Maharashtra Baby Care Kit Scheme 2026: पहिल्या प्रसूतीवेळी नवजात बालकासाठी 2 हजार पर्यंतची मोफत बेबी केअर किट! संपूर्ण माहिती

सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या शेजारच्या वहिनींना जेव्हा पहिलं बाळ झालं होतं तेव्हा त्यांना Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 या योजनेबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि प्रसूतीनंतर दोन महिने उलटले त्यानंतर कुठेतरी त्यांना कळलं की सरकार मोफत किट देतं पण तोपर्यंत वेळ गेली होती आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही.

हे वाचून आता तुम्हाला वाटेल की अरे, असं का झालं असेल? तर उत्तर एकच आहे, माहितीचा अभाव लोकांपर्यंत ती माहिती न पोहचणे.

त्यामुळे आज मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या बेबी केअर किट या योजनेची सर्व डीटेल माहिती सांगणार आहे म्हणजे तुमच्या घरात, शेजारी, नातेवाईकांमध्ये कुणीही गरोदर महिला असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण ही माहिती त्यांच्या खूप कामात येणार आहे.

बेबी केअर किट ही योजना म्हणजे नक्की काय? हे पण समजून घेऊ

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास या विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिनांक 29 December 2018 रोजी या योजनेचा शासन निर्णय जाहीर करून 26 January 2019 पासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली केळी आहे.

आता या योजनेच्या माध्यमातून जी महिला पहिल्यांदा आई होणार आहे त्यांनी शासकीय आरोग्य केंद्रात याची नाव नोंदणी केली आहे, त्यांच्या नवजात बाळासाठी शासन 2 हजार रुपयांपर्यंतची बेबी केअर किट बॅग मोफत देत आहे.

म्हणजे बाळ जन्माला आल्यावर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या आवश्यक वस्तू एकाच बॅगेत घरपोच त्यांना मिळतात. रोख पैसे तर नाही, पण वस्तूंच्या रूपात एवढी मोठी मदत हे गरजू महिलांसाठी त्या परिवारांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.

ही योजना का सुरू केली? सविस्तर बघू आणि समजून घेऊया.

आता महाराष्ट्र राज्यात दरवर्षी कमीत कमी 20 लाख महिलांची प्रसूती होते. याच्यामधील 12 लाख महिलांची प्रसूती ही ग्रामीण आणि आदिवासी भागात होतात आणि अनेक कुटुंबांमध्ये खास करुन गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये बाळाच्या जन्मानंतर लगेचच लागणाऱ्या वस्तू विकत घेणं तेवढा सोप्प नसत.

आता याशिवाय बालसंगोप याबद्दल माहितीचा अभाव आणि स्वच्छतेची कमतरता यामुळे बालमृत्यूचं प्रमाण देखील वाढतं.

मित्रांनो आंध्र प्रदेश झालं तामिळनाडू झालं किंवा तेलंगणा या भारतातील राज्यांनी आधीच अशा प्रकारच्या योजना या राबवल्या होत्या आणि त्यांचा सकारात्मक परिणाम बघून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय शेवटी घेतला आणि या योजनेकरिता तब्बल 100 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला.

या योजनेचा कोणाला कोणाला लाभ मिळेल?

ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे चला Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 या योजनेचा एक एक मुद्दा समजून घेऊया.

आता यात सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे महिलेची पहिली प्रसूती असणे आवश्यक आहे. म्हणजेच ही योजना फक्त पहिल्या बाळासाठी आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या बाळासाठी या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच आई होत असाल तेव्हाच तुम्हाला किट मिळेल.

या प्रसूतीबद्दल महिलेची शासकीय रुग्णालयात नोंदणी हवी केलेली असावी. म्हणजे गरोदरपणी महिलांनी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेली असायला पाहिजे किंवा महिलेची जर खाजगी डॉक्टरांकडे नोंदणी केली असेल तर त्यांना हा लाभ मिळणार नाही.

या मधे मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही समान लाभ मिळणार आहे .बाळ मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही समान किट मिळते. यात कोणताही भेद नाही. हा शासनाचा खूप चांगला निर्णय आहे.

कोणत्याही जाती धर्माचे बंधन नाही म्हणजेच ही योजना ही समाजसाठी सर्व लोकांसाठी लागू आहे, जस SC, ST, OBC, General ह्या समाजातील सगळ्यांना समान लाभ मिळतो त्याचबरोबर उत्पन्नाचीही कोणती मर्यादा लादली नाही.

