Swanath Scholarship Yojana 2026: अनाथ विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये मदत! योजनेची पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती

मित्रांनो आजच्या काळात शिक्षण घेणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण ज्या मुलांनी त्यांच्या लहानपणीच आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावलं आहे आता त्यांच्यासाठी शिक्षण पूर्ण करणं खूप अवघड होऊन जातं. फी कशी भरायची, पुस्तकं कशी घ्यायची हे सगळे प्रश्न त्यांच्या डोक्यात सतत घोंगावत असतात. घरात कमावणारं कोणी नसलं की शिक्षणाचा विचार बाजूला ठेवून आधी पोटापाण्याचा विचार करावा लागतो, आणि मग हुशार असूनही अनेक मुलं शिक्षण अर्धवट सोडून देतात. अशाच मुलांसाठी केंद्र सरकारने एक खूप चांगली योजना सुरू केली आहे आणि तिचं नाव आहे Swanath Scholarship Yojana 2026 आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

माझ्या ओळखीच्या एका ताईचा मुलगा आहे जो नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहतो आणि त्याच्या वडिलांचं कोविड काळात निधन झालं आणि त्याच्या घरची परिस्थिती एकदम बिघडली. आई घरकाम करून कसंबसं घर चालवत होती आणि अशा परिस्थितीत डिप्लोमाचं शिक्षण त्याला अर्धवट सोडावं लागेल की काय अशी वेळ आली होती.

पण आता त्याच्या कॉलेजमधल्या एका शिक्षकांनी त्याला या योजनेबद्दल सांगितलं आणि त्याने अर्ज केला. सुरुवातीला त्याला वाटलं होतं की एवढी मोठी मदत खरंच मिळेल का, पण काही महिन्यांतच त्याच्या खात्यावर पैसे जमा झाले आणि त्याचा विश्वासच बसला नाही. आज तो त्याच पैशातून आपलं डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण करतोय आणि त्याच्या घरच्यांना थोडा आधारही देतोय. अशी अनेक मुलं आपल्या आजूबाजूला असतील, ज्यांना कदाचित अशा योजनेची त्यांना माहितीच नसेल त्यामुळे ही पोस्ट वाचल्यानंतर ती गरजू कुटुंबांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत आणि शेजाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.

Swanath Scholarship Yojana 2026 म्हणजे नक्की काय?

मित्रांनो अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच AICTE कडून ऑक्टोबर 2021 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आणि त्यावेळी कोविडच्या लाटेमुळे लाखो कुटुंबांनी आपली कमावती माणसं गमावली होती आणि त्यातल्या अनेक मुलांचं शिक्षण थांबण्याची भीती निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर अनाथ मुलं, कोविड मुळे आई वडील गमावलेली मुलं आणि सैन्यात किंवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांची मुलं या तिघांनाही तांत्रिक शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी ही मदत दिली जाते. AICTE मान्यताप्राप्त संस्थांमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यातून आर्थिक पाठबळ मिळतं म्हणजे त्यांचं शिक्षण मध्येच थांबू नये आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहून पुढे जाऊ शकतील.

किती पैसे मिळतात? चला सर्व बघूया

या योजनेत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याला दरवर्षी 50 हजार रुपये दिले जातात आणि डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 4 वर्षांसाठी आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 3 वर्षांसाठी हे पैसे मिळू शकतात याचा अर्थ काय तर संपूर्ण कोर्स कालावधीत एका डिग्रीच्या विद्यार्थ्याला जवळपास 2 लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. जर विद्यार्थी सध्या दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात असेल, तर उरलेल्या वर्षांसाठीच ही रक्कम दिली जाते म्हणजे जो विद्यार्थी थेट दुसऱ्या वर्षात अर्ज करतोय त्याला उरलेल्या 3 वर्षांचीच रक्कम मिळेल.

हे पैसे कॉलेजची फी भरण्यासाठी, वह्या पुस्तकं घेण्यासाठी आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी वापरता येतात. मात्र त्याला होस्टेलचा खर्च किंवा मेडिकल खर्चासाठी ही रक्कम दिली जात नाही हे लक्षात ठेवणे सुधा गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला खर्चाचा हिशोब आधीच नीट लावून ठेवावा.

