मुख्यपृष्ठ सरकारी योजना स्कॉलरशिप आमच्याबद्दल संपर्क करा

Pradhan Mantri Matru Vandana Yojana: महिलांना मिळणार 5 ते 6 हजारांची आर्थिक मदत! याची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती!

pradhan mantri matru vandana yojana

Pradhan Mantri Matru Vandana Yojana या योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र महिलांना त्यांच्या पहिल्या बाळासाठी 5 हजार आणि जर एखाद्या महिलेचे दुसरे बाळ जर मुलगी असेल तर 6 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते आमि महत् म्हणजे ही मदत थेट लाभार्थी महिलेच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात DBT या पद्धतीने जमा केली जाते, आजच्या या पोस्टमध्ये आपण देशातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजना याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये योजनेचा उद्देश काय आहे? याची पात्रता, लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, मिळणारे पैसे कसे मिळतात? या योजनेच्या महत्वाच्या अटी कोणत्या आहेत? सोबतच इतर सर्व महत्वाचे मुद्दे सोप्या मराठी भाषेत समजून घेऊ.

मित्रांनो योजनेच्या माध्यमातून फक्त आर्थिक मदत देण्याचा उद्देश नाहीये तर अनेक महिलांना त्यांचे आरोग्य व्यवस्थेशी जोडण्याचा खूप मोठा प्रयत्न आहे, महिलांनी सरकारी रुग्णालयात किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नोंदणी करायला पाहिजे त्यांनी नियमित तपासण्या करायला पाहिजेत आणि त्यांच्या बाळाचे पूर्ण लसीकरण सुधा करायला पाहिजे आणि त्यामुळेच या योजनेतील मिळणारा लाभ हा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिला जातो. या योजनेत बाळाची जन्माची नोंदणी आणि लसीकरण केल्याशिवाय पुढील लाभ तुम्हाला मिळत नाही, यामुळे प्रत्येक नवजात बाळाची नोंद होते आणि त्याला सर्व आरोग्य सेवा वेळेवर मिळतात, या योजनेमुळे प्रत्येक महिलांमध्ये त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि बाळाच्या कुपोषनाची समस्या कमी व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे.

अजून एक महत्वाचा आणि सामाजिक उद्देश म्हणजे देशामध्ये मुलीच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे हा सुद्धा आहे त्यासोबतच लिंग गुणोत्तर सुधारावे देशातील होणारी स्त्री भ्रूणहत्त्या कायमची बंद व्हावी आणि मुलीच्या जन्माचे स्वागत सर्वांनी करावे यासाठी ही योजना खूप जास्त उपयुक्त ठरेल. म्हणूनच जर दुसरे अपत्य मुलगी असल्यास सरकारकडून आर्थिक लाभ दिला जातो, यामागचा महत्त्वाचा हेतू म्हणजे समाजामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव कमी करणे आणि मुलींबद्दल लोकांमधे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही फक्त पैसे देणारी योजना नाही, तर आई आणि बाळाचे आरोग्य त्यासोबतच पोषण, लसीकरण आणि मुलींचा सन्मान या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देणारी सामाजिक आणि आरोग्यविषयक योजना आहे.

आता Pradhan Mantri Matru Vandana Yojana म्हणजे नेमक काय? हे समजणे सुधा महत्त्वाचे आहे ते आपण खाली बघूया.

आलेल्या बाळाच्या जन्मानंतर महिलांना पुरेशी विश्रांती मिळावी त्याचबरोबर अनेक महिलांना प्रसूतीनंतर त्यांच्या कामावर जात येत नाही आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भारत सरकार ने महत्त्वाची असणारी Pradhan Mantri Matru Vandana Yojana 1 जानेवारी 2017 पासून लागू केली आहे आता या योजनेद्वारे महिलांना त्यांच्या गर्भधारणेच्या काळात वेळेवर आरोग्य तपासणी करता यावी, सुरक्षित प्रसूतीसाठी सरकारी आरोग्य केंद्रांचा वापर आणि बाळाचे पूर्ण लसीकरण करण्यास प्रोत्साहन मिळते सोबतच आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

ही योजना चालू करण्याचा मुख्य उद्देश

सुरक्षित माता आणि सकस आहार: गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या काळात अतिरिक्त पोषणाची गरज असते, पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना चांगला आहार मिळत नाही, या योजनेचा मुख्य हेतू महिलांना पैशांची मदत देऊन चांगला आहार घेण्यास सक्षम करणे हा आहे, जेणेकरून अशक्तपणा दूर होऊन जन्माला येणारे बाळ निरोगी राहील.

माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी करणे: महिलांनी आरोग्याविषयी जागरूक राहून वेळेवर गरोदरपणाची नोंदणी करावी, दवाखान्यात नियमित ANC तपासण्या कराव्यात आणि सुरक्षित प्रसूती हॉस्पिटलमध्येच व्हावी यावर योजनेचा भर आहे, यासोबतच नवीन जन्माला आलेल्या बाळांचे वेळेवर लसीकरण पूर्ण करून माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा यामागील मोठा हेतू आहे.

मुलीच्या जन्माला प्रोत्साहन आणि सन्मान: समाजातील मुलगा मुलगी हा भेदभाव संपवणे आणि स्त्री भृनहत्त्या बंद करणे हा सुद्धा या योजनेचा एक महत्त्वाचा उद्देश्य आहे, म्हणूनच, समाजात मुलींबद्दल चांगला दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी दुसरे अपत्य मुलगी झाल्यास सरकारकडून तब्बल ₹६,००० ची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेत किती पैसे मिळतात?

Pradhan Mantri Matru Vandana Yojana या योजनेअंतर्गत महिलांना दोन प्रकारे आर्थिक मदत दिली जाते.

पहिल्या अपत्य किवा शिशु साठी पात्र महिलेला एकूण ₹५००० ची मदत दिली जाते, हा लाभ दोन टप्प्यांमध्ये मिळतो.
गरोदरपणाची नोंदणी करून सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतर पहिला हप्ता म्हणून ₹३००० पात्र महीलेला दिले जातात.
त्यानंतर बाळाची जन्मनोंदणी आणि लसीकरण पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता म्हणून ₹२००० मिळतात.

जर दुसरे अपत्य कीव शिशु मुलगी असेल तर लाभार्थी महिलेला एकाच टप्प्यात ₹६००० दिले जातात, हा लाभ खास करुन मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाची टिप : Pradhan Mantri Matru Vandana Yojana मधे पहिला टप्पा हा ए एन सी तपासणीनंतर (३०००) तर दुसरा टप्पा बाळच्या जन्मानंतर (२०००) रुपये १४ आठवड्यांनंतर म्हणजेच १४ आठवड्यांचे लसीकर पूर्ण झाल्यावर मिळतो. लसीकरणाचे कार्ड किंवा माहिती जिथे अर्ज केला आहे तिथे जमा लागते जेणेकरुन लसीकरण पूर्ण होण्यासही मतद होते.

पात्रता

कोणाला मिळतो प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ?

खालील महिलांना Pradhan Mantri Matru Vandana Yojana चा लाभ मिळतो

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला काही अटींमध्ये पात्र असली पाहिजे, लाभार्थी महिलेचे वय कमीत कमी १८ वर्षे ७ महिने आणि जास्तीत जास्त ५५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच खालीलपैकी किमान एक अट पूर्ण करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र असतात, सोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील महिलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो, त्या सोबत ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेची मदत दिली जाते.

याशिवाय BPL रेशन कार्डधारक महिला, आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभार्थी, ई-श्रम कार्डधारक महिला, किसान सन्मान निधी लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्डधारक महिला आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशन कार्डधारक महिलांनाही या योजने अंतर्गत मदत दिली जाते.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि आशा वर्कर यांच्यासाठी सुद्धा ह्या योजनेत मदत दिली आहे.

अपात्रता

Pradhan Mantri Matru Vandana Yojana कोणाला लाभ मिळत नाही?

