मित्रांनो विचार करा शेतात काम करताना अचानक पिकावर रोग पडला, किडीचा प्रादुर्भाव झाला किंवा चांगल हवामान नसल्यामुळे पीक खराब होण्याची भीती वाटायला लागली म्हणजे शेतकऱ्याच्या जीवात जीव राहत नाही. अशा वेळी कुठे जायचं, कुणाला विचारायचं हेच बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही. कृषी अधिकाऱ्याकडे जायचं म्हटलं तर वेळ जातो, पैसा खर्च होतो आणि तोपर्यंत पिकाचं नुकसानही होऊन जातं. पण याच अडचणीवर उपाय म्हणून आपल्या देशातील केंद्र सरकारने Kisan Call Centre Yojna 2026 ही योजना सुरू केली आहे, ज्यातून फक्त एका फोन कॉलवर मोफत तज्ञ सल्ला मिळतो.
आता Kisan Call Centre Yojana 2026 याच एक उदाहरण सांगते. सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणारे विठ्ठल काका यांच्या त्यांच्या कापसाच्या पिकावर अचानक किडीचा प्रादुर्भाव हा दिसायला लागला. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. शेजारच्या तरुणाने त्यांना 1551 या नंबरवर कॉल करायला सांगितलं. काकांनी कॉल केला, मराठीत त्यांनी आपली अडचण सांगितली आणि तज्ञांनी लगेच योग्य कीटकनाशक आणि फवारणीची पद्धत सांगितली. काका म्हणतात, एक रुपयाही खर्च न करता घरबसल्या तज्ञांचा सल्ला मिळाला, यामुळे माझं पीक वाचलं.
Kisan Call Centre Yojna 2026 म्हणजे नक्की काय? हे समजून घेऊ
भावांनो शेतीमध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर व्हावा या हेतूने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 21 जानेवारी 2004 रोजी किसान कॉल सेंटर ही योजना सुरू केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याच सोप्या भाषेत फोनवर देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही सेवा IFFCO किसान संचार लिमिटेड या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत चालवली जाते आणि सध्या देशभरात एकूण 454 फार्म टेली अॅडव्हायझर या सेवेत कार्यरत आहेत.
आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर देशभरात 21 वेगवेगळ्या ठिकाणी ही कॉल सेंटर्स कार्यरत आहेत आणि सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यात समाविष्ट आहेत. यासाठी संपूर्ण देशभरासाठी एकच 1800-180-1551 किंवा 1551 हा 11 अंकी टोल फ्री नंबर देण्यात आला आहे, जो मोबाईल सोबतच लँडलाईन या दोन्हीवरून, तसंच सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवरूनही सहज लावता येतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं हे तब्बल 22 स्थानिक भाषांमध्ये दिली जातात, त्यामुळे भाषेचा कुठलाही अडथळा येत नाही.
महाराष्ट्रात ही सेवा कशी चालते? चला बघूया
भावांनो महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी पुणे इथलं किसान कॉल सेंटर काम करतं आणि महाराष्ट्रासाठी मराठी भाषेत आणि गोव्यासाठी कोकणी तसंच मराठी भाषेत सल्ला दिला जातो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातून या Kisan Call Centre Yojana 2026 ला मिळणारा प्रतिसाद देशात सर्वात जास्त आहे. 2014-15 मध्ये महाराष्ट्रातून तब्बल 5 लाख 98 हजार 443 कॉल्स आले होते, 2015-16 मध्ये हा आकडा 8 लाख 50 हजार 349 वर पोहोचला, 2016-17 मध्ये 7 लाख 70 हजार 341 आणि 2017-18 मध्ये 7 लाख 45 हजार 326 इतके कॉल्स या सेंटर्स ना केले गेले. म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी ही सुविधा मोठ्या प्रमाणात वापरत आहेत.
या सेवेत नेमकं काय काय मिळतं? चला सर्व सविस्तर बघूया
आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घ्या. किसान कॉल सेंटरचे एजंट ज्यांना फार्म टेली अॅडव्हायझर म्हटलं जातं हे कृषी किंवा संबंधित क्षेत्रात म्हणजे फलोत्पादन असेल पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उत्पादन, कृषी अभियांत्रिकी, कृषी विपणन, जैवतंत्रज्ञान किंवा गृहविज्ञान यापैकी कुठल्या ना कुठल्या विषयात पदवीधर किंवा त्याहून जास्त शिक्षण घेतलेले असतात. त्यामुळे शेतकऱ्याला मिळणारा सल्ला हा खरोखरच तज्ञांकडून मिळालेला असतो.
एक महत्त्वाची गोष्ट भावांनो, फार्म टेली अॅडव्हायझरला जर एखाद्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तो प्रश्न लगेच वरच्या पातळीवरील तज्ञांकडे कॉल कॉन्फरन्सिंगद्वारे वर्ग केला जातोआणि तज्ञ राज्य कृषी विभाग, ICAR म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राज्य कृषी विद्यापीठांचे मुख्य तज्ञ लोक असतात. म्हणजे साध्या प्रश्नापासून ते अगदी कठीण प्रश्नापर्यंत, प्रत्येक शेतकऱ्याला योग्य आणि चांगल उत्तर मिळेपर्यंत ही यंत्रणा काम करत राहते.
