NLM Yojana 2026: तुम्हाला ५० लाख पर्यंत अनुदान मिळू शकते! NLM योजनेबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता, अनुदान, अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे.

नॅशनल लाइव्हस्टॉक मिशन म्हणजेच NLM Yojana 2026 ही पशुपालन हा व्यवसाय करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी खरच एक लाभदायी ठरणारी योजना आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत हा एक शेतीप्रधान देश आहे आणि गावाकडील सर्व काम आणि कारभार हे पूर्ण पशुपालनावर निर्धारित असतो आणि यामुळेच बरेच शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय, शेळी किव्वा मेंढी पालन, कोंबडी पालन कुक्कुटपालन किंवा डुक्कर पालन करतात, त्या मधून त्यांना आजून चांगले उत्पन्न काढता येते,.

याच गोष्टींचा विचार करून आपल्या केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे, या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या व्यवसाय करणाऱ्याला कीव्वा शेतकऱ्याला पशुपालनात स्वतःचे काहीतरी मोठं सुरू करायच आहे त्यांना एक आर्थिक मदत मिळावी आणि सरकारी अनुदान मिळावे. आपल्या देशाच्या ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा हा याचा उद्देश आहे.

NLM Yojana 2026 शेळीपालन, कोंबडी पालन , मेंढीपालन आणि पशुखाद्य निर्मिती सारख्या व्यवसायिकांना प्रोत्साहन देते, या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सरकार तुम्हाला यात चांगली सबसिडी देते, आणि फक्त पैसाच नाही तर तुमच्या व्यवसाय कसा उभा करायचा, कामासाठी लागणारि तांत्रिक मदत कशी मिळवायची सोबत आधुनिक उपकरण कसे वापरायचे याचा गाइडन्स सुद्धा योजने मधे दिले जाते, यामुळे गावाकडील लोकांना रोजगार भेटायला चांगली मदत होते.

या मध्ये पशू पलानावरच नाही तर चांगल्या जातींचे पैदास सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल, याच्या वरती शासनाची जास्त भर आहे, जर तुम्हाला सुद्धा तुमचा एक पशुपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही तुमच्या साठी एक खूप चांगली संधी आहे, जर तुम्ही चांगले नियोजन केले त्या सोबत सरकारी अनुदानाचा लाभ घेतला तर तुम्ही या क्षेत्रात नक्कीच प्रगती कराल.

मित्रांनो या पोस्ट मधे आपण योजनेची सर्व माहिती बघणार आहोत जस की कागदपत्रे काय लागतील, कोण लोक अर्ज करू शकतात आणि अर्जाची नेमकी प्रोसेस कशी असते ही सर्व माहिती पण एकदम सविस्तर पाहणार आहोत. आणि मित्रांनो त्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या जीआर (GR) मधील महत्त्वाचे नियम समजून घेण खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि तुम्हाल कुठल्या अडचणी शिवाय ह्या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येईल, ही योजना तुमच्या आयुष्य बदलवू शकते.

NLM Yojana 2026 चे मुख्य उद्देश्य काय? चला बघूया

NLM Yojana 2026 ही योजना आपल्याकडच्या पशुपालन व्यवसायाला पूर्णपने बदलवण्यासाठी सरकारने आणली आहे. या योजनेचा सगळ्यात मेन फोकस म्हणजे ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोकांना काम देणे आणि जुन्या पद्धतीचे सर्व व्यवसाय बदलून ते आधुनिक पद्धतीचे बनवायचे हा ह्या योजनेचा सर्वांत मोठा उदेश्य आहे.

व्यवसायाला मोठा कारणे म्हणजेच पशुपालन ह्या क्षेत्रातील व्यवसाय करणाऱ्या लोकांना मदत देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवायचे काम करणे.

ग्रामीण भागात रोजगार संधी म्हणजेच गावात राहणाऱ्या तरुण मुलांना शहरांकडे न जाता आपल्या स्वतःच्या गावातच कामाच्या संधी उपलब्ध करून देणे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे पशुपालनामध्ये नवीन मशिनरी आणि प्रगत व आधुनिक पद्धतींचा वापर वाढावने.