खाजगी रुग्णालयात प्रसूती झाली तरी चालते पण हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे जो अनेक महिलांना बिलकुल माहित नाही. जर महिलांनी शासकीय रुग्णालयात नोंदणी केली असेल आणि नंतर जर काही कारणाने प्रसूती ही महिलांना खाजगी रुग्णालयात करावी लागली तरी त्या महिला Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. फक्त त्यांची नोंदणी ही शासकीय ठिकाणी असणे हे मात्र आवश्यक आहे.

बेबी केअर किटमध्ये नक्की काय काय असतं?

महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार 2 हजार रुपयांच्या या किटमध्ये खालील वस्तू असतात.

लहान मुलांचे कपडे, प्लास्टिक लंगोट, हातमोजे आणि पायमोजे, बाळाला ठेवण्यासाठी कापड दिले जाते, चांगली झोप आणि आरामासाठी लहान गादी, प्लास्टिक चटई आणि मच्छरदाणी सुधा दिली जाते.

बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी जर बाळाला ताप आला तर ते मोजण्यासाठी थर्मामीटर, नख कापण्यासाठी नेलकटर, 250 मिली बाळासाठी लागणार तेल, 60 मिली शॅम्पू आणि बॉडी वॉश लिक्विड दिले जाते.

एवढच नाही तर, आईसाठी हात धुण्याचे handwash आणि लोकरीचे कापड दिले जाते. जे बाळाला हात लावण्यापूर्वी स्वच्छतेसाठी खूपच उपयुक्त आहे.

आता बाळाच्या मनोरंजनासाठी सुधा वस्तू आहेत जसं खुळखुळा खेळणे आणि या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी एक वेगळी बॅगही दिली जाते.

एम्हणजेच कूण 17 प्रकारच्या वस्तू एकाच बॅगेत मिळतात. ज्या नवजात बाळाच्या पहिल्या काही महिन्यांत लागणाऱ्या सगळ्या गोष्टी यात मिळून जातात.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

अनेकांना अस वाटतं की सरकारी योजनेसाठी अर्ज करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट असते. पण हे खूप सोपं आहे.

पहिली गोष्ट तर तुमच्या गावात किंवा वॉर्डात असलेल्या म्हणजेच जवळच्या अंगणवाडी मधे जायचं. तिथे अंगणवाडी सेविकेला सांगा की बेबी केअर या किटसाठी मला अर्ज करायचा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे अर्जाचा नमुना भरणे. हा नमुना आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्यामार्फत तयार केला जातो आणि सर्व अंगणवाडी केंद्रांना पुरवला जातो. तो तुम्हाला तिथेच मोफत मिळेल.

तिसरी गोष्ट म्हणजे शासकीय रुग्णालयातील नोंदणी चे कार्ड आणि ओळखपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहे.

चौथी गोष्ट म्हणजे अर्ज हा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करायचा आणि त्यानंतर शासन निर्णयानुसार फक्त 3 दिवसांच्या आत तुम्हाला हे किट अंगणवाडी केंद्रातून दिली जाते

हा अर्ज महिलांनी नेमका कधी करावा?

यासाठी मुख्य दोन पर्याय आहेत.

पहिला आणि सोपा पर्याय म्हणजे महिलांनी गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन त्यांना सांगणे. म्हणजे बाळ जन्मण्यापूर्वीच सगळी तयारी होते आणि बाळ हे जन्मल्यावर लगेच किट मिळते.

आता दुसरा पर्याय पण बघूया म्हणजे कोणत्या कारणाने गरोदरपणात अर्ज केला गेला नसेल तर प्रसूतीच्या नंतर 2 महिन्यांच्या आत अर्ज केला तरी हे किट महिलांना मिळते. मात्र 2 महिने उलटले की की अर्ज करायची संधी जाते, त्यामुळे अर्ज करायला उशीर करू नका.

या योजनेच्या महत्त्वाच्या लिंक्स

योजनेचा OOFICIAL GRलिंक
योजनेची OFFICIAL Websiteलिंक

यात किट वाटप कसं होतं?

मित्रांनो बेबी केअर या किटची खरेदी GEM Portal किंवा e-Tender या प्रक्रियेद्वारे केली जाते. म्हणजे पारदर्शक पद्धतीने सर्व खरेदी होते.

