्यामध्ये सातत्य ठेवा. फिल्ड बदलण्याचा विचार करू नका. आणि दुसरी कोणती स्लॉलरशिप घेत असाल तर AICTE ला आधी विचारा.
या स्लॉलरशिप साथी काही आरक्षणसुधा मिळतं का?
मित्रांनो उत्तर आहे हो. या योजनेमध्ये भारत सरकारच्या लागू असलेल्या आरक्षण याच्या नियमांनुसार आरक्षण दिलं जातं. म्हणजे SC, ST, OBC आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्या नियमानुसार त्यांचा हक्क मिळतो.
आता एक उदाहरण पाहूया.
धुळ्यातील एका छोट्या गावातला प्रशांत. त्याचे आई वडील दोघेही मजुरी करतात आणि बारावीत त्याने 78% मार्क्स मिळवले. Civil Engineering ला प्रवेश मिळाला पण फी भरायची तयारी नव्हती आणि मग कॉलेजच्या एका सरांनी त्याला AICTE YASHASVI Scholarship २०२६ बद्दल सांगितलं.
प्रशांतने AICTE च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केला. उत्पन्न प्रमाणपत्र काढलं त्याने सगळी कागदपत्रे अपलोड केली. काही दिवसांत निवड झाल्याचा SMS आला. आणि दरवर्षी 50 हजार रुपये त्याच्या बँक खात्यात येऊ लागले.
आज प्रशांत Civil Engineering च्या तिसऱ्या वर्षाला आहे आणि म्हणतो की जर हे कळलं नसतं तर इंजिनिअरिंग सोडावी लागली असती. आता आमच्या गावातल्या सगळ्या मुलांना आम्ही सांगतो आणि हीच या पेस्ट ची भावना आहे. माहिती पसरवा आणि सर्वांपर्यंत या योजनेचा लाभ मिळू द्या.
थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो.
ही म्हणजेच AICTE YASHASVI Scholarship 2026 AICTE ने 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 50 हजार रुपये मिळतात आणि 4 वर्षांत एकूण 2 लाख रुपयांपर्यंत फायदा होतो आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 30 हजार रुपये मिळतात आणि 3 वर्षांत एकूण 90 हजार रुपयांपर्यंत फायदा होतो त्याचबरोबर कुटुंबाच्या उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये प्रटेक वर्ष अशी आहे. देशभरात 5200 आणि महाराष्ट्रात 598 स्लॉलरशिप उपलब्ध आहेत. निवड ही दहावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे होते. पैसे DBT द्वारे थेट बँक खात्यात येतात. यासाठी अर्ज AICTE च्या वेबसाईट वर ऑनलाइन करायचा आहे.
आता याचा निष्कर्ष काय निघतो?
AICTE YASHASVI Scholarship 2026 ही इंजिनिअरिंगच्या महत्त्वाच्या स्ट्रीम्स मधे शिकणाऱ्या गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 50 हजार रुपये आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 30 हजार रुपये थेट बँक खात्यात मिळतात. म्हणजे आर्थिक अडचणींमुळे इंजिनिअरिंग सोडण्याची गरज नाही.
जर तुम्ही Civil, Mechanical, Electrical, Chemical, Electronics and Communication, Agriculture Engineering किंवा Textile Technology यापैकी कोणत्याही स्ट्रीम मधे शिकत असाल जर तुमच्या घरचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल तर AICTE YASHASVI Scholarship २०२६ साठी आजच अर्ज करा.
आता तुम्ही ही पोस्ट वाचलीच असेल तर तुम्हाला माहितच आहे. तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये गावात कोणी इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाचं शिक्षण घेत असेल त्यांना ही पोस्ट नक्की पाठवा. एखाद्या विद्यार्थ्याला स्लॉलरशिप मिळवून द्यायला तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
AICTE YASHASVI Scholarship २०२६ म्हणजे काय?
AICTE ने सुरू केलेली ही एक शिष्यवृत्ती योजना आहे ज्यात इंजिनिअरिंगच्या महत्त्वाच्या शाखांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते.
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना किती स्लॉलरशिप मिळते?
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 50000 रुपये म्हणजेच 4 वर्षांत एकूण 2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.
डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना किती स्लॉलरशिप मिळते?
डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 30000 रुपये म्हणजेच 3 वर्षांत एकूण 90000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.
AICTE YASHASVI Scholarship 2026 साठी उत्पन्नाची अट किती आहे?
AICTE YASHASVI Scholarship 2026 चा लाभ घेण्यासाठी तुमच्या कुटुंबाचं सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.
स्लॉलरशिप साथी निवड कशाच्या आधारे होते?
इंजिनिअरिंगसाठी बारावीचे गुण आणि डिप्लोमासाठी दहावीचे गुण यांच्या आधारे निवड होते.
यात स्लॉलरशिप पैसे कसे मिळतात?
DBT म्हणजेच Direct Benefit Transfer द्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा होतात.
महाराष्ट्रासाठी किती स्लॉलरशिप आहेत?
महाराष्ट्रासाठी एकूण 598 शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंगसाठी 318 आणि डिप्लोमासाठी 280.
शिक्षण घेतांना शाखा बदलली तर काय होतं?
मुख्य शाखा सोडून दुसऱ्या शाखेला गेल्यास शिष्यवृत्ती बंद होते आणि आधी मिळालेली रक्कम AICTE ला परत करावी लागू

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