  • सरकारी कर्मचारी महिला जसे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सरकारी उपक्रमांमध्ये नियमित नोकरी करणाऱ्या महिला.
  • ज्या महिलांना Paid Maternity Leave आधीपासून मिळतात.
  • महिला ज्यांचे वय१८ वर्षे ७ महिन्यांपेक्षा कमी किंवा ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे.
  • ज्यांनी ठरवलेल्या वेळा मधे अर्ज केला नाही.
  • ज्या महिलांनी सरकारी आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी केलेली नाही.
  • ANC तपासणी, जन्मनोंदणी किंवा बाळाचे लसीकरण पूर्ण न केलेल्या महिला.
  • आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसलेल्या महिला किंवा आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असलेल्या महिला.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Pradhan Mantri Matru Vandana Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिले कडे काही कागदपत्रे असणे गरजेचे असतात, सर्वांत पहिले आधार कार्ड किंवा आधार नोंदणीची प्रिंट असणे गरजेचे असते. लाभार्थी महिलेचे माता व बाल संरक्षण कार्ड (MCP Card) सुद्धा गरजेचे असत, या कार्डवर गर्भधारणेची नोंदणी, ANC तपासणी आणि बाकीचे आरोग्यविषयक नोंदी असण गरजेच असतं. बाळाच्या जन्मानंतर जन्माचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असत, त्याच्या सोबत बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेली प्रिंट तुम्हाला द्यावी लागते.
RCH Portal वर झालेल्या नोंदणीचा क्रमांक, मोबाईल नंबर आणि शासनाने वेळोवेळी मागितलेली बाकी सर्व कागदपत्र सुद्धा लागू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

(Pradhan Mantri Matru Vandana Yojana) योजनेसाठी अर्ज करायची प्रक्रिया खूप सोपी ठेवली आहे, लाभार्थी महिलेला सर्वांत आधी त्यांच्या जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करावी लागते, त्यानंतर सर्व आवश्यक/गरजेचे कागदपत्र घेऊन प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा फॉर्म भरावा लागतो.

हा फॉर्म तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा लागतो, अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलेची माहिती ऑनलाइन पोर्टलवर नोंदवते, त्यानंतर मुख्य सेविका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमच्या पात्रतेची तपासणी केली जाते.

आणि त्या नंतर अर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थी महिलेच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात DBT द्वारे पैसे जमा केले जातात, लाभार्थी महिला स्वतःही ऑनलाइन नोंदणी करू शकते, पण शेवटची तपासणी अंगणवाडी सेविकेकडूनच केली जाते.

पैसे कसे दिले जातात?

Pradhan Mantri Matru Vandana Yojana अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने डायरेक्ट लाभार्थी महिलेला दिली जाते, यासाठी केंद्र सरकार डीबीटी या पद्धतीचा वापर करता, याच्या मुळे कोणत्याच तिसऱ्या माणसाची किंवा दलालाची गरज नसते, आणि सरकार कडून भेटलेली पूर्ण रक्कम थेट महिलेच्या स्वतःच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात सुरक्षितपणे जमा केली जाते.

या योजनेचा निधी डायरेक्ट खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँक खाते तिच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, जर तुमचे बँक किंवा पोस्टाचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे येण्यात अडचणी येऊ शकता, त्यामुळे अर्ज करण्या आधी किंवा अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असल्याची खात्री करून घ्या.

लाभ घेण्यासाठी वेळ मर्यादा किती आहे?

Pradhan Mantri Matru Vandana Yojana मधे पहिल्या बाळासाठी अर्ज करताना शेवटच्या मासिक पाळीची तारीख (LMP) विचारात घेतली जाते, या तारखेपासून ५७० दिवसांच्या आत अर्ज पूर्ण करणे आवश्यक असत, हा कालावधी म्हणजे गरोदरपणाचे नऊ महिने आणि त्यानंतरचे काही महिने असा मिळून ठरवला जातो, जेणेकरून महिलेला पुरेसा वेळ मिळेल.

जर दुसरे अपत्य मुलगी असेल आणि तुम्हाला त्याचा लाभ घेईचा असेल तर याठिकाणी शेवटची मासिक पाळी न धरता मुलीच्या जन्माची तारीख महत्त्वाची असते, मुलीचा जन्म झाल्यापासून २७० दिवसांच्या आत हा अर्ज करावा लागतो.

म्हणजे ही दिलेली डेडलाईन संपल्यानंतर जर तुम्ही अर्ज केला तर तो स्वीकारला जात नाही, त्यामुळे तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला ही मदत मिळत नाही.

जुळे किंवा तिळे बाळ झाल्यास काय?

जर दुसऱ्या प्रसूतीमध्ये जुळे किंवा तिळे बाळ झाले आणि त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील, तर त्या महिलेला दुसरे अपत्य मुलगी आहे म्हणून ह्या योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजेच अशा वेळेस सुद्धा तुम्हाला ₹६००० चा लाभ मिळू शकतो.

गर्भपात किंवा मृतजन्म झाल्यास काय नियम आहेत?

