मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात शेती करणं खरचं पहिले सारखं राहिलं नाही कारण पाऊस कमी, शेतीसाठी लागणारा खर्च जास्त आणि भाव मात्र तेवढाच. त्यात कधी गारपीट, कधी दुष्काळ. मग शेतकरी नेमक करणार काय? आता अशा वेळेस एका मित्राने सांगितलं की भाऊ तुम्ही एकदा फळबाग लावा. सुरुवातीला तुमचं थोडा खर्च आहे पण महत्वाचं म्हणजे एकदा तुमच्या शेतातील झाडं जर मोठी झाली तर दरवर्षी तुम्हाला घरी बसून पैसे मिळतात आणि सरकार पण त्यासाठी लाखो रुपये देत आहे. पण त्याला मी म्हटलं काय सांगतोस हे खरं आहे का? तर भाऊ खरंच आहे.
महाराष्ट्र सरकारने Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana ही सुरू केली आहे आणि या योजनेत शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, पेरू, काजू, संत्रा असे फळझाडं लावण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना थेट तुमच्या बँक खात्यात पैसे टाकतं. आणि ते पण एक दोन हजार नाही तर एक लाख ते दोन लाखांपर्यंत. आता या पोस्टमध्ये हे सगळं नीट समजून घेऊया.
आता ही योजना नेमकी आहे तरी काय?
मित्रांनो आधी मनरेगा या योजनेच्या माधमातून शेतकऱ्यांना फळबागेसाठी मदत मिळायची. पण त्यात शेतकऱ्यांसाठी खूप अटी होत्या आणि बरेच शेतकरी या मनरेगा मधे बसत नव्हते. त्यांना अनुदान पण मिळत नव्हतं. मग आता राज्यातील सरकारला वाटलं की या लोकांसाठी आपण वेगळी योजना आणायला पाहिजे. म्हणून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी सुरू झाली.
आता तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या शेतात फळझाडं लावण्यासाठी सरकार तुम्हाला आर्थिक मदत देतं जे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाच आहे.
या योजनेच्या माध्यमातून कोणती फळझाडं लावता येतात?
आता तुम्ही विचारणार की कोणती झाडं लावायची? तर खाली आपम पूर्ण यादीच बघू ज्यात खूप पर्याय आहेत.
जस की आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आणि नारळ या सगळ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून अनुदान मिळतं.
म्हणजे तुमच्या गावाकडे कोणतं पीक जास्त होतं, तुमच्या भागात जमीन कशी आहे, तुमच्या भागात पाणी किती आहे हे बघून तुम्ही कोणती फळबाग लावायची ते ठरवू शकता. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं तर कोकणात काजू आणि नारळ जास्त प्रमाणावर पिकतो. मराठवाड्यात डाळिंब आणि मोसंबी चांगली होते. विदर्भात जसा संत्रा आणि आंबा चांगला होतो. त्यामुळे आपल्या भागाला जे योग्य आहे ती फळबाग लाबायला पाहिजे.
आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेमके किती पैसे मिळतात?
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana यातून शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात ते सांगतो. हे सगळे आकडे प्रति हेक्टर आहेत हे लक्षात असू द्या.
तुम्ही शेतात आंबा लावला तर, 53,561 रुपये मिळतात. सघन पद्धतीने म्हणजे जास्त झाडं एकत्र लावलीस तर 1,01,972 रुपये मिळू शकता.
तुमच्या भागात पेरू जास्त पिकत असेल आणि तुम्ही पेरू लावला तर, 3×2 पद्धतीत तर तब्बल 2,02,090 रुपये मिळू शकतात. म्हणजे दोन लाखांपेक्षा जास्त भाऊ. हे ऐकलं की डोळे मोठे होतात पण हे खरं आहे.
आता तुम्ही शेतात डाळिंब लावला, तर 1,09,487 रुपये मिळतात, जर शेतामध्ये अंजीर लावलास तर 97,406 रुपये मिळतात, जर समजा तुम्ही संत्रा किंवा मोसंबी लावली तर 62,578 रुपये मिळतात. सघन पद्धतीत 99,716 रुपये मिळतात, आता तुमच्या भागात काजू जास्त येत असेल आणि तुम्ही जर काजू लावलास तर 55,578 रुपये तुम्हाला मिळतात, जर नारळ लावला तर 59,622 ते 65,022 रुपये मिळतात, जर तुम्ही सीताफळ लावल बाग लावली तर 72,531 रुपये मिळतात, चिकू लावला तर 52,061 रुपये मिळतात, जर तुम्ही आवळा लावला तर 49,735 रुपये मिळतात, आणि समजा तुम्ही शेतात चिंच, जांभूळ, कोकम, फणस यांसाठी 43,000 ते 48,000 रुपयांपर्यंत मिळतात.
आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे पैसे तुम्हाला एकाच वेळी मिळत नाहीत. तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने येतात. पहिल्या वर्षी तुम्हाला 50%, दुसऱ्या वर्षी तुम्हाला 30% आणि तिसऱ्या वर्षी 20%. याचा तुम्हाला असा फायदा की तूम्ही झाडांची नीट काळजी घेतली तरच तुम्हाला पुढचे पैसे येतात.
आणि एक अट सुधा आहे. पहिल्या वर्षानंतर किमान 80% झाडं जिवंत असली पाहिजेत. दुसऱ्या वर्षानंतर 90% जिवंत असली पाहिजेत आणि जर झाडं मेली तर पुढचे पैसे मिळणार नाहीत. म्हणून शेतकऱ्यांनी लागवडीकडे दुर्लक्ष बिलकुल करू नये.
शेतकऱ्यांनी हे पण समजून घ्या की सरकार नक्की कशावर पैसे देतं?
तुम्हाला सरकार हे खड्डे खोदणं सोबतच कलमे लागवड करणं, पीक संरक्षण सोबतच नांग्या भरणं आणि ठिबक सिंचन या कामांसाठी पैसे देतं.
आता तुमच्या मनात प्रश्न येईल की जस जमीन तयार करणं, माती आणि शेणखत टाकणं, रासायनिक खतांचा शेतासाठी वापर करणं आणि आंतरमशागत हे तुम्हाला स्वतःला करावं लागेल. पण हे काम तुम्ही तसंही केलं असतंस शेतात. त्यामुळे यात नवीन असे काही नाही.
ठिबकसाठी शेतकऱ्यांना वेगळं अनुदान पण मिळतं. मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या योजना एकत्र मिळवून पूर्ण अनुदान मिळू शकतं. म्हणजे ठिबक सिंचनाचा खर्च जवळजवळ शून्यावर येऊ शकतो.
या योजनेचा फायदा नक्की कोणाला मिळतो?
आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो त्याचबरोबर स्वतःच्या नावावर जमीन असलेले शेतकरी असतील, संयुक्त खातेदार शेतकरी असतील, वनपट्टाधारक शेतकरी असतील, अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी या सगळ्यांना Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana याचा फायदा मिळतो.
म्हणजे तुमच्याकडे एकरभर जमीन असली तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठा शेतकरी असावं लागत नाही.
या योजनेसाठी शेतकऱ्याकडे किती जमीन असावी?
आता महाराष्ट्रातील कोकण या विभागात किमान 10 गुंठे जमीन शेतकऱ्यांकडे असावी लागते आणि बाकीच्या भागात म्हणजे महाराष्ट्रात किमान 20 गुंठे जमीन शेतकऱ्यांकडे असावी लागते.
आता जास्तीत जास्त किती जमिनीसाठी या योजनेचा फायदा मिळतो?
महाराष्ट्रामधील कोकण या विभागात 10 हेक्टरपर्यंत आणि बाकी महाराष्ट्रात 6 हेक्टरपर्यंत क्षेत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लाभ घेता येईल. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त फळपिकांसाठी पण शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येतो. म्हणजे शेतीतील अर्ध्या जमिनीत आंबा आणि अर्ध्या जमिनीत जर डाळिंब लावला तर दोन्हीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळतं.
शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
मित्रांनो Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana ही शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी यासाठी लाखोंचे अनुदान, पात्रता, कागदपत्रे व संपूर्ण माहिती बघूया. या योजनेला अर्ज करणे खूप सोपं आहे.
सर्वात आधी तर कृषी विभाग जाहिरात काढतो. मग तुम्ही अर्ज करायचा त्यानंतर अर्जाची पडताळणी होते. जास्त अर्ज आले तर यासाठी सोडत काढली जाते. निवड झाली की पूर्वसंमती मिळते.
आता यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यावर 75 दिवसांच्या आत फळबाग लागवड पूर्ण करायची आहे जर उशीर केला तर मंजुरी रद्द होऊ शकते. आणि मग पुन्हा शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी अर्ज करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला एकदा संधी मिळाली की वेळ वाया घालवू नका.
जर लागवड पूर्ण झाली त्यानंतर सरकारी तपासणी होते आणि मग पैसे थेट आधार लिंक बँक खात्यात येतात. यामध्ये कोणाची मध्यस्थी नाही आणि महत्वाच म्हणजे शेतकऱ्यांना कुठे जायची गरज नाही.
आता शेतकऱ्यांना कोणती कोणती कागदपत्रे यात लागतात?
आधार कार्ड, 7/12 उतारा, जमिनीचा 8अ उतारा, बँक पासबुक, जातीचा दाखला लागू असल्यास आणि शेतकऱ्याचा फोटो. जर जमीन संयुक्त नावावर असेल तर इतर खातेदारांचं संमतीपत्र पण लागतं. ही सगळी कागदपत्रे शेतकऱ्यांनी आधीच तयार ठेवायला पाहिजे म्हणजे वेळ जाण्यापूर्वी शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana यासाठीच्या महत्त्वाच्या लिंक.
फळबाग लागवडीचे शेतकऱ्यांना फायदे काय आहेत? ते पण जाणून घेऊया!