आता Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 या योजनेच्या माध्यमातून किट वाटपाची महत्त्वाची साखळी अशी आहे. आधी तर आयुक्त कार्यालय नवी मुंबई कडून जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे जाते, तिथून ते बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे त्यानंतर नंतर मुख्य सेविकांकडे, मग अंगणवाडी सेविकांकडे आणि शेवटी लाभार्थी म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचते.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किटमधील सगळ्या मिळणाऱ्या वस्तूंची Expiry Date तपासून मगच हे वाटप महिलांपर्यंत होत असते. हे काम बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची असते आणि त्यामुळे तुम्हाला कधीही एक्सपायर झालेल्या वस्तू मिळणार नाहीत.

योजनेवर देखरेख कोण ठेवतं?

ही Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 योजना आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यात राबवली जाते. सचिव महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे जी प्रतेक 3 महिन्यांनी या योजनेचा आढावा घेते त्यामुळे ही योजना नियमितपणे तपासली जाते आणि त्रुटी असल्यास त्या सर्व दुरुस्त केल्या जातात.

एक उदाहरण पाहूया

सविताताई या नागपूरजवळच्या एका छोट्या गावात राहतात आणि पहिल्यांदा गरोदर राहिल्यावर त्यांनी जिल्हा रुग्णालयात नाव नोंदवलं. आठव्या महिन्यात अंगणवाडी सेविका घरी आल्या आणि त्यांनी सविताताईंना बेबी केअर किटबद्दल सांगितलं.

त्यानंतर नवव्या महिन्यात सविताताईंनी या योजनेसाठी अर्ज केला आणि बाळ जन्मल्यावर त्यांना तिसऱ्या दिवशी किट मिळाली. त्यात सर्व लागणाऱ्या जस थर्मामीटर, बाळाचे कपडे, मच्छरदाणी, तेल, शॅम्पू सगळं होतं. म्हणजे त्यांना स्वतः काहीच विकत घ्यावं लागलं नाही.

त्यामुळे सविताताई म्हणाल्या की जर याबद्दल मला माहीत नसतं तर हे मिळालंच नसतं. आता आमच्या गावातील सगळ्या नव्या आयांना आम्ही सांगतो. हीच या पोस्ट ची भावना आहे.

थोडक्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो

ही योजना सुरू झाली 26 January 2019 रोजी आणि याचा शासन निर्णय हा 29 December 2018 चा आहे आता लाभ म्हणजे 2 हजार रुपयांचे मोफत किट. हे किट महिलांच्या पहिल्या प्रसूतीतील नवीन जन्माला आलेल्या बाळासाठी आहे. या योजनेसाठी महिलांनी नोंदणी ही शासकीय आरोग्य केंद्रात करायची आहे आणि याचा अर्ज अंगणवाडी केंद्रात जमा करायचा आह आणि यासाठी अर्जाची मुदत ही 9 वा महिना किंवा प्रसूतीनंतर 2 महिन्यांत आहे. किट मिळण्याचा वेळ हा अर्जानंतर 3 दिवस आहे. या योजनेसाठी 100 कोटी रुपयांचा एकूण निधी उपलब्ध आहे.

याचा निष्कर्ष नेमका काय निघतो

Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 ही योजना ही महाराष्ट्र शासनाने नवजात बालकांच्या आरोग्यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे. पहिल्यांदा आई होणाऱ्या प्रत्येक महिलेला बाळाच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक वस्तू एकत्र मिळाव्यात हा हेतू आहे. आणि हे सगळं पूर्णपणे मोफत आहे.

आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहितच आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये सोबतच गावात कोणी पहिल्यांदा गरोदर असेल तर त्यांना ही पोस्ट त्यांना नक्की पाठवा. एखाद्या महिलेला 2 हजारांचे किट मिळण्यास तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?

Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 या योजनेत दुसऱ्या बाळासाठी किट मिळते का?

नाही, ही योजना फक्त पहिल्या प्रसूतीसाठी आहे.

या योजनेत रोख पैसे मिळतात का?

नाही, फक्त वस्तूंच्या स्वरूपात किट मिळते. रोख रक्कम ही दिली जात नाही.

जर महिलांची खाजगी डॉक्टरांकडे नोंदणी असेल तर?

खाजगी ठिकाणी नोंदणी असेल तर लाभ मिळत हा नाही. शासकीय आरोग्य केंद्रात नोंदणी कारणे आवश्यक आहे.

समजा मुलगी जन्मली तर किट मिळेल का?

हो, Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 या योजनेत मुलगा आणि मुलगी दोघांसाठी समान लाभ आहे.

याच्या अर्जाचा नमुना कुठे मिळेल?

तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात मोफत मिळतो.

हे किट मिळायला जास्तीत जास्त किती वेळ लागतो?

अर्ज जमा झाल्यावर फक्त 3 दिवसांत हे किट मिळते.

Leave a Comment