जर एखाद्या महिलेला मृतजन्म झाला किवा तिचा गर्भपात झाला तर भविष्यातील गर्भधारणे च्या वेळी तिला नवीन लाभार्थी म्हणून गणले जाते, म्हणजेच ती पुन्हा या योजने मधून मदत घेऊ शकते.

अंगणवाडी सेविकेची भूमिका काय असते?

(Pradhan Mantri Matru Vandana Yojana) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सर्व गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यात आपल्या अंगणवाडी सेविकांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो, ग्रामीण भागात राहणाऱ्या गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांची या योजनेसाठी नाव नोंदणी करणे ही त्यांची जबाबदारी असते, त्यानंतर महिलांकडून आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करणे, ती व्यवस्थित तपासून घेणे आणि सरकारी ऑनलाइन पोर्टलवर त्यांची अचूक माहिती भरणे हे सर्व काम अंगणवाडी सेविका करत असतात.

प्रधानमंत्री मातृ वंदना अधिकृत पोर्टल

प्रधानमंत्री मातृ वंदना अधिकृत GR

निष्कर्ष

आपण जर बघितले तर Pradhan Mantri Matru Vandana Yojana ही देशातील गर्भवती माता आणि त्यांच्या नवजात बाळांच्या आरोग्याला चांगलं आणि सुदृढ बनवणारी एक खूप चांगली योजना आहे. या योजनेतून मिळणारी आर्थिक मदत महिलांना त्यांच्या गरोदरपणाच्या काळात कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचा चांगला आहार घेण्यास खूप मोठी मदत करते, आणि विशेष म्हणजे गरीब किवा आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी तर ही योजना एका वरदानासारखी आहे.

त्यामुळे जर तुमच्या घरात किंवा ओळखी मधे कोणी गर्भवती महिला असेल आणि ती या योजनेच्या दिले अटींमधे बसत असेल तर अजिबात उशीर करू नका आणि वेळेत तिची नोंदणी करून घ्या आणि त्यांना या योजनेचा लाभ नक्की मिळवून द्या, जर सर्व गरजेचे कागदपत्र वेळेत जमा करून योग्य पद्धतीने अर्ज केला तर पात्र महिलांना ५,००० ते ६,००० रुपयांपर्यंतची ही शासकीय मदत एकदम सोप्या पद्धतीत आणि थेट त्यांच्या खात्यात मिळू शकते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना म्हणजे काय?

Pradhan Mantri Matru Vandana Yojana (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना) ही महिला व बाल विकास मंत्रालयाची एक योजना आहे. ही योजना १ जानेवारी २०१७ पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य सुधारते तसेच कामाच्या नुकसानाची भरपाई मिळते.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

SC/ST महिलां
अपंग (Divyang) महिलां
BPL रेशन कार्ड धारक
आयुष्मान भारत लाभार्थी
ई-श्रम कार्ड धारक
शेतकरी महिला (PM Kisan लाभार्थी)
MGNREGA जॉब कार्ड धारक
८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब
अंगणवाडी/आशा कार्यकर्त्या

किती आर्थिक मदत मिळते?

पहिल्या बाळासाठी ₹५००० (२ हप्त्यांमध्ये).
दुसऱ्या बाळासाठी (मुलगी असल्यास) ₹६००० एकाच वेळी.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ऑफलाइन पद्धत: तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा आशा कार्य कर्त्या महिलांकडून अर्ज भरू शकता आणि आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करू शकता.
ऑनलाइन पद्धत: तुम्ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी करू शकता.

अर्जासाठी कोणती मुख्य कागदपत्रे आवश्यक आहेत?

लाभार्थी महिलेचे आधार कार्ड जे बँक खात्याशी लिंक असले पाहिजे.
महिलेच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसचे पासबुक, ज्यामध्ये आधारद्वारे थेट DBT सेवा चालू असावी.
एमसीपी (MCP) कार्ड, माता व बाल संरक्षण कार्ड (आरोग्य पत्रक).

अर्जाचा स्टेटस किंवा पेमेंट कसे तपासावे?

तुमच्या अर्जाचे पेमेंट जमा झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही (PFMS) अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता, तिथे ‘Know Your Payments’ या पर्यायावर क्लिक करून तुमच्या बँकेचे नाव आणि बँक खाते नंबर टाकून तुम्ही पेमेंटच स्टेटस तपासू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *