मित्रांनो Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 या योजनेच्या माध्यमातून भारतातील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक गोष्ट आपल्याला नेहमी दिसते जर गरीब माणूस आजारी पडला तर त्याच्यासमोर दोनच पर्याय असतात. एक तर खाजगी डॉक्टर कडे जा आणि हजारो रुपये खर्च कर किंवा सरकारी रुग्णालयात जा आणि दिवसभर रांगेत उभा राहा मित्रांनो झोपडपट्टीत राजणाऱ्या लोकांना खाजगी डॉक्टर चा खर्च परवडत नाही आणि तो म्हणून आजार अंगावर काढतो आणि नंतर परिस्थिती आणखी बिघडते.
आता माझ्या ओळखीच्या एका काकांचं असंच झालं. ते नागपूरच्या एका खेड्यात राहतात. साधा ताप आला तरी डॉक्टर कडे जायला पैसे नाहीत म्हणून घरच्या घरी काढायचे. मग कुणीतरी सांगितलं की काका आता सरकारने ही योजना सुरू केली आहे आणि ते जवळच्या केंद्रात गेले तर डॉक्टर होते औषधे होती आणि सगळं मोफत होतं आता त्यांचा विश्वासच बसेना.
म्हणू आज मी तुम्हाला या योजनेची सर्व डिटेल माहिती सांगणार आहे म्हणजे तुमच्या घरात शेजारी नातेवाईकांमध्ये कुणीही गरजू असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण ही माहिती त्यांच्या खूप कामात येणार आहे.
आता ही योजने नक्की आहे तरी काय? हे पण समजून घेऊ
भावांनो महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 4 January 2021 रोजी या योजनेचा शासन निर्णय जारी केला आणि Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 चं पूर्ण नाव आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असं आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत ही योजना राबवली जाते.
याचा मुख्य चा हेतू अगदी साधा आणि सरळ आहे. महानगरपालिका क्षेत्रातील गरीब जनता झोपडपट्टी परिसरातील लोक आणि आरोग्य सेवांपासून वंचित असलेल्या लोकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा चा मुख्य उद्देश आहे.
आता थोडक्यात सांगायचं तर शहरातल्या गरीब माणसाला खाजगी डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही. या योजनेच्या माध्यमातून त्यांना मोफत डॉक्टर, औषधे आणि मोफत OPD सेवा मिळते.
आता या योजनेमध्ये नक्की काय काय मिळतं?
या योजनेमध्ये खालील सुविधा पूर्णपणे मोफत मिळतात.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे OPD म्हणजेच डॉक्टर कडे जाऊन तपासणी करता येते आणि त्यासाठी एक रुपयाही द्यावा लागत नाही कारण यात Consultation चार्ज पूर्णपणे माफ आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे मेडिसिन वेंडिंग मशीन या योजनेतून दवाखान्यात औषध वितरणासाठी खास मशिन बसवलेली आहे. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे या मशिन मधून मिळतात.
तिसरी गोष्ट म्हणजे उपकरणे. रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक ती सर्व मेडिकल उपकरणे Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 च्या दवाखान्यात उपलब्ध आहेत.
चौथी गोष्ट म्हणजे IT सुविधा म्हणजेच माहिती तंत्रज्ञान. प्रत्येक दवाखान्यात हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर सुविधा आहे. म्हणजे तुमची माहिती सिस्टम मध्ये जाते आणि पुढच्या वेळी डॉक्टर ला तुमची हिस्ट्री कळते हे खूपच चांगली गोष्ट आहे.
पाचवी गोष्ट म्हणजे ANM आणि GNM कर्मचारी हे डॉक्टर सोबतच नर्स आणि इतर सहाय्यक कर्मचारी दवाखान्यात असतात. म्हणजे सर्वांगीण आरोग्य सेवा एकाच ठिकाणी मिळते.
Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 मध्ये किती दवाखाने सुरू होणार?
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. यामध्ये एकूण 100 आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही केंद्रे महाराष्ट्रातील 19 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सुरू केली जाणार आहेत.
आता तुम्हाला वाटेल की दवाखाना आपल्या शहरात येणार का?