दर्जेदार व चांगल्या जातींची पैदास म्हणेज जास्तीत जास्त उत्पादन देणारे आणि सशक्त पशु तयार करण्यावर भर यात दिली जाते.

उत्पादन क्षमता वाढवणे म्हणजे दूध आणि मांस उत्पादन मधे वाढ करून आपल्या देशाला या क्षेत्रात पुढे घेऊन जाणे.

शेतकऱ्यांची बांधवांची प्रगती म्हणेज पशुपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे जास्त कसे येतील, म्हणजेच त्यांचे उत्पन्न वाढवणे.

या योजनेचा ग्रामीण भागावर होणारा परिणाम काय असू शकतो?

या योजनेचा ग्रामीण जीवनावर खूप मोठा आणि चांगला परिणाम होतो आहे, गावागावात आता छोटे-मोठे नवीन उद्योग सुरू होत आहेत, विशेष करून गावातील तरुण मूळ जे नोकरीच्या शोधात शहराकडे जात होते, त्यांच्यासाठी ही योजना खूप जास्त महत्त्वाची ठरली आहे. तसच महिला बचत गटांनाही या योजनेमुळे चांगला आत्मविश्वास मिळाला आहे, त्या आता स्वतःचे शेळीपालन किव्वा कोंबडी पालन यांसारखे व्यवसाय मोठ्या हिंमतीने चालवत आहेत.

पशुपालनाचा करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की यातून व्यवसाय उद्योग करणाऱ्याला नियमित मासिक उत्पन्न मिळत. पाऊस नाही पडला तर शेतकरी बांधवाना कधी उत्पन्न मिळत तर कधी उत्पन्न मिळत नाही, योजनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या शेती सोबत सुरु केलेल्या ह्या जोडधंद्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात रोजचा पैसा येत राहतो नियमित रोजगार पाडत रहतो, म्हणून फक्त शेतीवर अवलंबून राहनाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांच राहणीमान सुधारण्यास आणि आर्थिक बळ येण्यास ह्या योजने मुळे मोठी मदत होत आहे.

NLM Yojana 2026 या योजनेची पात्रता काय आहे?

जर तुम्हाला खरच या योजनेचा फायदा करून घ्यायचा असेल आणि सरकारकडून हे अनुदान मिळवायच असेल तर तुम्हाला शासनाने ठरवून दिलेल्या काही महत्त्वाच्या नियमांचे आणि अटींचे पालन करावे लागेल, तुम्ही फक्त अर्ज केला म्हणजे तुम्हाला हे अनुदान मिळेल अस नाहीये, त्यासाठी तुमच्याकडे काही ठरवून दिलेल्या पात्रता असल्या पाहिजे. जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या, तरच तुमचा अर्ज पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवला जातो. त्यामुळे अर्ज भरायच्या आधी खाली दिलेल्या अटी आणि शर्ती एकदा नीट समजून घ्या, म्हणजे नंतर तुमची धावपळ होणार नाही आणि कामात कोणतीच अडचण तुम्हाला येणार नाही. त्या अटी नेमक्या काय आहेत ते आपण आता सविस्तर पाहू.

शेतकरी स्वत अर्जदार असावा म्हणजे ह्या योजनेला अर्ज करणारा व्यक्ती हा भारतीय रहिवासी असला पाहिजे, आणि अर्ज करणारा व्यक्ती हा फक्त आनुदान भेटेल ह्या भावनेने नाही तर त्याला खरोखर व्यवसाय करण्याची इच्छा असली पाहिजे, आणि व्यवसाय करण्याची जिद्द असली पाहिजे, आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्या कडे स्वतःची जमीन असली पाहिजे आणि जर स्वतःचा नसेल तर भाडे तत्त्वावर असली तरी चालेल.

