Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026: SC शेतकऱ्यांना 6 लाख 92 हजार रुपये लाभ! संपूर्ण माहिती

Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 या योजनेची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भावांनो शेतामध्ये काम करणारा एखादा SC किंवा नवबौद्ध शेतकरी तुमच्या ओळखीमध्ये आहे का? ज्या शेतऱ्याला विहीर खोदायची आहे पण त्यांच्याकडे पैसे नाहीत? ड्रिप लावायचं आहे पण त्याला खर्च परवडत नाही? तर आज मी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलोय. कारण महाराष्ट्र शासनाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी एक नवीन शासन निर्णय काढला आहे आणि या निर्णयामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

माझ्या ओळखीचे एक काका आहेत आणि ते अनुसूचित जातीचे शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहतात. त्यांच्याकडे जमीन आहे पण पाण्याची सोय नाही. उन्हाळ्यात त्याच पीक जळतं. विहीर खोदायला पैसे नाहीत. सरकारी योजना आहेत हे त्यांना माहित होतं पण नक्की काय मिळतं हे कुणी नीट सांगितलं नव्हतं. मग आम्ही एकत्र बसून हा नवीन GR वाचला आणि ते थक्कच झाले. कारण या योजनेत एकट्या विहिरीसाठी 4 लाख रुपये मिळतात. आणि बाकी सगळ्या गोष्टी धरल्या तर एकूण 6 लाख 92 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं.

आता भावांनो हे वाचून तुम्हाला वाटेल की असं कसं होईल? तर सांगतो. हे सगळं महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णयात लिहिलेलं आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 याची सर्व माहिती सांगणार आहे. तुमच्या गावात, नातेवाईकांमध्ये कुणी SC किंवा नवबौद्ध शेतकरी असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा नक्की फायदा होईल.

Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 म्हणजे नक्की काय? चला समजून घेऊया

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि त्यांनी शेतीत अग्रेसर व्हावं यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विहीर, ड्रिप, तुषार सिंचन, पंप, पाईप या सर्वांसाठी थेट अनुदान मिळतं. आता 1 ऑक्टोबर 2024 च्या नवीन GR नुसार या योजनेचे आर्थिक निकष वाढवले आहेत आणि काही नवीन घटक देखील समाविष्ट केले आहेत.

या योजनेत नक्की कोणकोणत्या गोष्टी मिळतात आणि किती पैसे मिळतात?

आता हा प्रश्न तर सगळ्यांना पडतोच की Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 मधे नवीन GR नुसार प्रत्येक घटकाची सविस्तर माहिती सांगतो.

नवीन सिंचन विहिरीसाठी 4 लाख रुपये मिळतात शेतात पाणी नाही म्हणजे शेती नाही. विहीर हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा आधार असतो. या योजनेत नवीन सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळतं. आधी विहीर किमान 12 मीटर खोल असावी अशी अट होती पण या नवीन GR नुसार ती अट रद्द केली आहे. त्यामुळे आता 4 लाख रुपयांच्या मर्यादेत जितकी खोली करता येईल तितकी विहीर खोदता येते. शेतकऱ्याने एकदा नवीन विहिरीचा लाभ घेतला असेल तर 20 वर्षांनंतर जुन्या विहीर दुरुस्तीचा लाभ घेता येतो.

जुनी विहीर दुरुस्ती साठी 1 लाख रुपये मिळतात जसं काही शेतकऱ्यांकडे जुनी विहीर आहे पण ती नीट नाही. गाळ साचलाय, भिंती ढासळल्यात. अशा विहिरींच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये अनुदान मिळतं. जुनी विहीर व्यवस्थित झाली तर पाण्याची मोठी समस्या सुटते.

शेततळ्याचं Plastic Lining साठी 2 लाख रुपये मिळतात जसं अनेक शेतकऱ्यांनी शेततळं केलेलं असतं पण त्यातून पाणी जिरतं. Plastic Lining केल्यास पाणी टिकतं. या योजनेत शेततळ्याचं Plastic Lining करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 2 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान मिळतं. महत्त्वाचं म्हणजे आधी दुसऱ्या योजनेतून शेततळं केलेलं असलं किंवा स्वखर्चाने शेततळं केलेलं असलं तरी Plastic Lining साठी या योजनेचा लाभ घेता येतो.

