Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026: शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप! अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती.

भावांनो आपल्या महाराष्ट्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीज हा नेहमीच एक मोठा प्रश्न राहिला आहे. कधी लोडशेडिंग कधी रात्री वीज येते कधी वीज बिल इतकं जास्त येतं की शेतकऱ्याला परवडतच नाही. मग शेतकरी नेमका करणार काय? शेतात पाणी द्यायचं तर वीज हवी वीज नाही तर पीक जातं आणि पीक गेलं तर शेतकऱ्याचं नुकसान होतं.

आता माझ्या ओळखीचे एक शेतकरी आहेत नाशिकजवळचे. त्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले होते 2017 मध्ये. पण वर्षांमागून वर्षे गेली आणि जोडणी काही मिळाली नाही. शेतात डिझेल पंप वापरायचे तर महिन्याला 4 ते 5 हजार रुपये डिझेलवर जायचे. मग त्यांना कळलं की सरकार आता या योजनेत सोलर पंप देतंय आणि तो पण जवळजवळ मोफत. त्यांनी अर्ज केला आणि आज त्यांच्या शेतात सोलर पंप बसलेला आहे. डिझेलचा खर्च शून्य आणि दिवसा भरपूर पाणी.

त्यामुळे आज मी तुम्हाला Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 योजनेची सर्व डिटेल माहिती सांगणार आहे म्हणजे तुमच्या घरात शेजारी नातेवाईकांमध्ये कुणीही शेतकरी असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण ही माहिती त्यांच्या खूप कामात येणार आहे.

ही योजना म्हणजे नक्की काय? हे पण समजून घेऊ

महाराष्ट्र सरकारने 15 November 2018 च्या GR नुसार ही योजना जाहीर केली आणि 1 January 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली. MSEDCL म्हणजेच Maharashtra State Electricity Distribution Company Limited ही या योजनेची Implementing Agency आहे.

आता थोडक्यात सांगायचं तर Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 शेतकऱ्यांना दिवसा सूर्यप्रकाशात शेताला पाणी देता यावं यासाठी सरकार त्यांना Off Grid Solar Pump बसवून देतं. Off Grid म्हणजे या पंपाला वीज जोडणीची गरजच नाही. Solar Panel मधून थेट पंप चालतो. आणि या योजनेत तब्बल 1 लाख सोलर पंप टप्प्याटप्प्याने बसवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

पण भाऊ या योजनेत नक्की काय काय मिळतं? चला बघूया

हे ऐकून तुम्हाला छान वाटेल. या Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 या योजने अंतर्गत फक्त सोलर पंप एवढंच नाही तर त्याबरोबर आणखी खूप गोष्टी मिळतात यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण वाटतं. पण हे अगदी खरं आहे.

या योजनेत 3HP किंवा 5HP DC Submersible सोलर पंप मिळतो. त्याबरोबर 2 LED Bulbs मिळतात म्हणजे रात्री शेतावर जायला उजेड होतो. मोबाई चार्जिंग साठी 1 USB Port मिळतो आणि बॅटरी चार्जिंग साठी Socket पण मिळतो. बॅटरी मात्र स्वतः विकत घ्यायची आहे पण बाकी सगळं सरकार देतं.

एवढच काय एकट्या सोलर पंप बरोबर शेतावर छोटी Lighting System पण मिळते हे खूप कमी शेतकऱ्यांना माहित आहे.

आता या योजनेचा फायदा नक्की कोणाला मिळतो?

ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. चला Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 याचा प्रत्येक मुद्दा समजून घेऊया.

पहिली गोष्ट म्हणजे जे शेतकरी March 2018 आधी वीज जोडणीसाठी पैसे भरून बसले आहेत आणि ज्यांच्या शेतापर्यंत HVDS Scheme नुसार Infrastructure चा खर्च 2.5 लाखांपेक्षा जास्त येतो अशा शेतकऱ्यांना या योजनेत सर्वात आधी म्हणजे प्राथमिकता दिली जाते.

दुसरी गोष्ट म्हणजे 31 March 2018 नंतर वीज जोडणीसाठी पैसे भरलेले सगळे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

तिसरी गोष्ट म्हणजे नवीन शेतकरी म्हणजेच ज्यांनी आधी कधी वीज जोडणीसाठी अर्जच केला नाही असे शेतकरी पण आता थेट या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

चौथी गोष्ट म्हणजे March 2018 आधी पैसे भरले आहेत आणि Infrastructure खर्च 2.5 लाखांपेक्षा कमी आहे पण स्वतःहून सोलर पंप घ्यायची तयारी आहे असे शेतकरी पण पात्र आहेत.

3HP मिळेल की 5HP? हे कसं ठरतं?

मित्रांनो हे ठरवणं खूप सोपं आहे आणि हे सिस्टम मध्ये ऑटोमैटिक ठरतं. जर तुमची जमीन 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 3HP DC Submersible Solar Pump मिळतो. तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर 5HP DC Submersible Solar Pump मिळतो.