गट आणि संस्थाशेतकरी उत्पादक कंपन्या आता ज्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःची कंपनी स्थापन केळी असेल, ते सुद्धा या योजने साठी अर्ज करू शकतात. महिला बचत गट (SHG) म्हणजेच ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुद्धा या योजनेत लाभ दिले आहेत. संयुक्त दायित्व गट (JLG) म्हणजेच छोटे शेतकरी किंवा कारागीर लोक एकत्र येऊन गट तयार करतात, त्यांनाही NLM Yojana 2026 अंतर्गत मदत मिळते. सहकारी संस्था म्हणजेच गाव तालुक्यातील सहकारी संस्था ज्या पशुपालनाचे काम करायची इच्छा ठेवतात, त्या संस्था सुद्धा अर्ज करू शकतात. सेक्शन ८ कंपन्या म्हणजेच नफा न कमवायच्या हेतू ने ज्या कंपन्या सामाजिक काम करतात या कंपन्या सुद्धा दिलेल्या अटी पूर्ण करून अनुदान मिळवू शकतात.

कोणते व्यवसाय या योजनेसाठी पात्र असतात?

  1. कुक्कुटपालन: यात पक्षी पालन आणि अंडी उत्पादन.
  2. शेळीपालन: ह्या व्यवसाय मधे कमी खर्चात जास्त नफा काढता येतो.
  3. वराह पालन : यालाच डुक्कर पालन असेही म्हणतात, मांस निर्यातीसाठी हा व्यवसाय केला जातो.
  4. अधिकृत वेबसाइट वर तुम्हाला अजून बरेच व्यवसाय बघायला मिळतात, तुम्ही तिथून तुमच्या सोयीचा व्यवसाय निवडू शकतात!

NLM Yojana 2026 योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या एकूण खर्चावर ५०% सबसिडी मिळते, जीची एकूण रक्कम तुम्ही निवडलेल्या प्रोजेक्ट नुसार बदलते, खालील उदाहरण वाचून तुम्ही समजू शकतात.

  • एकूण खर्च १ कोटी रुपये
  • तुमचा हिस्सा (बँक कर्ज किंवा स्वताचे पैसे) ५० लाख रुपये
  • सरकारचे अनुदान (५०%) ५० लाख रुपये

समजा जर ह्या योजने अंतर्गत तुम्ही १ कोटीचा खर्च करून व्यवसाय सुरु करत असाल तर तुम्हाला सरकार त्यावर ५० लाख ची सबसिडी देते.

जर शेळी पालन करायचे असेल तर

शेळीपालनासाठी आवश्यक जनावरे महंजेच शेळी पालनसाठी तुमच्याकडे किमान ५०० शेळ्या आणि २५ बोकड असले पाहीजी, म्हणजे किमान ५२५ शेळ्या असणे गरजेचे आहे.

किती अनुदान (सबसिडी) मिळणार? तुमच्या प्रकल्पाचा खर्च सर्व गोष्टी पकडून जसे शेळ्या, शेड बांधकाम, चारा, व त्या व्यवसायावर झालेल्या इतर सर्व खर्चावर तुम्हाला ५०% अनुदान देते, जे अनुदान ५० लाख पर्यंत आहे, याचा अर्थ असा की जर तुमच्या शेळी पालनाच्या व्यवसायाला १ कोटी खर्च आला तर सरकार तुम्हाला त्यावर ५० लाख रुपये पर्यंत चे अनुदान देईल.

अनुदान २ टप्प्यांमधे दिले जाते सरकार तुम्हाला हे अनुदान २ टप्प्या मधे देत असते, ज्यात पहिला टप्पा तुम्हाला तेव्हा भेटतो जेवा बँक तुमच्या कर्जाचा पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा करते. “जर तुम्ही बँक कर्ज न काढता स्वतःच्या खर्चावर प्रोजेक्ट करत असाल तर तुमच्या प्रोजेक्टवर तुम्ही एकूण रक्कमेच्या २५% खर्च पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकार पहिल्या टप्प्यात अनुदान देत असते, अधिकारी तपासणी झाल्या नंतर“. आणि दुसरा टप्पा तुम्हाला तेव्हा भेटतो जेवा तुमच्या प्रोजेक्ट चे काम पूर्ण होते आणि अधिकारी येऊन त्याची तपासणी करतात त्याना जेवा वाटते की तुम्ही सर्व पैसे व्यवसायासाठी वापरले आहेत तेव्हा उरलेले पैसे तुम्हाला मिळतात.