Inwell Borewell साठी 40 हजार रुपये मिळतात जसं विहिरीत पाणी कमी असेल किंवा उन्हाळ्यात आटत असेल तर Inwell Borewell हा चांगला उपाय असतो. विहिरीच्या आतमध्येच Borewell केल्याने खोलवरचं पाणी मिळतं. यासाठी 40 हजार रुपये अनुदान मिळतं. आधी दोन सिंचन विहिरींमध्ये 500 फूट अंतर असावं अशी अट होती ती नवीन GR नुसार रद्द केली आहे.

वीज जोडणी आकार यासाठी 20 हजार रुपये मिळतात जसं विहीर आहे पण वीज जोडणी नाही म्हणजे पाणी उपसणार कसं? वीज जोडणीसाठी MSEB कडे जो आकार भरावा लागतो त्यासाठी 20 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष आकार यापैकी जे कमी असेल ते अनुदान मिळतं.

Electric Pump किंवा Diesel Engine यासाठी 40 हजार रुपये मिळतात हा या योजनेत नवीन समाविष्ट केलेला पार्ट आहे. 10 BHP Electric Pump किंवा Diesel Engine साठी प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 40 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते मिळतं. आधी Pump साठी वेगळी योजना होती पण आता थेट या योजनेतच मिळतं.

Solar Pump यासाठी तर 50 हजार रुपये मिळतात जस वीज जोडणी नसेल किंवा वीज जोडणीऐवजी Solar Pump घ्यायचा असेल तर 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळतं. Solar Pump एकदा बसवला की वीज बिलाची काळजी नाही आणि पाणी उपसणं सोपं होतं. ज्या शेतकऱ्याला Mahavitaran कडून Solar Pump मंजूर झाला असेल त्याचा लाभाचा हिस्सा सामाजिक न्याय विभागाकडून Mahavitaran कडे भरला जातो.

HDPE किंवा PVC Pipe यासाठी 5० हजार रुपये जर विहिरीतून शेतात पाणी न्यायला Pipe लागतात. हे Pipe महाग असतात. या योजनेत HDPE किंवा PVC Pipe साठी प्रत्यक्ष खर्चाच्या 100% म्हणजे पूर्ण खर्च किंवा 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते मिळतं. हा घटक पण नवीन GR मध्ये नव्याने समाविष्ट केला आहे आणि 100% अनुदान असल्याने हे खूप फायद्याचं आहे.

तुषार सिंचन संच घेण्यासाठी 47 हजार रुपये जस तुषार सिंचन म्हणजे Sprinkler. पाण्याचा शिडकावा होतो आणि पीक चांगलं येतं. यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 47,000 रुपये यापैकी जे कमी असेल ते मिळतं. ज्यांना Drip नको आहे पण सिंचनाची सुविधा हवी आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

ठिबक सिंचन संच घेण्यासाठी 97 हजार रुपये मिळतात जस ठिबक सिंचन म्हणजे Drip Irrigation. थेंब थेंब पाणी झाडाच्या मुळाशी जातं त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पन्न वाढतं. यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 97 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते मिळतं. ठिबक सिंचन हे आधुनिक शेतीसाठी सर्वात उपयुक्त साधन आहे आणि या योजनेत त्यासाठी चांगलं अनुदान मिळतं.

यंत्रसामग्री साठी ५० हजार रुपये मिळतात हा देखील नवीन घटक आहे. बैलचलित किंवा Tractor चलित अवजारांसाठी 50 हजार रुपये अनुदान मिळतं. नांगर, कोळपणी यंत्र, पेरणी यंत्र अशा गोष्टींसाठी हा लाभ घेता येतो.

परसबाग यासाठी 5 हजार रुपये जस घराच्या मागे छोटी भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग. यासाठी 5 हजार रुपये अनुदान मिळतं. घरच्या घरी ताजा भाजीपाला मिळतो आणि खर्च वाचतो.

Package नुसार एकूण किती लाभ मिळतो?

भावांनो GR मध्ये तीन प्रकारचे Package दिलेले आहेत. नवीन विहीर घेणाऱ्या शेतकऱ्याला सर्व घटक मिळाल्यास एकूण 6 लाख 42 हजार ते 6 लाख 92 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. तुषार सिंचन असेल तर 6,42 हजार आणि ठिबक सिंचन असेल तर 6,92 हजार रुपये.

जुनी विहीर दुरुस्त करणाऱ्या शेतकऱ्याला एकूण 3 लाख 42 हजार ते 3 लाख 92 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं.