मित्रांनो ठाण्यात सर्वात जास्त म्हणजे 10 दवाखाने प्रस्तावित आहेत. नाशिकमध्ये 6 दवाखाने प्रस्तावित आहेत. मुंबई, औरंगाबाद, अमरावती, लातूर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर, पनवेल, नागपूर, चंद्रपूर, मालेगाव, धुळे, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड या प्रत्येक महानगरपालिकेत 5 दवाखाने प्रस्तावित आहेत. वसई विरारमध्ये 4 दवाखाने प्रस्तावित आहेत. हे सर्व म्हणजे महाराष्ट्रातील 19 मोठ्या शहरांमध्ये पोहोचणार आहे.
या योजनेच्या महत्त्वाच्या लिंक्स.
| योजनेचा OFFICIAL GR | लिंक |
| योजनेची Official website | लिंक |
या योजनेसाठी सरकारने किती पैसे मंजूर केले?
Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 यासाठी शासनाने तब्बल 5075 लाख रुपये म्हणजेच सुमारे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. त्याशिवाय चालू वर्षात 725 लाख रुपये वेगळे उपलब्ध आहेत. म्हणजे एकूण 5800 लाख रुपये म्हणजेच 58 कोटी रुपये उपलब्ध आहेत.
भावानो आता हा पैसा नक्की कुठे खर्च होतो ते समजून घेऊया. मध्ये प्रत्येक दवाखान्यासाठी सुरुवातीला 1 लाख रुपये कैपिटल कॉस्ट म्हणजे भांडवली खर्च आणि 1 लाख रुपये तेथील सुविधांसाठी दिले जातात. म्हणजे एकट्या दवाखाना उभारणीसाठी 2 लाख रुपये खर्च होतात.
त्याशिवाय दर वर्षी प्रत्येक दवाखान्यावर 6 लाख 95 हजार रुपये खर्च होतात. यात डॉक्टर साठी 4 लाख 50 हजार रुपये IT साठी 75 हजार रुपये औषधांसाठी 1 लाख रुपये माहिती शिक्षण व संवादासाठी 10 हजार रुपये आणि कार्यालयीन खर्चासाठी 60 हजार रुपये असे मिळून 6 लाख 95 हजार रुपये प्रति दवाखाना वार्षिक खर्च होतो.
म्हणजे 100 दवाखान्यांसाठी दर वर्षी 695 लाख रुपये म्हणजेच जवळजवळ 7 कोटी रुपये खर्च होतात आणि हे सगळे पैसे राष्ट्रीय नागरी आरोग्य या अभियानातून येतात.
या योजने मधे बाह्य संस्था नक्की काय करते?
हे पण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण यामध्ये E Tender प्रक्रियेद्वारे एक बाह्य संस्था निवडली जाते. ही संस्था दवाखाना चालवण्याची संपूर्ण जबाबदारी घेते.
त्यानंतर या संस्थेला मेडिसिन वेंडिंग मशीन उपलब्ध करायची असते सोबतच आवश्यक Hardware आणि Software उपलब्ध करायचे असतात. OPD सेवा पुरवायची असते. वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करायची असतात. वैद्यकीय अधिकारी म्हणजेच डॉक्टर नेमायचे असतात. ANM आणि GNM म्हणजे नर्स आणि इतर सहाय्यक कर्मचारी नेमायचे असतात. केंद्राचे व्यवस्थापन करण्यासाठी सहाय्यक केंद्र उभारायचे असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 मध्ये रुग्णांकडून एक रुपयाही Consultation Charges घ्यायचे नाहीत. हे सर्व बाह्य संस्था करते पण रुग्णाला मात्र सगळं मोफत मिळतं.
या योजनेत दवाखान्यांची ठिकाणे कशी ठरतात?
हे पण खूप महत्त्वाचं आहे कारण दवाखान्यांची ठिकाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक यांनी निश्चित केलेल्या यादीनुसारच ठरतात जस जिथे गरीब लोक जास्त आहेत झोपडपट्ट्या जास्त आहेत तिथेच दवाखाने उघडले जातात.
त्यानंतर यासाठी प्रत्येक महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या झोपडपट्टी लोकसंख्या आणि असुरक्षित लोकसंख्या हे तीन निकष पाहिले जातात आणि जिथे गरज जास्त तिथे Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 चा दवाखाना जास्त हे साधं तत्त्व आहे.