यात Field लेवल वर कोणी बदल करू शकत नाही. जर एखाद्या शेतकऱ्याला वेगळ्या कपैसिटी ची गरज असेल तर त्यासाठी ऑफिस ला विनंती करावी लागते.

आता या योजनेत शेतकऱ्यांना किती पैसे द्यावे लागतात?

यात 3HP सोलर पंप साठी ओपन कॅटेगिरी म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना फक्त 25,500 रुपये द्यावे लागतात जे एकूण किमतीच्या फक्त 10% आहे. SC आणि ST Category च्या शेतकऱ्यांना फक्त 12,750 रुपये द्यावे लागतात जे फक्त 5% आहे.

5HP सोलर पंप साठी Open Category च्या शेतकऱ्यांना 38,500 रुपये म्हणजे 10% द्यावे लागतात. SC आणि ST Category च्या शेतकऱ्यांना 19,250 रुपये म्हणजे फक्त 5% द्यावे लागतात. बाकीचे 90 किंवा 95% पैसे सरकार भरतं. म्हणजे लाखो रुपयांचा सोलर पंप तुम्हाला फक्त काही हजारांत मिळतो.

आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आधी वीज जोडणीसाठी काही पैसे भरले असतील तर ते पैसे यातून Adjust केले जातात.

याचा अर्ज कुठे आणि कसा करायचा?

पहिले तर MSEDCL च्या mahadiscom.in/solar या Portal वर जायचं आणि Online अर्ज करायचा.

दुसरी म्हणजे अर्जाचा प्रकार ठरवणे. तुम्ही आधी वीज जोडणीसाठी Paid Pending असाल तर Part I चा अर्ज भरायचा. नवीन शेतकरी असाल म्हणजे आधी कधी अर्जच केला नसेल तर Part II चा अर्ज भरायचा.

तिसरी गोष्ट म्हणजे अर्जात नाव जमिनीचा पत्ता 7/12 चे तपशील जमिनीचा प्रकार क्षेत्रफळ आधार नंबर मोबाईल नंबर सिंचनाचा प्रकार आणि विहिरीची खोली हे सगळं अचूक भरायचं आहे.

चौथी गोष्ट म्हणजे 7/12 उतारा, आधार कार्ड, जातीचा दाखला आणि NOC हे सगळे कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करायचे आहेत.

आणि शेवटी अर्ज भरल्यावर त्याची Signed Hard Copy पण सिस्टम वर अपलोड करायची आहे आणि ही कॉपी MSEDCL ला मिळाली असं मानलं जातं.

Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 यासाठी महत्त्वाच्या लिंक्स.

योजनेसाठीची official Website लिंक
योजनेचा official Circuler लिंक

अर्ज केल्यावर पुढे काय होतं?

आता हे पण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं की अर्ज केल्यावर पुढे काय होतं हे शेतकऱ्यांना माहित नसतं आणि ते Follow Up करत नाहीत.

अर्ज ऑनलाईन मिळाल्यावर SDO म्हणजे Sub Divisional Officer 3 दिवसांच्या आत तुमच्या शेतावर येऊन सर्वे करतो. अर्जातील माहिती बरोबर आहे की नाही हे तपासलं जातं आणि Survey Report Mobile App वर Upload केली जाते.

सर्वे रिपोर्ट मिळाल्यावर SE म्हणजे Superintending Engineer तुमच्या अर्जाला Sanction देतो आणि Demand Note SMS वर येतो. त्यात किती पैसे भरायचे ते लिहिलेलं असतं.

पैसे भरल्यावर एजेंसी निवडायची असते किंवा सरकारी एजेंसी तुमच्याकडे येते आणि 3 महिन्यांच्या आत सोलर पंप बसवला जातो.

सोलर पंप बसवल्यावर Beneficiary म्हणजे शेतकरी एजेंसी चा प्रतिनिधी आणि MSEDCL चा प्रतिनिधी यांनी मिळून एकत्र सर्टफिकेट वर सही करायची असते आणि सोलर पंप चा फोटो MSEDCL च्या मोबाईल ऍप वर इपलोड केला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 7/12 उतारा असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला लागू असल्यास तो लागतो. संबंधित विभागाकडून NOC लागतो. मोबाईल नंबर आणि Email ID असल्यास द्यावा.

जर जमीन संयुक्त नावावर असेल तर इतर खातेदारांचं Consent लेटर पण लागतं. ही सगळी कागदपत्रे आधीच तयार ठेवा म्हणजे वेळ जाण्यापूर्वी अर्ज करता येईल.

सोलर पंप बसवल्यावर याची वारंटी किती मिळते?