जर तुम्हाला कुक्कुट पालन करायचे असेल तर

कुक्कुटपालनासाठी पक्ष्यांची किमान संख्या किती असते ते बघू आता यात कुक्कुट पालन करायचं असेल तर तुमच्या कडे कमीत कमी एक हजार (१०००) पक्षी असले पाहिजे

किती अनुदान मिळणार? समजा तुमच्या प्रकल्पाचा खर्च सर्व गोष्टी पकडून जसे कोंबड्या, त्यांना लागणारे शेड बांधकाम, त्यांचा चारा, व त्या व्यवसायावर झालेल्या इतर सर्व खर्चावर तुम्हाला सरकार ५०% अनुदान देते, आणि हे अनुदान जास्तीत जास्त २५ लाख पर्यंत असू शकते.

अनुदान २ टप्प्यांमधे दिले जाते. या मधे सुद्धा सरकार तुम्हाला अनुदान २ टप्प्या मधे देते ज्यात पहिला टप्पा तुम्हाला तेव्हा भेटतो जेवा बँक तुमच्या कर्जाचा पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा करते. “जर तुम्ही बँक कर्ज न काढता स्वतःच्या खर्चावर प्रोजेक्ट करत असाल तर तुमच्या प्रोजेक्टवर तुम्ही एकूण रक्कमेच्या २५% खर्च पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकार पहिल्या टप्प्यात अनुदान देत असते, अधिकारी तपासणी पूर्ण झाल्या नंतर, आणि दुसरा टप्पा तुम्हाला तेव्हा भेटतो जेवा तुमच्या प्रोजेक्ट चे काम पूर्ण होते आणि अधिकारी तपासणी करतात जेवा त्यांना वाटते की तुम्ही सर्व पैसे व्यवसायासाठी वापरले आहेत तेव्हा उरलेले पैसे तुम्हाला दिले जातात.

जर तुम्हाला डुक्कर पालन करायचे असेल तर

आवश्यक संख्या यात तुम्हाला कमीत कमी १०० मादी डुक्कर आणि १० नर डुक्कर घ्यावी लागतात आणि त्यांच्या मदतीने ब्रीडिंग फार्म सुरू करावे लागते, ज्यात ही डुक्करे चांगल्या अनुवंशिक दर्जाची असणे गरजेचे असते जे तुम्ही सरकारी फार्म किवा स्थानिक प्रगत शेती करणाऱ्या लोकांकडून घेऊ शकतात.

तुम्हाला तुमच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या ५०% अनुदान सरकार देते, डुक्कर पालनासाठी सरकार तुम्हाला जास्तीत जास्त ३० लाख रुपये चे अनुदान देते ज्या मधे डुकरांचे राहण्याचे शेड, ब्रीडिंगचा खर्च, आवश्यक मशिन, डुकरांचा विमा आणि वाहतूक खर्च यावर हे अनुदान तुम्हाला मिळते.

अनुदान २ टप्प्यांमधे दिले जाते या मधे सुद्धा सरकार तुम्हाला २ टप्प्या मधे अनुदान देते ज्यात पहिला टप्पा तुम्हाला तेव्हा भेटतो जेवा बँक कडून कर्जाचा पहिला टप्पा तुमच्या खात्यात जमा होतो, “जर तुम्ही बँक कर्ज न काढता स्वतःच्या खर्चावर प्रोजेक्ट करत असाल तर तुमच्या प्रोजेक्टवर तुम्ही एकूण रक्कमेच्या २५% खर्च पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकार पहिल्या टप्प्यात अनुदान देत असते, अधिकारी तपासणी झाल्या नंतर“. आणि दुसरा टप्पा तुमच्या प्रोजेक्ट चे काम पूर्ण झाल्या नंतर व अधिकारी तपासणी झाल्यानंतर तुमच्या खात्यात टाकला जातो.