दरवर्षी देशभरातून एकूण 2000 विद्यार्थ्यांची निवड होते आणि त्यातले 1000 डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 1000 डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. पैसे थेट DBT पद्धतीने विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे मध्यस्थांची काही गरज पडत नाही आणि पैसे वेळेत आणि पूर्ण रकमेत हातात मिळतात.

तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात का? समजून घेऊ

आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पात्रता. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी अनाथ असावा किंवा त्याच्या आई वडिलांपैकी एकाचं किंवा दोघांचंही निधन कोविड मुळे झालेलं असावं किंवा तो सैन्यदलात किंवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात शहीद झालेल्या जवानाचा मुलगा किंवा मुलगी असावी. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांमधून मिळून 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं आणि यासाठी राज्य सरकारने दिलेला उत्पन्नाचा दाखला सोबत जोडावा लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी सध्या AICTE मान्यताप्राप्त संस्थेत डिग्री किंवा डिप्लोमाच्या पहिल्या असेल दुसऱ्या असेल तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात नियमित पद्धतीने शिकत असावा. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो विद्यार्थी आधीपासून केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा AICTE कडून दुसरी कोणतीही शिष्यवृत्ती घेत नसावा आता या चारही अटी पूर्ण झाल्या तरच विद्यार्थी Swanath Scholarship Yojana 2026 साठी पात्र ठरतो.

निवडीचा निकष सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे.

डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावी किंवा समकक्ष परीक्षेतल्या टक्केवारीवर निवड केली जाते तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या टक्केवारीवर निवड होते. म्हणजे इथे कोणतीही स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जात नाही, फक्त तुमच्या आधीच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारावरच गुणवत्ता यादी तयार केली जाते. दोन विद्यार्थ्यांची टक्केवारी सारखी आली तर आधी दहावीचे मार्क बघितले जातात आणि त्यानंतरही टाय राहिला तर वयाने मोठा असलेला विद्यार्थी याला प्राधान्य मिळवतो आणि शेवटी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आरक्षणाबाबत सांगायचं झालं तर यात केंद्र सरकारच्या नियमांनुसारच आरक्षण दिलं जातं त्यामुळे SC, ST, OBC आणि इतर संवर्गातल्या विद्यार्थ्यांनाही योग्य तो लाभ मिळतो.

लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

आता कागदपत्रांबद्दल बोलूया कारण यामुळे बऱ्याचदा अर्ज नाकारला जातो. जर विद्यार्थी अनाथ असेल तर आई आणि वडील दोघांचेही मृत्यू दाखले लागतात किंवा तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेलं प्रमाणपत्र चालतं भावांनो कोविड मुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी मृत्यू कोविडमुळेच झाला हे स्पष्टपणे नमूद असलेला दाखला लागतो आणि जर एक पालक जिवंत असेल तर उत्पन्नाचा चालू वर्षाचा दाखलाही जोडावा लागतो आता शहीद जवानांच्या पाल्यांसाठी मृत्यू दाखला असेल संबंधित दलाकडून दिलेलं शहीद प्रमाणपत्र असेल किंवा उत्पन्नाचा दाखला लागतो. या शिवाय तिन्ही गटांसाठी कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट असेल दहावी आणि बारावीची मार्कशीट आणि जात प्रमाणपत्र अपलोड करावं लागतं. सगळी कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईझमध्ये आणि स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात अपलोड करावी लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचा Aadhaar क्रमांक असल्याशिवाय अर्जच स्वीकारला जात नाही, त्यामुळे आधी आधार कार्ड तयार असल्याची आणि ते बँक खात्याशी लिंक असेल हे बघून घ्या.

यासाठी अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप बघूया

अर्ज करण्याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे सगळ्यात आधी विद्यार्थ्याला National Scholarship Portal वर Online पद्धतीने नोंदणी करावी लागते आणि यासाठी आधी OTR म्हणजे One Time Registration पूर्ण करावी लागते आता नोंदणी झाल्यावर आपली सगळी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून वर सांगितलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतात. माहिती भरताना नाव जन्मतारीख आणि आधार कार्डवरची माहिती अगदी जशीच्या तशी टाकावी लागते कारण थोडा जरी फरक असला तरी अर्ज नाकारला जाऊ शकतो.

त्यानंतर विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजकडून हा अर्ज पडताळला जातो आणि यासाठी कॉलेजच्या स्कॉलरशिप सेलशी संपर्कात राहणं फायद्याचं आहे त्यानंतर संबंधित राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दुसऱ्या स्टेप पडताळणी होते आणि मगच अर्ज पुढे AICTE कडे पाठवला जातो. दरवर्षी एकदाच अर्ज मागवले जातात आणि त्यामुळे पोर्टल कधी उघडतं याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर 31, 2026 आहे त्यामुळे उशीर न करता लवकरात लवकर अर्ज पूर्ण करा आणि शेवटच्या दिवसाची वाट बघू नका कारण वेबसाईटवर गर्दी झाली की सर्व्हर स्लो होण्याची शक्यता असते.

भावांनो एकदा निवड झाल्यानंतरही दरवर्षी अर्ज हा नव्याने भरावा लागतो याला रिन्युअल म्हणतात. पुढच्या वर्षी शिष्यवृत्ती चालू ठेवण्यासाठी प्रमोशन सर्टिफिकेट आणि बोनाफाईड सर्टिफिकेट पोर्टलवर सादर करावं लागतं आणि हे रिन्युअलचं काम दरवर्षी वेळेत करणं खूप गरजेचं आहे म्हणजे एकदा का मुदत निघून गेली की मागच्या वर्षी मिळालेली शिष्यवृत्ती असूनही पुढच्या वर्षी ती मिळणार नाही आता विद्यार्थी पुढच्या वर्गात गेला नाही किंवा वेळेत रिन्युअल अर्ज केला नाही तर शिष्यवृत्ती बंद होते हे जाणून घेणं सुधा गरजेचं आहे.

Swanath Scholarship Yojana 2026 साठी महत्वाच्या लिंक.

योजेचा Official GR (Guidelines)इथे क्लिक करा
National Scholarship Portal इथे क्लिक करा
योजनेची Official Website इथे क्लिक करा

महत्त्वाच्या अटी आणि लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

मित्रांनो विद्यार्थी जर याच काळात दुसऱ्या कोणत्याही ठिकाणाहून शिष्यवृत्ती असेल पगार किंवा स्टायपेंड घेत असेल तर मात्र या शिष्यवृत्तीची रक्कम बंद केली जाते आणि आधी मिळालेली संपूर्ण रक्कम परत करावी लागते आणि त्यामुकेच एकाच वेळी दोन शिष्यवृत्त्या घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तसंच अपूर्ण अर्ज थेट नाकारला जातो त्यामुळे सगळी माहिती आणि कागदपत्रे नीट तपासूनच अर्ज सबमिट करा. जर मार्कशीटवर CGPA दिलेला असेल तर तो टक्केवारीत बदलण्यासाठी 9.5 ने गुणावा लागतो आणि जर मार्कशीटवर टक्केवारी आणि CGPA दोन्ही दिलेले असतील तर टक्केवारीच ग्राह्य धरली जाते.

आमच्या ओळखीत आणखी एक उदाहरण आहे भावांनो आमच्या गावातली मुलगी जिच्या वडिलांचं सैन्यात कर्तव्य बजावताना निधन झालं होतं. तिने डिग्रीच्या पहिल्या वर्षी Swanath Scholarship Yojana 2026 साठी अर्ज केला आणि आज ती तिसऱ्या वर्षात शिकतेय आणि याच पैशातून तिने लॅपटॉपही घेतला. ती नेहमी सांगते की या योजनेमुळे तिचं शिक्षण अर्ध्यावर थांबलं नाही आणि आजही ती म्हणते या मदतीमुळेच मी आज माझ्या पायावर उभी राहू शकतेय.अशा किती तरी मुलांचं आयुष्य हे एका शिष्यवृत्तीमुळे बदलू शकतं, त्यामुळे तुमच्या ओळखीत असा कोणी असेल तर त्याला ही माहिती नक्की द्या.

आता थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो

तर मित्रांनो एकंदरीत सांगायचं झालं तर अनाथ कोविडमुळे पालक गमावलेले किंवा शहीद जवानांचे पाल्य असलेले विद्यार्थी ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे आणि जे AICTE मान्यताप्राप्त संस्थेत डिग्री किंवा डिप्लोमा शिकत आहेत ते सगळे या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि दरवर्षी 50 हजार रुपये, डिग्रीसाठी 4 वर्षे आणि डिप्लोमासाठी 3 वर्षे मिळणारी ही मदत National Scholarship Portal वरून Online अर्ज करून मिळवता येते. आधार क्रमांक बंधनकारक आहे आणि कागदपत्रे पूर्ण असणं गरजेचं आहे याची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2026 आहे.

मुद्दामाहिती
योजनेचं नावSwanath Scholarship Yojana
सुरुवातऑक्टोबर 2021, AICTE कडून
लाभार्थीअनाथ, कोविड मुळे पालक गमावलेले, शहीद जवानांचे पाल्य
उत्पन्न मर्यादा8 लाख रुपये प्रतिवर्ष
मिळणारी रक्कमदरवर्षी 50 हजार रुपये
कालावधीडिग्रीसाठी 4 वर्षे, डिप्लोमासाठी 3 वर्षे
एकूण जागादरवर्षी 2000 (1000 अधिक 1000)
अर्ज पद्धतNational Scholarship Portal, Online
शेवटची तारीख31 ऑक्टोबर 2026

या योजनेचा नेमका निष्कर्ष काय निघतो.

शिक्षण हे कोणाच्याही आयुष्यातलं सगळ्यात मोठं शस्त्र असतं आणि नुसत्या पैशाअभावी कोणाचंही शिक्षण अर्धवट राहू नये यासाठीच अशा योजना तयार केल्या जातात आणि त्यामुळेच Swanath Scholarship Yojana 2026 ही अशीच एक संधी आहे जी अनेक मुलांचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. फक्त गरज आहे ती योग्य वेळी योग्य माहिती त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची.

आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला ही माहिती आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे की ती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचं तरी अर्धवट राहणारं शिक्षण पूर्ण होईल. यापेक्षा मोठं समाधान काय असेल?

Swanath Scholarship Yojana 2026 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Swanath Scholarship Yojana 2026 साठी वयाची अट आहे का?

नाही, थेट वयाची कोणतीही मर्यादा दिलेली नाही, मात्र टाय ब्रेकिंगसाठी वय बघितलं जातं.

डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीसाठी अर्ज करता येतो का?

होय, दोन्ही स्तरांवरचे विद्यार्थी पात्र आहेत, फक्त कोर्स AICTE मान्यताप्राप्त हवा.

Swanath Scholarship Yojana 2026 साठी अर्ज कुठे करायचा असतो?

संपूर्ण अर्ज प्रक्रिया National Scholarship Portal वर Online पद्धतीने होते.

शिष्यवृत्तीचे पैसे कसे मिळतात?

पैसे थेट DBT पद्धतीने विद्यार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात.

दुसरी शिष्यवृत्ती घेत असल्यास अर्ज करता येतो का?

नाही, आधीपासून कोणतीही सरकारी शिष्यवृत्ती घेत असाल तर Swanath Scholarship Yojana 2026 पात्र ठरत नाही.

दरवर्षी नव्याने अर्ज करावा लागतो का?

पहिल्यांदा अर्ज केल्यानंतर पुढच्या वर्षी रिन्युअल अर्ज करावा लागतो, नवीन अर्ज नाही.

उत्पन्नाचा दाखला किती जुना असावा?

चालू आर्थिक वर्षातलाच वैध उत्पन्नाचा दाखला लागतो.

अर्ज नाकारला तर पुन्हा संधी मिळते का?

अर्ज नाकारला तर पुन्हा संधी मिळते का? पुढच्या वर्षीच्या चक्रात पुन्हा नव्याने अर्ज करता येतो, मात्र कागदपत्रे पूर्ण असणं गरजेचं आहे.

होस्टेल किंवा मेडिकल खर्चासाठी वेगळे पैसे मिळतात का?

नाही, ही रक्कम फक्त फी, पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्यासाठीच असते, होस्टेल किंवा मेडिकल खर्चासाठी वेगळी तरतूद नाही.

मेरिट लिस्टबद्दल तक्रार कुठे करता येते?

मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यापासून एका महिन्याच्या आत AICTE च्या पोर्टलवर तक्रार नोंदवता येते, त्यानंतर तक्रार स्वीकारली जात नाही.

Leave a Comment