Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 ही योजने म्हणजे समजा आपल्या मित्राने आपल्या सर्वांच्या घरात आजी किंवा आजोबा असतात त्यांचं एक स्वप्न नेहमी असतं. कधी आई म्हणते विठोबाच्या दर्शनाला जायचं तर कधी बाबा म्हणतात काशीला एकदा जाऊन यायचं आहे. पण कधी पैशांची अडचण कधी सोबत कुणी नाही तर कधी प्रकृती साथ देत नाही. आणि असंच वर्षांमागून वर्षे जातात आणि हे स्वप्न मनातच राहून जातं.
आता माझ्या ओळखीच्या एका आजींच असंच झालं तिला पंढरपूरला जायचं होतं. पण तिच्या घरची परिस्थिती बेताची. मुलांना वेळ नाही. मग कुणीतरी सांगितलं की महाराष्ट्र सरकार च्या या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा म्हणजेच तीर्थांच दर्शन देत आहे. त्यांचा विश्वासच बसेना. पण अर्ज केला आणि लॉटरी मध्ये नाव आलं आणि आजी पंढरपूरला गेल्या. खिशातून एक रुपया खर्च नाही.
त्यामुळे आज मी तुम्हाला या योजनेची डिटेल माहिती सांगतो, म्हणजे तुमच्या घरात शेजारी नातेवाईकांमध्ये कुणीही ज्येष्ठ नागरिक असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण ही माहिती त्यांच्या खूप कामात येणार आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 म्हणजे नक्की काय? हे पण समजून घेऊ
भारतातील महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 14 July 2024 च्या शासन निर्णयानुसार सुरू केली आहे. या योजनेचा हेतू अगदी साधा आणि सुंदर आहे. आपल्या राज्यातल्या 60 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देण्याची संधी उपलब्ध करून देणे
आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजना कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नाही. सर्व धर्मांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना खुली आहे म्हणजे हा शासनाचा खूप चांगला निर्णय आहे.
या योजनेतून नक्की काय काय मिळतं?
हा प्रश्न तर पडणारच. तर सांगतो या योजनेमधील पात्र व्यक्तीला एका तीर्थस्थळाच्या यात्रेसाठी लाभ मिळतो. प्रवास खर्चाची मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी आहे. या रकमेत प्रत्यक्ष प्रवास भोजन आणि निवास या सगळ्या गोष्टींचा खर्च समाविष्ट असतो. म्हणजे ज्येष्ठ नागरिकाला खिशातून फारसा खर्च न करता संपूर्ण तीर्थयात्रा घडते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. हा लाभ आयुष्यात एकदाच घेता येतो त्यामुळे कोणत्या तीर्थस्थळाला जायचं हे नीट विचार करून ठरवा.
या योजनेचा फायदा नक्की कोणाला मिळतो?
ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. चला याचा प्रत्येक मुद्दा समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे अर्जदाराचं वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असलं पाहिजे.
तिसरी गोष्ट म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावं.
ही तीन अट पूर्ण होत असतील तर तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 साठी अर्ज करू शकतात.
आता याचा लाभ कोणाला मिळणार नाही? हे पण बघूयात.
आता हे पण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं की अर्ज केल्यावर Reject होतो आणि मग निराशा येते. त्यामुळे आधीच हे वाचा.
कुटुंबातील कोणी Income Tax भरणारा म्हणजेच आयकरदाता असेल तर लाभ मिळत नाही. कुटुंबातील कोणी नियमित किंवा कायम सरकारी कर्मचारी असेल किंवा पेन्शन घेणारा रिटायर सरकारी कर्मचारी असेल तर लाभ मिळत नाही. मात्र 2 लाख 50 हजारांपर्यंत उत्पन्न असलेले काँट्राक्ट वर काम करणारे पात्र ठरतात.
कुटुंबातील कोणी विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असेल तर लाभ मिळणार नाही. कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी बोर्ड किंवा महामंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल तर हा लाभ मिळत नाही. कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन घेतलेले असेल तर लाभ मिळत नाही.
याशिवाय Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 साठी अर्जदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रवासासाठी सक्षम असणं आवश्यक आहे. TB हृदयविकार किंवा संसर्गजन्य आजार असलेल्यांना प्रवास करता येत नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक आधी लॉटरी मध्ये निवडले जाऊनही प्रवासाला गेले नाहीत त्यांना पुन्हा संधी सुधा मिळत नाही.
या योजनेत महत्वाच महानजे 75 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी खास सोय आहे, ही या योजनेमधील खूप विचारपूर्वक केलेली गोष्ट आहे आणि ती खूप कमी लोकांना माहित आहे.