याशिवाय शेतकऱ्यांना कॉल केल्यावर संबंधित सल्ल्याचा सारांश SMS द्वारेही पाठवला जातो आणि त्यामुळे फोनवर सांगितलेली माहिती शेतकरी नंतरही वाचून घेऊ शकतो. तसंच निवडक मंडईंचे भाव आणि पिकांबाबत नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी शेतकरी स्वतःची आवड नोंदवून SMS सेवेसाठी नोंदणीही करू शकतात.
ही सेवा कधी आणि कशी वापरायची?
पहिली गोष्ट म्हणजे Kisan Call Centre Yojana 2026 आठवड्याचे प्रत्येक दिवस सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अविलेबल असते. दुसरी गोष्ट म्हणजे या वेळेनंतर कॉल केल्यास पूर्वनोंदणीकृत IVR संदेश ऐकवला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्याला सेवा कधी उपलब्ध आहे हे लगेच कळतं. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कॉल हा 100% रेकॉर्ड केला जातो आणि तक्रार आल्यास सहा महिन्यांपर्यंत हे रेकॉर्डिंग जपून ठेवलं जातं, त्यामुळे सेवेच्या गुणवत्तेवर बारीक लक्ष ठेवलं जातं.
चौथी गोष्ट म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला कॉल सेंटरमधून समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर तो पर्याय म्हणून थेट वरच्या पातळीवर तज्ञाच्या नंबरवर कॉल करून कॉन्फरन्स कॉल मागवू शकतो. पाचवी गोष्ट म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC मार्फतही शेतकरी आपला प्रश्न नोंदवू शकतात, तिथला एजंट किसान नॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम या पोर्टलवर शेतकऱ्याचा प्रश्न नोंदवतो आणि योग्य त्या पातळीवर तो प्रश्न पाठवला जातो.
प्रश्न सुटला नाही तर पुढे काय होतं?
भावांनो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. CSC मार्फत आलेला प्रश्न जर किसान नॉलेज मॅनेजमेंट सिस्टीमवर लगेच सुटला नाही तर तो आधी ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्याकडे पाठवला जातो आणाई ब्लॉक अधिकाऱ्याने 3 दिवसांत उत्तर न दिल्यास तो प्रश्न आपोआप जिल्हा स्तरावरील अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्राकडे वर्ग होतो. तिथूनही 7 दिवसांत उत्तर न मिळाल्यास तो प्रश्न राज्य स्तरावरील अधिकारी किंवा राज्य कृषी विद्यापीठाकडे पाठवला जातो, आणि तिथे 15 दिवसांत उत्तर देणं अपेक्षित असतं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला ठराविक वेळेत नक्की उत्तर मिळतेच.
Kisan Call Centre Yojana 2026 ची आणखी कोणती वैशिष्ट्यं आहेत?
पहिली गोष्ट म्हणजे 1 सप्टेंबर 2018 पासून या सेवेतील पर्यवेक्षकांचं आणि फार्म टेली अॅडव्हायझरचं मानधनही वाढवण्यात आलं आहे ज्यामुळे अनुभवी आणि चांगल्या लोकांना या सेवेत टिकवून ठेवणं शक्य झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन भरती झालेल्या पर्यवेक्षक आणि फार्म टेली अॅडव्हायझरना नवी दिल्लीत 4 दिवसांचं induction training दिलं जातं, त्यामुळे सेवा देणाऱ्यांचा दर्जा कायम राखला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक KCC वर video conferencing ची सुविधाही आहे, ज्यामुळे एजंट्स थेट राज्य कृषी विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपलं ज्ञान वाढवू शकतात.
चौथी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा कॉल होल्डिंग टाइम 30 सेकंदांपेक्षा कमी करण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्याला जास्त वेळ वाट बघावी लागत नाही. पाचवी गोष्ट म्हणजे कॉल सेंटरमधून मिळालेल्या उत्तराबाबत शेतकरी रेटिंगही देऊ शकतो, ज्यामुळे फार्म टेली अॅडव्हायझरच्या कामाचा दर्जा सुधारत राहतो.
Kisan Call Centre yojna 2026 साठी महत्त्वाचा नंबर आणि लिंक.
टोल फ्री नंबर 1800-180-1551 किंवा 1551
या योजनेसाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
भावांनो ही Kisan Call Centre Yojana 2026 पूर्णपणे मोफत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राज्य सरकारही या योजनेत चांगला सहभाग घेतं आणि स्थानिक स्तरावर प्रसिद्धी करणं, IT विभागाशी समन्वय साधणं आणि नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करणं ही कामं राज्य सरकारकडून केली जातात म्हणजे फार्म टेली अॅडव्हायझर आणि कृषी विभागातील सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्यात वर्षातून दोनदा पंधरा दिवसांची अदलाबदलही केली जाते.
