तुम्हाला तर माहितच आहे, आजच्या काळात भारतात नाही तर संपूर्ण जगात Startup Culture मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जस की Technology असो Digital Services असो Artificial Intelligence असो Agriculture असो आणि Healthcare सारख्या गोष्टींमध्ये रोजच अनेक वेगवेगळे आणि नवीन Startup तयार होत आहेत. पण मात्र startup च्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग अजूनही तेवढा वाढलेला दिसत नाही.
पण अनेक महिलांकडे खूपच चांगल्या Business Idea आणि Innovation क्षमता आहे परंतु पैश्यांची अडचण म्हणा, योग्य मार्गदर्शनाचा न मिळेने किंवा Startup Ecosystem पर्यंत पोहोच नसणे ह्या सारख्या कारणांमुळे महिलांना त्यांचा स्वतःचा Startup सुरू करता येत नाही. त्यामुळे महिलांना Startup क्षेत्रात संधी मिळाव्यात आणि त्या स्वतः आत्मनिर्भर बनाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारने Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana 2026 सुरू केली आहे.
महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र राज्यामध्ये महिला उद्योजक स्टार्टअप इकोसिस्टमतयार करायची आहे. त्यामुळे महिलांनी फक्त जॉब करनेचं नाही तर स्वतःचा व्यवसाय उभा करावा आणि इतरांना रोजगार द्यावा. हे Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana 2026 याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे महिलांकडे असलेल्या नवीन idea नवीन Innovation आणि नवीन कौशल्यांना योग्य संधी मिळावी ह्या कारणासाठी महाराष्ट्र शासन Startup क्षेत्रामध्ये Women’s ला प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण आणि छोट्या शहरांमधील महिलांना Startup क्षेत्रात संधी मिळावी यावर या योजनेत भर आहे.
अनेक नवीन संकल्पनांना खर Startup मध्ये convert करण्यासाठी महिलांना समर्थन सोबतच Startup ची मोठी Ecosystem तयार करून देणे महत्त्वाचे होते. आणि यामुळेच खरतर उद्योजकांसाठी स्पेशल आणि मोठी Startup योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Yojana 2026 म्हणजे नक्की काय? हे पण समजून घेऊ
भावांनो राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने 9 जुलै 2024 रोजी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी या संस्थेकडे सोपवण्यात आली आहे.
आता थोडक्यात सांगायचं तर राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना आणि नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसंच विस्तारासाठी एकवेळेस अर्थसहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थिनींमधून उदयास येणाऱ्या स्टार्टअप्सनाही सुरुवातीपासूनच राज्यातील इनक्युबेशन सेंटर्समार्फत मार्गदर्शन देऊन प्रोत्साहित केलं जातं. देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण व्हावी हेही या योजनेमागचं एक मोठं स्वप्न आहे.
किती पैसे मिळतात? चला सर्व सविस्तर बघूया
आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घ्या. राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या वार्षिक उलाढालीनुसार किमान 1 लाख रुपये ते कमाल 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जातं. हे पैसे अनुदान स्वरूपात दिले जातात, म्हणजे कर्जासारखं परत फेडावं लागत नाही, हीच या योजनेची सर्वात मोठी खासियत आहे.
एक महत्त्वाची गोष्ट सांगते भावांनो, या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25 टक्के इतकी रक्कम शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या मागासवर्गातील आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांनाही प्राधान्याने संधी मिळावी अशी सोय केलेली आहे.
या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत? चला समजून घेऊ
पहिली गोष्ट म्हणजे तुमचं स्टार्टअप हे भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून म्हणजे DPIIT कडून मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्रात नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्टार्टअपमध्ये महिला संस्थापकाचा किमान 51 टक्के हिस्सा असणं गरजेचं आहे, म्हणजे कंपनीचा मुख्य मालकी हक्क आणि निर्णय घेण्याचा अधिकार महिलेकडेच असावा.
तिसरी गोष्ट म्हणजे स्टार्टअप कमीत कमी 1 वर्षापासून कार्यरत असणं आवश्यक आहे, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत याची नोंदणी 30 जून 2023 पूर्वीची असावी. चौथी गोष्ट म्हणजे स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे, यापेक्षा कमी किंवा जास्त उलाढाल असलेले स्टार्टअप्स पात्र ठरत नाहीत.