हे पण खूप महत्त्वाचं आहे Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 या योजनेतून आणि हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. DC सोलर पंप म्हणजेच मोटर आणि कंट्रोल पॅनल यावर 5 वर्षांची वारंटी मिळते. सोलर PV पॅनल वर तब्बल 10 वर्षांची वॉरंटी मिळते. म्हणजे एकदा सोलर पंप बसवला की 10 वर्षे निश्चिंत राहता येतं.

जर पंप बंद पडला तर MSEDCL च्या कॉल सेंटर वर कंप्लेंट रजिस्टर करायची. एजेंसी ला 3 दिवसांत ती रिसॉल्व करणं बंधनकारक आहे. नाही केलं तर त्यांना पॅनल्टी लागते. म्हणजे तुमची तक्रार वाऱ्यावर सोडली जात नाही.

आता आपण एक उदाहरण पाहूया समजा रामराव हे अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहतात. त्यांच्याकडे 4 एकर शेती आहे. 2018 मध्ये त्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले होते पण जोडणी मिळाली नाही. Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 बद्दल कळल्यावर त्यांनी ऑनलाईन अर्ज केला. SDO ने 2 दिवसांत सर्वे केला. Sanction मिळालं आणि Demand Note आला. रामरावांनी आधी भरलेले पैसे एडजस्ट झाले आणि थोडी Differential Amount भरली. 3 महिन्यांत शेतात 3HP Solar Pump बसला.

रामराव म्हणतात की आधी डिझेल पंपावर महिन्याला 5 हजार रुपये जायचे. आता तो खर्च शून्य झाला. दिवसा भरपूर पाणी मिळतं आणि रात्री LED Bulb मुळे शेतावर उजेड पण असतो. जर याबद्दल मला वेळेत माहित नसतं तर हे मिळालंच नसतं. हीच या पोस्टची भावना आहे. माहिती पसरवा लाभ मिळवा.

थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो

ही योजना सुरू झाली 1 January 2019 रोजी आणि याचा GR 15 November 2018 चा आहे. या योजनेत 3HP किंवा 5HP DC सोलर पंप मिळतो. ओपन साठी 10% आणि SC, ST साठी 5% रक्कम द्यायची आहे. अर्ज mahadiscom.in/solar या पोर्टल वर ऑनलाईन करायचा आहे. सर्वे 3 दिवसांत होतो आणि पैसे भरल्यावर 3 महिन्यांत पंप बसतो. सोलर पॅनल वर 10 वर्षे आणि पम्प वर 5 वर्षांची वॉरंटी मिळते. एकूण 1 लाख सोलर पंप बसवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

या योजनेचा निष्कर्ष काय आहे?

Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे. वीज नाही म्हणून शेती थांबायची नाही. आता सूर्यप्रकाश असताना दिवसा शेताला पाणी देता येईल आणि वीज बिलाची काळजीच नाही. डिझेल पंपाचा खर्च नाही. लोडशेडिंगची काळजी नाही.

जर तुमच्या शेतात पाण्याची गरज आहे वीज जोडणी मिळालेली नाही किंवा खूप वेळ झाला Paid Pending आहे तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. mahadiscom.in/solar या पोर्टल वर जा आणि आजच अर्ज करा.

आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये गावात कोणी शेतकरी असेल जो वीज जोडणीची वाट पाहत आहे त्यांना ही पोस्ट नक्की पाठवा. एखाद्या शेतकऱ्याला मोफत सोलर पंप मिळवून द्यायला तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?

आता यात वारंवार विचारले जाणारे प्रश्न बघूया.

Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana २०२६ म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारची योजना आहे ज्यात अनेक शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी 3HP किंवा 5HP Solar Pump अत्यंत कमी किमतीत दिला जातो. MSEDCL ही या योजनेची Implementing Agency आहे.

या योजनेत देशातील शेतकऱ्यांना किती पैसे द्यावे लागतात?

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती पैसे द्यावे लागतात? Open Category साठी फक्त 10% आणि SC, ST Category साठी फक्त 5% रक्कम द्यावी लागते. बाकी सगळे पैसे सरकार भरतं.

3HP की 5HP Pump मिळेल हे कसं ठरतं?

3HP की 5HP Pump मिळेल हे कसं ठरतं? 5 एकर किंवा कमी जमीन असेल तर 3HP आणि 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर 5HP Pump मिळतो.

या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

mahadiscom.in/solar या MSEDCL च्या Portal वर Online अर्ज करायचा आहे. ताशी पोस्ट मधे आपण लिंक दिली आहे.

जर हा पंप बंद पडला तर काय करायचं?

MSEDCL च्या Call Center वर Complaint करायची. एजेंसी 3 दिवसांत दुरुस्ती करते आणि नाही केल्यास Penalty लागते.

याच्या Solar Panel वर किती वॉरंटी मिळते?

Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026 या योजनेत सोलर पॅनलवर वर 10 वर्षे आणि पंप व कंट्रोल पॅनलवर वर 5 वर्षांची वॉरंटी मिळते.

Leave a Comment