यात लाभार्थ्याचा हिस्सा किती असतो?

५०% शासन अनुदान, २५% बँक कर्ज, २५% लाभार्थी हिस्सा अश्याप्रकारे लाभार्थींचा हिसा असतो

या योजनेमध्ये बँक गारंटी कशी असते? चला बघूया

NLM Yojana 2026 अंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी बँक गॅरंटी खूप महत्त्वाची आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकेची गॅरंटी असणे गरजेचे आहे, त्याशिवाय अनुदानाची प्रक्रिया पुढे जात नाही.

ही बँक गॅरंटी किमान ३ वर्षांसाठी वैलिड असली पाहिजे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड फोटो बँक खाते जमिनीचा पुरावा: स्वताची असेल तर (७/१२) जर भाडे तत्वावर असेल तर (अग्रीमेंट) गरजेचे प्रकल्प अहवाल प्रशिक्षण प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तर अधिकृत पोर्टल ला भेट द्या नंतर अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुमच्या नावाने नोदणी करा त्यानंतर खालील लिंक वर क्लिक करुन तुम्ही अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकतात.

नंतर तुमचा प्रकल्प निवडा वेबसाइट वर नोंदणी केल्या नंतर तिथून तुमच्या सोयीचा प्रकल्प निवडा. त्यानंतर प्रकपालाचा अहवाल अपलोड करा तुम्ही निवडलेल्या प्रकल्पांचा सविस्तर अहवाल तिथे अपलोड करा. आता सर्व कागदपत्रे अचूक अपलोड करा त्यानंतर तुमचं अर्ज सब्मिट करा

अर्ज सब्मिट करण्या अगोदर सर्व माहिती चेक करा आणि अर्ज सब्मिट करा. त्या नंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळतो.

या योजनेतील महत्त्वाच्या लिंक्स

NLM Yojana Official Websiteलिंक
योजनेचा ऑफिशल GRलिंक

आता अर्जानंतर ची प्रक्रिया पण जाणून घ्या

पडताळणी किंवा वेरिफिकेशन म्हणजे अर्जाची तांत्रिक तपासणी केली जाते, जस. तुमचा प्रोजेक्ट व्यवहार करण्या सारखा आहे कातुम्हाला लागणारा खर्च बरोबर आहे कातुमचा प्रोजेक्ट नियमां नुसार आहे का त्यानंतर जागेची तपासणी केळी जाते म्हणजे अधिकारी प्रत्येक्षात येऊन तुमची जागा तपासतात.एन पुरेशी जागा तुमच्या कडे आहे का? शेड बांधकाम शक्य आहे का? तुमचा प्रोजेक्ट प्रत्येक्षात शक्य आहे का?

आता बँक मंजूरी कशी मिळेल?

प्रोजेक्ट साठी बँकेच लोन आवश्यक असते, म्हणून बँक तुमच अर्ज तपासते, जसे, बँक तुमचं अर्ज तपासते तुमची पात्रता आहे का ते तपासते

अनुदान मंजुरी कशी केली जाते

सर्व प्रोसेस झाल्या नंतर शासन सबसिडी मंजूर करते आणि त्यानंतर टप्या टप्या मधे सबसिडी दिली जाते.

तुम्ही प्रोजेक्ट कमीत कमी ३ वर्ष चालवणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला मंजूर झालेली सबसिडी परत घेतली जाऊ शकते.

अर्ज Reject होण्याची कारणे काय असतात ते पण माहीत असणे आवश्यक आहे

जस चुकीची माहिती देणे असेल, अपूर्ण कागदपत्रे असणे, प्रकल्प नियमांचे पालन न करणे, स्वतःचा हिस्सा जमा न करणे

जर तुम्ही छोटा प्रोजेक्ट सुरू करायचा विचार करत असाल तर तुमच्या साठी ही योजना नाहीये, यात वरती दिलेल्या बाबी जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच हा प्रोजेक्ट निवडा.