पाचवी गोष्ट म्हणजे महिला नेतृत्वातील स्टार्टअपने राज्य शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ आधी घेतलेला नसावा. सहावी गोष्ट म्हणजे आश्वासक, नाविन्यपूर्ण, प्रभावी आणि रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सना या योजनेत प्राधान्य दिलं जातं, त्यामुळे तुमचा व्यवसाय जेवढा नाविन्यपूर्ण आणि रोजगार निर्माण करणारा असेल तेवढी निवडीची शक्यता जास्त असते.
कोणती कागदपत्रं लागतील? खाली बघूया
पहिली गोष्ट म्हणजे कंपनीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी नोंदणी प्रमाणपत्रं सादर करावी लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचं म्हणजे DPIIT चं मान्यता प्रमाणपत्र जोडावं लागतं. चौथी गोष्ट म्हणजे स्टार्टअपची आर्थिक उलाढाल दर्शवणारे आर्थिक विवरणपत्रं सादर करावी लागतात. पाचवी गोष्ट म्हणजे महिला संस्थापकाचा कंपनीतील हिस्सा दर्शवणारी अधिकृत कागदपत्रं जोडावी लागतात.
अर्ज कसा आणि कुठे करायचा? चला खाली बघू
पहिली स्टेप म्हणजे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. दुसरी स्टेप म्हणजे पोर्टलवर Register Now या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करायची, यात तुमचं नाव, पत्ता, व्यवसायाचं नोंदणीकृत नाव, मोबाईल नंबर अशी माहिती भरायची असते. तिसरी स्टेप म्हणजे नोंदणी पूर्ण झाल्यावर मोबाईल नंबरद्वारे पोर्टलवर लॉगिन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा अर्ज फॉर्म भरायचा, यात वैयक्तिक आणि व्यवसायाची सविस्तर माहिती द्यायची असते.
चौथी स्टेप म्हणजे आवश्यक ती सर्व कागदपत्रं स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करायची. पाचवी स्टेप म्हणजे आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत गठित केलेली मूल्यांकन समिती अर्जांची छाननी करते आणि पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्सचं सादरीकरण सत्र घेतलं जातं. सहावी स्टेप म्हणजे या सादरीकरणानंतर मूल्यांकन निकषांनुसार निवड झालेल्या स्टार्टअप्सना अनुदान स्वरूपात रक्कम उपलब्ध करून दिली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण अर्ज पूर्णपणे निःशुल्क आहे, त्यासाठी कुठलंही शुल्क भरावं लागत नाही.
Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Yojana 2026 साठी महत्त्वाच्या लिंक्स
कोणत्या महत्त्वाच्या अटी लक्षात ठेवाव्यात? चला बघूया
पहिली गोष्ट म्हणजे स्टार्टअप ऑपरेशनल असून त्याची प्रत्यक्ष उलाढाल असणं आवश्यक आहे, केवळ कागदावरचं स्टार्टअप या योजनेसाठी पात्र ठरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राज्य शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून आधीच अनुदान घेतलेलं असल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे दुहेरी लाभ घेता येत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक नियंत्रण व आढावा समिती वेळोवेळी या योजनेचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार बदल करत असते.
आता याचं दुसरं एक उदाहरण पाहूया. औरंगाबादमधील प्राजक्ताताई यांनी सेंद्रिय सौंदर्यप्रसाधनांचा स्टार्टअप सुरू केला होता. उलाढाल हळूहळू वाढत होती पण नवीन प्रॉडक्ट लाईन सुरू करायला भांडवल नव्हतं. त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला, DPIIT मान्यता आणि सगळी कागदपत्रं जमा केली आणि मूल्यांकन समितीसमोर सादरीकरण केलं. निवड झाल्यावर त्यांना लाखो रुपयांचं अनुदान मिळालं. प्राजक्ताताई म्हणतात, भांडवलाच्या चिंतेमुळे व्यवसाय अडकला होता, या योजनेमुळे माझं स्टार्टअप पुढच्या टप्प्यावर पोहोचलं.
थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही 9 जुलै 2024 पासून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबवली जात असून, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही अंमलबजावणी संस्था आहे. DPIIT मान्यताप्राप्त, महिलेचा किमान 51 टक्के हिस्सा असलेल्या, किमान 1 वर्ष कार्यरत आणि 10 लाख ते 1 कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या स्टार्टअप्सना 1 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं. यातील 25 टक्के निधी मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांसाठी राखीव आहे.
| मुद्दा | तपशील |
|---|---|
| अनुदान रक्कम | 1 लाख ते 25 लाख रुपये |
| महिला हिस्सा आवश्यक | किमान 51 टक्के |
| स्टार्टअप वयोमर्यादा | किमान 1 वर्ष कार्यरत |
| उलाढाल मर्यादा | 10 लाख ते 1 कोटी रुपये |
| राखीव निधी | 25 टक्के मागासवर्गीय महिलांसाठी |
| अर्ज कुठे करायचा | www.msins.in |
| अंमलबजावणी संस्था | महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी |
याचा निष्कर्ष नेमका काय निघतो?
मित्रांनो Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Yojana 2026 म्हणजे राज्यातील होतकरू महिला उद्योजकांसाठी एक खूप मोठी संधी आहे. आयडिया आहे, धाडस आहे पण भांडवल नाही म्हणून अनेक महिलांची स्वप्नं अडकून राहतात, आणि याच अडचणीवर सरकारने हा उत्तम उपाय शोधला आहे. फक्त कर्ज नाही तर थेट अनुदान स्वरूपात पैसे मिळत असल्याने परतफेडीचं टेन्शनही नसतं.
जर तुमच्या ओळखीत, घरात, नातेवाईकांमध्ये कुणी महिला उद्योजिका असेल किंवा स्टार्टअप सुरू करायचं स्वप्न बघत असेल तर वेळ न दवडता msins.in वर जाऊन अर्ज करा. आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे, ही पोस्ट अशा महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. एखाद्या महिलेचं स्टार्टअप उभं राहायला तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?
Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Yojana 2026: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना म्हणजे काय?
महिलांसाठी सुरू केलेली ही एक Startup योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिला उद्योजकांना Startup क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि Women-led Startup Ecosystem तयार करणे हा आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Yojana 2026 चा लाभ कोणाला मिळू शकतो?
महिला नेतृत्वाखालील आणि DPIIT Recognized Startup या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
Startup मध्ये महिलांचा किती सहभाग आवश्यक आहे?
Startup मध्ये महिलांचा कमीत कमी 51% सहभाग असला पाहिजे.
DPIIT Recognition म्हणजे काय?
DPIIT म्हणजे (Department for Promotion of Industry and Internal Trade), Startup India Portal वरून Startup ला मिळणारी अधिकृत मान्यता म्हणजे DPIIT Recognition.
Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Yojana 2026 योजनेसाठी Startup चे वार्षिक उत्पन्न किती असावे?
Startup चे वार्षिक उत्पन्न ₹10 लाख ते ₹1 कोटी यामध्ये असले पाहिजे.
कोणत्या प्रकारचे Startup या योजनेसाठी पात्र ठरू शकतात?
Technology, Agriculture, Healthcare, Education, Digital Services, AI आणि Innovation आधारित Startup ह्या योजने साठी पात्र असतात.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
तुम्हाला ह्या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो, Startup Registration, DPIIT Recognition आणि गरजेचे Documents Upload करून तुम्हाला अर्ज करता येतो.
या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
ह्या योजने साठी आधार कार्ड, PAN कार्ड, Startup Registration Certificate, DPIIT Certificate, Business Plan, Bank Details आणि Financial Information असे कागदपत्रे लागतात.
अर्ज Reject का होऊ शकतो?
चुकीची माहिती दिल्यावर कीव DPIIT Recognition नसल्यावर, अपूर्ण Documents किंवा Innovation नसल्यास अर्ज Reject होऊ शकतो.
Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Yojana 2026 मुख्य उद्देश काय आहे?
महिलांना Startup क्षेत्रात प्रोत्साहन देणे, Innovation वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा सर्वांत मुख्य उद्देश आहे.

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