आता याचं दुसरं एक उदाहरण पाहूया बीड जिल्ह्यातील सुनीता ताई यांच्या टोमॅटोच्या पिकावर पानं पिवळी पडण्याची समस्या आली होती. काय करावं कळत नव्हतं. गावातल्या कृषी सहाय्यकाने त्यांना 1551 नंबर सुचवला. सुनीता ताईंनी कॉल केला, मराठीत समस्या सांगितली आणि फार्म टेली अॅडव्हायझरने त्यांना योग्य पोषक द्रव्य आणि फवारणीचं वेळापत्रक सांगितलं. सुनीता ताई म्हणतात, घरबसल्या मोफत सल्ला मिळाला आणि माझं पीक वेळेत सावरलं, हा नंबर आता मी माझ्या सगळ्या शेतकरी मैत्रिणींना दिलाय.
थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगते
Kisan Call Centre Yojna 2026 ही योजना 21 जानेवारी 2004 पासून केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत राबवली जात असून, 1800-180-1551 किंवा 1551 या टोल फ्री नंबरवर कॉल करून शेतकरी 22 स्थानिक भाषांमध्ये मोफत तज्ञ सल्ला घेऊ शकतात. महाराष्ट्रासाठी पुणे इथलं कॉल सेंटर मराठी भाषेत सेवा देतं आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या कॉल्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सेवा सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत, आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहे. प्रश्न न सुटल्यास तो टप्प्याटप्प्याने ब्लॉक, जिल्हा आणि राज्य स्तरावरील तज्ञांपर्यंत पोहोचवला जातो.
| मुद्दा | तपशील |
| टोल फ्री नंबर | 1800-180-1551 / 1551 |
| सेवेच्या वेळा | सकाळी 6 ते रात्री 10 |
| भाषा | 22 स्थानिक भाषा |
| महाराष्ट्रासाठी केंद्र | पुणे |
| सुरुवात | 21 जानेवारी 2004 |
| सेवा शुल्क | पूर्णपणे मोफत |
| एकूण फार्म टेली अॅडव्हायझर | 454 |
याचा निष्कर्ष नेमका काय निघतो?
मित्रांनो शेतीत अचानक येणाऱ्या समस्यांवर वेळेत योग्य सल्ला मिळणं हे किती महत्त्वाचं असतं हे शेतकरी कुटुंबांनाच माहीत असतं. Kisan Call Centre yojna 2026 ही याच गरजेवर उत्तर देणारी आणि पैसे न घेता तज्ञांचा सल्ला घरबसल्या मिळवून देणारी एक साधी पण खूप उपयोगी सेवा आहे. फक्त एक फोन कॉल दूर असलेली ही मदत अनेकदा पीक वाचवू शकते, वेळेवर योग्य निर्णय घ्यायला मदत करू शकते.
जर तुमच्या ओळखीत किंवा गावात कुणी शेतकरी असेल तर हा 1551 नंबर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे, ही पोस्ट अशा शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा. एखाद्या शेतकऱ्याचं पीक वेळेत वाचवायला तुम्ही कारणीभूत ठराल.
Kisan Call Centre Yojana 2026 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Kisan Call Centre Yojana 2026 म्हणजे काय?
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक प्रश्नांवर फोनवर मोफत तज्ञ सल्ला देणारी केंद्र सरकारची ही योजना आहे.
या सेवेसाठी नंबर काय आहे?
1800-180-1551 किंवा 1551 या टोल फ्री नंबरवर कॉल करता येतो.
ही सेवा कधी उपलब्ध असते?
आठवड्याचे सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असते.
Kisan Call Centre Yojana 2026 मधे महाराष्ट्रासाठी कोणतं कॉल सेंटर काम करतं?
पुणे इथलं किसान कॉल सेंटर महाराष्ट्र आणि गोव्यासाठी मराठी भाषेत सेवा देतं.
या सेवेसाठी काही शुल्क आकारलं जातं का?
नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.
फार्म टेली अॅडव्हायझरला उत्तर देता आलं नाही तर काय होतं?
असा प्रश्न उच्चस्तरीय तज्ञांकडे कॉल कॉन्फरन्सिंगद्वारे वर्ग केला जातो.
कोणत्या भाषांमध्ये सल्ला मिळतो?
Kisan Call Centre Yojana 2026 यासाठी देशभरात एकूण 22 स्थानिक भाषांमध्ये सल्ला दिला जातो.
Kisan Call Centre Yojana 2026 वर कॉल करण्यासाठी काही ओळखपत्र किंवा नोंदणी लागते का?
नाही, कुठलंही ओळखपत्र किंवा आधीची नोंदणी न करता कोणताही शेतकरी थेट 1551 नंबरवर कॉल करू शकतो.
रात्री उशिरा किंवा पहाटे कॉल केला तर काय होतं?
सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेबाहेर कॉल केल्यास पूर्वनोंदणीकृत IVR संदेश ऐकवला जातो, आणि सेवा सुरू झाल्यावर पुन्हा कॉल करता येतो

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