75 वर्षांवरील अर्जदार आपल्या जोडीदाराला किंवा एका सहाय्यकाला म्हणजेच मदतनीसाला सोबत नेऊ शकतो. जोडीदाराचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असलं तरी तो किंवा ती सोबत प्रवास करू शकतो. सहाय्यकाचं वय किमान 21 ते कमाल 50 वर्षे असावं. म्हणजे एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध ज्येष्ठांनाही लाभ सहज घेता येतो. एकट्याने जाण्याची भीती नाही.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 मध्ये कोणकोणत्या तीर्थस्थळांना जाता येतं?
हे ऐकून तर तुम्हाला खूपच आनंद होईल. यामध्ये भारतातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 अशा एकूण मोठ्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील तीर्थस्थळांमध्ये पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी साईबाबा, शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, वेरूळ, अष्टविनायक, जेजुरी, खंडोबा, आळंदी ,देहू, माहूर, रेणुका गणपतीपुळे, आणि बरेच काही आहे.
भारतातील तीर्थस्थळांमध्ये वैष्णोदेवी,अमरनाथ, सुवर्ण मंदिर, अमृतसर, बद्रीनाथ, केदारनाथ, काशी विश्वनाथ, राम मंदिर, अयोध्या जगन्नाथ पुरी, तिरुपती बालाजी, रामेश्वरम, सोमनाथ, द्वारका आणि बरीच धार्मिक स्थळं आहेत.
विशेष म्हणजे यांच्या यादीत मंदिरांसोबतच चर्च, दर्गा, गुरुद्वारा, जैन मंदिरं यांचाही समावेश आहे कारण ही योजना सर्व धर्मांसाठी आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 साठी अर्ज कसा करायचा? Step by Step समजून घेऊया
मित्रांनो अर्ज करणं अगदी सोपं आहे आणि पूर्णपणे मोफत आहे.
पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन पोर्टल किंवा Mobile App द्वारे अर्ज भरता येतो. ज्यांना ऑनलिन अर्ज भरता येत नाही त्यांच्यासाठी Setu Suvidha Kendra मध्ये अर्ज भरण्याची सोय आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे अर्जदाराला हजर राहून लाइव फोटो आणि KYC करावी लागते. यासाठी सोबत Ration Card आणि Aadhar Card घेऊन जा.
तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात या योजनेसाठी अर्ज भरण्याची ठराविक Deadline जाहीर केली जाते त्यामुळे अर्ज वेळेत भरा. उशीर केला तर संधी जाते.
आता बघूया की यामध्ये लाभार्थ्यांची निवड नक्की कशी होते?
समजा एखाद्या तीर्थस्थळासाठी Quota पेक्षा जास्त अर्ज आले तर निवड कशी होणार? तर इथे सगळं ट्रांसपेरेंट पद्धतीने होतं.
प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात Quota निश्चित केला जातो. Quota पेक्षा जास्त अर्ज आले तर लॉटरी द्वारे निवड होते. सोबत वेटिंग लिस्ट पण तयार केली जाते म्हणजे निवडलेली व्यक्ती गेली नाही तर पुढच्या व्यक्तीला संधी मिळते. निवड झालेल्यांची यादी Portal वर जिल्हाधिकारी कार्यालयात आणि समाजकल्याण विभागाच्या नोटीस बोर्ड वर जाहीर केली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती?
खूप लोकांचे अर्ज फक्त चुकीची किंवा अपुरी कागदपत्रे नसल्यामुळे Reject होतात. म्हणून ही यादी नीट वाचा आणि सगळी डॉक्युमेंट आधीच तयार ठेवा.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 साठी ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड किंवा राशन कार्ड लागतं. महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टफिकेट किंवा जन्म दाखला लागतो. नसेल तर 15 वर्षं जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी एक चालतं. उत्पन्नाचा दाखला म्हणजे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारांपर्यंत किंवा पिवळं केशरी रेशन कार्ड लागतं. मेडिकल सर्टफिकेट लागतं जे सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेलं असावं आणि प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जुनं नसावं. पासपोर्ट साईझ फोटो लागतो. जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. अटी व नियम पाळण्याचं Undertaking द्यायचं आहे.
एक उदाहरण पाहूया
सुभाषराव हे नाशिक जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहतात. वय 68 आयुष्यभर शेती केली. काशीला जायचं स्वप्न होतं पण पैसे नव्हते. Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 बद्दल मुलाने सांगितलं. Setu Suvidha Kendra मध्ये जाऊन अर्ज केला लॉटरी मध्ये नाव आलं आणि सुभाषराव काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेले. प्रवास भोजन निवास सगळं मोफत.
सुभाषराव म्हणतात की जर Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 बद्दल मला माहित नसतं तर हे स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं. आता आमच्या गावातील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आम्ही सांगतो. हीच या पोस्टची भावना आहे. माहिती पसरवा लाभ मिळवा.
या योजनेच्या महत्त्वाच्या लिंक्स.
थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो
ही योजना सुरू झाली 14 July 2024 या तारखेला त्याच्या GR नुसार. लाभ म्हणजे 30 हजार रुपयांपर्यंत मोफत तीर्थयात्रा. वयाची अट 60 वर्षे व त्याहून अधिक आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाख 50 हजार रुपये आहे. हा लाभ आयुष्यात एकदाच मिळतो. भारतातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळे या योजनेत आहेत. अर्ज Online किंवा Setu Suvidha Kendra मध्ये मोफत करता येतो. निवड Computerized Lottery द्वारे होते. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सोबत एक मदतनीस नेता येतो.
याचा नेमका निष्कर्ष काय आहे?
मित्रांनो Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 ही फक्त एक सरकारी योजना नाही. ज्या आई वडिलांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले त्यांना उतारवयात मनशांती देणारी ही संधी आहे. हजारो ज्येष्ठ नागरिकांच्या मनातलं तीर्थयात्रेचं स्वप्न पूर्ण करणारी योजना ही खरंच कौतुकास्पद आहे.
जर तुमच्या घरात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असतील आणि वरील अट पूर्ण होत असतील तर वेळ न दवडता त्यांचा अर्ज भरून द्या. एक छोटासा अर्ज त्यांचं मोठं स्वप्न पूर्ण करू शकतो.
आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये गावात कुणी ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांचं तीर्थयात्रेचं स्वप्न अजून पूर्ण झालं नाही त्यांना ही पोस्ट नक्की पाठवा. एखाद्या आजी आजोबांचं स्वप्न पूर्ण व्हायला तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 म्हणजे काय?
ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्यातून राज्यातल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातल्या व राज्यातल्या प्रमुख तीर्थस्थळांना ₹30,000 पर्यंत मोफत यात्रेची संधी मिळते.
या योजनेत किती रक्कम मिळते?
प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ₹30,000 इतकी आहे, ज्यात प्रवास, भोजन व निवास या सगळ्याचा समावेश आहे.
या योजनेसाठी वयाची व उत्पन्नाची अट काय आहे?
अर्जदाराचं वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावं आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.
अर्ज कुठे करायचा?
अर्ज ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल आपलिकेशन द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रात भरता येतो आणि अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
निवड कशी होते?
जिल्हानिहाय कोटा ठरवला जातो आणि कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास संगणकीकृत लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते.
75 वर्षांवरील व्यक्तीला सोबत कुणाला नेता येतं का?
हो, 75 वर्षांवरील अर्जदार आपल्या जोडीदाराला सोबत नेऊ शकतो.
प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टींना बंदी आहे?
प्रवासात कोणतेही ज्वलनशील किंवा मादक पदार्थ नेण्यास बंदी आहे. तसंच प्रवाशांनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावं आणि संपर्क अधिकाऱ्याच्या सूचनांचं पालन करावं.
अर्ज भरताना स्वतः हजर राहावं लागतं का?
हो. अर्जदाराला स्वतः हजर राहावं लागतं, जेणेकरून त्यांचा लाईव्ह फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी सोबत रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जा.
महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र नसेल तर काय करावं?
अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी 15 वर्षं जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला — यापैकी कोणतंही एक ग्राह्य धरलं जातं.
₹30,000 पेक्षा जास्त खर्च झाला तर तो कोण भरतं?
ठरवून दिलेल्या निकष व सुविधांव्यतिरिक्त एखाद्या प्रवाशाला अतिरिक्त सुविधा हव्या असतील, तर त्याचा अतिरिक्त खर्च संबंधित प्रवाशालाच स्वतः करावा लागतो.
प्रवासाच्या ठिकाणी पोहोचण्याचा खर्च कोण देतं?
यात्रेकरूंना ठरलेल्या नियोजित ठिकाणी स्वतःच्या खर्चाने पोहोचावं लागतं. तिथून पुढचा प्रवास, भोजन व निवासाचा खर्च योजनेअंतर्गत केला जातो.
यात्रा एकट्याने करता येते की गटाने?
ही यात्रा फक्त गटाने (group ने) एकत्रित आयोजित केली जाते. शासनाने ठरवलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थस्थळाची यात्रा सुरू होते.

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