भावांनो, एक उदाहरण देतो. जमजा तुम्ही शेतातील एक एकर जमिनीत डाळिंब लावला तर, तीन ते चार वर्षांनी झाडं फळ द्यायला लागतात. आता एका झाडाला 20 ते 25 किलो डाळिंब होतात. बाजारात ह्या डाळिंबसाठी 80 ते 100 रुपये किलो एवढा भाव मिळतो. आता हिशोब करा. वर्षाला एका एकरातून 3 ते 4 लाख रुपये सहज मिळतात. आणि झाड एकदा मोठं झालं की 15 20 वर्षे फळ देत राहतं.
आंब्याच्या झाडांचा जर तुम्ही विचार केला तर 40 ते 50 वर्षे ही झाडे फळ देतात. एकदा का तुम्ही आंबा लावला तर जवळपास आयुष्यभर तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे पिढ्यानपिढ्या फायदा होतो.
आता पेरू चा विचार केला तर, पेरू हे पीक आणखी लवकर फळ देते म्हणजे फक्त दीड ते दोन वर्षांतच फळ यायला सुरुवात होते आणि याच्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षातून दोन वेळा पीक येतं.
याचा अर्थ असा झाला की फळबाग यावर एकदा केलेला खर्च आणि दीर्घकाळ मिळणारा फायदा यामध्ये होत असतो. म्हणूनच Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana ही सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे.
कोणती काळजी घ्यायची?
आता तुम्हाला मी एक मित्र म्हणून सांगतो, तुम्ही नर्सरीतून कलमे घेताना प्रमाणित नर्सरीतूनच त्या कलम घ्या. कुठूनही तुम्हाला स्वस्त कलमे मिळतील ती चांगली नाही निघाली तर तुमचे झाडं मरतात आणि तुमचे पैसे पण जातात आणि अनुदान पण जातं. दोन्ही बाजूने तुमचे नुकसान होते.
ठिबक सिंचन चा वापर करा जेणेकरून पाण्याची बचत होते आणि झाडं चांगली वाढतात. ज्या शेतकऱ्यांनी ठिबक लावलं त्यांच्या झाडांचं उत्पादन नेहमी जास्त असतं.
त्याचबरोबर झाडांमध्ये योग्य अंतर ठेवा. जास्त घाई करून एकमेकांना चिकटून झाडं लावू नका. झाडांना हवा आणि ऊन मिळालं तर ती आणखीन चांगली वाढतात.
खत वेळेवर द्या आणि पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. एखादा रोग आला आणि वेळेत उपाय नाही केला तर संपूर्ण बाग खराब होऊ शकते. कृषी सहाय्यकाशी वारंवार बोलत राहा.
याचा निष्कर्ष नेमका काय निघतो?
भावांनो, फळबाग म्हणजे एकदा लावायचं आणि वर्षानुवर्षे पैसे मिळवायचे. आंब्याचं झाड एकदा मोठं झालं की 40 ते 50 वर्षे फळ देतं. डाळिंब, पेरू, संत्रा यांचाही असाच दीर्घकालीन फायदा आहे. आणि त्यावर शासन लाखो रुपये देतंय म्हणजे सुरुवातीचा खर्चही बराचसा कमी होतो.
जर तुमच्या शेतात जागा आहे, थोडं पाणी आहे आणि तुमची मेहनत करायची तयारी आहे तर ह्या योजनेचा नक्की लाभ घ्या. तुम्ही स्वतः कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करा किंवा तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यकाशी बोला आणि जाहिरात आली की लगेच अर्ज करा, वेळेत अर्ज केलात तर Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana याचा शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी यासाठी लाखोंचे अनुदान तुम्हाला मिळते.
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana म्हणजे काय?
महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे ज्यात शेतकऱ्यांना फळझाडं लावण्यासाठी प्रति हेक्टर हजारो ते लाखो रुपयांचं अनुदान दिलं जातं. हे पैसे तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने थेट बँक खात्यात येतात.
या योजने अंतर्गत कुठल्या फळपिकांसाठी अनुदान मिळतं?
आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आणि नारळ या पिकांसाठी अनुदान मिळतं.
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana याचा लाभ घेण्यासाठी किमान किती जमीन असावी?
कोकण विभागात किमान 10 गुंठे आणि उर्वरित महाराष्ट्रात किमान 20 गुंठे जमीन असावी लागते.
आर्थिक अनुदान हे एकत्र मिळतं का?
नाही. पीक;आवळ्यावर पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के असं तीन वर्षांत सर्व अनुदान शेतकऱ्याला मिळतं.
शेतातील झाडं मेली तर पैसे मिळतात का?
नाही. खारतर पहिल्या वर्षानंतर 80 टक्के आणि दुसऱ्या वर्षानंतर 90 टक्के झाडं जिवंत असावी लागतात तरच पुढचं अनुदान मिळतं.
पूर्वसंमती मिळाल्यावर किती दिवसांत लागवड करायची?
या योजनेच्या माध्यमातून 75 दिवसांच्या आत लागवड पूर्ण करणं हे बंधनकारक आहे आणि जर उशीर केला तर मंजुरी रद्द होऊ शकते.

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