एक उदाहरण पाहूया
जस सुनीताबाई या ठाण्यातील एका झोपडपट्टीत राहतात. त्यांना गुडघ्याचा त्रास होता पण खाजगी डॉक्टर चा खर्च परवडत नव्हता. मग याबद्दल शेजारणीने सांगितलं. जवळच्या दवाखाना केंद्रात गेल्या. डॉक्टर ने तपासलं. औषधे मिळाली. एक रुपयाही खर्च नाही. मग सुनीताबाई म्हणतात की याबद्दल जर मला माहित नसतं तर आजार अंगावरच काढत राहिले असते. आता आमच्या वस्तीतल्या सगळ्यांना आम्ही सांगतो. हीच या पोस्टची भावना आहे. माहिती पसरवा लाभ मिळवा.
थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो.
Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 याचा GR 4 January 2021 रोजी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला. एकूण 100 दवाखाने महाराष्ट्रातील 19 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सुरू होणार आहेत.
आता यामध्ये OPD डॉक्टर हे औषधे तपासणी सगळं पूर्णपणे मोफत आहे. Medicine Vending Machine, IT सुविधा वैद्यकीय उपकरणे डॉक्टर आणि नर्स सगळं एकाच ठिकाणी मिळतं. म्हणजे एका दवाखान्यात गेलं की सगळ्या गोष्टी होतात.
साठी शासनाने मुभलक म्हणजे तब्बल 5800 लाख रुपये म्हणजेच 58 कोटी रुपये उपलब्ध केले आहेत आणि E Tender प्रक्रियेद्वारे बाह्य संस्था निवडली जाते जी दवाखाना चालवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये जास्त दवाखाने उघडले जातात म्हणजे ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत ही योजना आधी पोहोचते.
आता या योजनेचं निष्कर्ष पण बघूया.
मित्रांनो महाराष्ट्र सरकारने गरीब आणि वंचित नागरिकांसाठी उचललेलं एक खूप मोठं पाऊल आहे. आजारपणात पैसे नाहीत म्हणून डॉक्टरांकडे कडे न जाणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी एक मोठा आधार ठरत आहे. मोफत डॉक्टर मोफत औषधे आणि मोफत तपासणी हे सगळं एकाच ठिकाणी मिळणं हे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे.
जर तुमच्या शहरात म्हणजे नागपूर ठाणे नाशिक मुंबई, औरंगाबाद किंवा इतर 19 महानगरपालिकांपैकी कोणत्याही शहरात तुम्ही राहत असाल तर जवळचं Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 केंद्र शोधा आणि त्याचा लाभ घ्या.
आता तुम्ही तर ही पोस्ट वाचली आणि तुम्हाला माहित आहे ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये वस्तीत कुणी गरजू असेल ज्याला डॉक्टर कडे जाणं परवडत नाही त्यांना ही पोस्ट नक्की पाठवा. एखाद्या गरीब कुटुंबाला मोफत आरोग्य सेवा मिळवून द्यायला तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 म्हणजे काय?
महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे ज्यात महानगरपालिका क्षेत्रातील गरीब आणि झोपडपट्टीतील नागरिकांना मोफत OPD Doctor औषधे आणि वैद्यकीय सेवा दिली जाते.
या योजनेमध्ये किती पैसे द्यावे लागतात?
एक रुपयाही द्यावा लागत नाही. यात Doctor तपासणी औषधे आणि OPD सेवा पूर्णपणे मोफत आहे.
Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 मध्ये किती दवाखाने आहेत?
एकूण 100 दवाखाने 19 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सुरू केले जाणार आहेत.
कोणत्या शहरांमध्येही योजना आहे?
नागपूर ठाणे नाशिक मुंबई औरंगाबाद अमरावती लातूर कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर भिवंडी उल्हासनगर पनवेल चंद्रपूर मालेगाव धुळे कोल्हापूर सांगली आणि वसई विरार या 19 शहरांमध्ये Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 आहे.
योजनेच्या माध्यमातून कोणत्या सुविधा मिळतात?
यात मोफत OPD सेवा मोफत Doctor तपासणी Medicine Vending Machine IT सुविधा वैद्यकीय उपकरणे Doctor आणि Nurse अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात.
Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 साठी सरकारने किती निधी मंजूर केला?
एकूण 5800 लाख रुपये म्हणजे 58 कोटी रुपये मंजूर आणि उपलब्ध आहेत.
दवाखान्यांची ठिकाणे कशी ठरतात?
Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 या योजनेतून आरोग्य अभियानाच्या संचालकांनी निश्चित केलेल्या यादीनुसार झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये चे दवाखाने उघडले जातात

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