या योजनेतून काय निष्कर्ष निघतो?

तर मित्रांनो, सगळं बघितलं तर NLM Yojana 2026 ही आपल्या पशुपालन करणाऱ्या लोकांसाठी एकदम भारी स्कीम आहे. या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा मोठा धंदा उभा करू शकता. सरकारच्या जीआरमध्ये सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर सांगितल्या आहेत कोणत्या व्यवसायासाठी किती जनावरं लागतील आणि किती पक्षी पाहिजेत, हे सगळं त्यात दिलंय. जसं की शेळीपालनासाठी तुम्हाला ५२५ शेळ्या लागतील, मेंढीपालनासाठी सुद्धा ५२५ मेंढ्यांची अट आहे आणि कुक्कुटपालन करायचं तर १००० पासून ५००० पर्यंत पक्षी लागतील हे सगळं वरती डीटेल मधे सांगितल आहे, आणि मित्रांनो लक्षात ठेवा ही योजना खासकरून त्यांच्यासाठी आहे ज्यांना मोठ्या लेव्हलवर काम करायच आहे.

फक्त एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला सरकारकडून एवढी मोठी सबसिडी किंवा आर्थिक मदत पाहिजे असेल तर तुमचे सर्व कागदपत्रे परफेक्ट पाहिजे, कागदपत्रात जर काही गडबड नसेल आणि तुम्ही व्यवस्थित अर्ज केला, तर शासनाकडून चांगलं पैसे मिळतात आणि व्यवसायाला मोठी मदत होते. त्यामुळे ही संधी सोडू नका, कारण अशा योजनांमुळेच ग्रामीण भागात बदल घडून येईल आणि तरुणांच्या हाताला चांगलं काम मिळेल. NLM Yojana 2026 खरोखर तुमच नशीब बदलू शकते जर तुम्ही नीट व्यवसाय केला तर.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

वैयक्तिक उद्योजक, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयं सहाय्यता गट (SHG), सेक्शन ८ अंतर्गत असलेल्या कंपन्या (Section 8 Companies).
अट: अर्जदाराकडे संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण किंवा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सबसिडीची रचना कशी आहे?

सरकार एकूण खर्चावर ५०% सबसिडी देते, ही सबसिडी SIDBI मार्फत दोन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी ५०%) दिली जाते.
यामध्ये कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, डुक्कर पालन आणि चारा प्रोड्यूस करण्याचा समावेश होतो.

सबसिडीची मर्यादा किती आहे?

कुक्कुटपालन ₹२५ लाख, शेळी आणि मेंढी पालन ₹५० लाख, वराह पालन ₹३० लाख, चारा युनिट्स ₹५० लाख

अर्ज कसा करावा?

व्यवसायाची इच्छा असणाऱ्या अर्जदारांनी NLM UdyamiMitra Portal वर ऑनलाइन जाऊन आपला प्रस्ताव मांडणे गरजेचे आहे.
जेव्हा सरकार ‘Expression of Interest’ (EOI) देते, तेव्हाच हे अर्ज करता येतात.

कोणत्या गोष्टींसाठी सबसिडी मिळणार नाही?

जमीन खरेदी करणे, जमीन भाड्याने घेणे, स्वतःसाठी खाजगी वाहने खरेदी करणे.

उर्वरित ५०% पैशांची सोय कशी करावी?

प्रकल्पाचा उरलेला ५०% खर्च अर्जदाराला म्हणजे तुम्हाला स्वतः करावा लागतो, यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता (बँक कर्जासाठी १०% स्वतःचे भांडवल गरजेचे आहे) किंवा स्वतःच्या पैशातून हा प्रकल्प सुरू करू शकतात.

देखरेख आणि मॉनिटरिंग

या योजनेअंतर्गत तयार केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी जिओ टॅगिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जेणेकरून पारदर्शकता राहील.

Leave a Comment