शेततळ्याचं Plastic Lining घेणाऱ्या शेतकऱ्याला एकूण 4 लाख 2 हजार ते 4 लाख 52 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं.

हे पैसे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात PFMS द्वारे जमा होतात.

Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 चा फायदा घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का? समजून घेऊ

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे GR मध्ये पात्रतेच्या अटी स्पष्टपणे दिल्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असणं महत्वाचं आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावे 7/12 उतारा आणि 8-अ चा उतारा असणं आवश्यक आहे. आधार कार्ड आणि आधार लिंक बँक खातं असणं आवश्यक आहे.

उत्पन्न मर्यादा याची जुनी अट आता पूर्णपणे कट केली आहे. आता फक्त किमान 0.40 हेक्टर आणि जास्तीत जास्त 6 हेक्टर जमीन असावी एवढीच अट आहे. दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 6 हेक्टरची अट पण लागू नाही आणि त्यांना प्रथम प्राधान्य मिळतं.

जर दोन किंवा अधिक शेतकऱ्यांची जमीन एकत्र असल्याने 0.40 हेक्टरपेक्षा कमी असेल तर त्यांनी एकत्र येऊन करार केल्यास एकत्रित जमीन 0.40 हेक्टर होत असल्यास योजनेचा लाभ मिळतो. एकदा पूर्ण लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्षे त्याच शेतकऱ्याला किंवा कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही हे पण समजून घ्या.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? चला खाली बघू

आता सर्वात आधी या योजनेसाठी MahaDBT Portal म्हणजेच mahadbt.maharashtra.gov.in वर Online अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून याची अंमलबजावणी केली जाते. निवड ही त्या-त्या वर्षी उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत केली जाते. पैसे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात PFMS द्वारे जमा होतात.

या योजनेसाठीच्या महत्वाच्या लिंक

योजनेचा Official GRलिंक
योजनेची Official Website लिंक

चला याच एक उदाहरण पाहूया

रमेशकाका हे नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जातीचे शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू जमीन आता त्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यामुळे एकच पीक होतं. MahaDBT Portal वर त्यांनी अर्ज केला. नवीन विहीर, Inwell Borewell आणि ठिबक सिंचन संच या घटकांचा त्यांना लाभ मिळाला आणि एकूण 5 लाखांपेक्षा जास्त अनुदान थेट बँक खात्यात आलं. आता वर्षात दोन पिकं घेतात. उत्पन्न वाढलंय आणि मुलांचं शिक्षण सुरळीत सुरू आहे.

हीच या योजनेची ताकद आहे फक्त एका अनुदानामुळे शेताचा कायापालट होतो उत्पन्न डबल होते.

आता थोडक्यात सांगायचं तर

Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 यामधे अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे. नवीन GR दिनांक 1 ऑक्टोबर 2024 नुसार आर्थिक निकष वाढवले आहेत. नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये मिळतात. एकूण Package नुसार 6 लाख 92 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. उत्पन्न मर्यादेची जुनी अट रद्द केली आहे. किमान 0.40 हेक्टर जमीन असणं आवश यक आहे. MahaDBT Portal वर Online अर्ज करायचा आहे. पैसे थेट आधार संलग्न बँक खात्यात येतात.

आता याचा निष्कर्ष नेमका काय आहे?

मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना म्हणजे SC आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही म्हणून त्यांना शेती सोडायची गरज नाही. सरकार या योजनेत लाखो रुपयांचं अनुदान देतं आणि ते सुधा थेट बँक खात्यात येतं.

जर तुमच्या गावात, नातेवाईकांमध्ये, ओळखीत कुणी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असेल तर वेळ न वाया घालता MahaDBT Portal वर जाऊन अर्ज करा किंवा जवळच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करा.

आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे. ही पोस्ट एखाद्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचली तर त्याच्या शेताचा कायापालट होऊ शकतो. आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?

Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 ही योजना कोणासाठी आहे?

भावांनो ही योजना महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे.

या योजनेत नेमके किती पैसे मिळतात?

नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये मिळतात. सर्व घटक एकत्र घेतल्यास 6 लाख 92 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं.

यासाठी लागणारी उत्पन्न मर्यादा किती आहे?

नवीन GR नुसार Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 याचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. फक्त किमान 0.40 हेक्टर जमीन असणं आवश यक आहे.

Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 चा अर्ज कुठे करायचा?

MahaDBT Portal म्हणजेच mahadbt.maharashtra.gov.in वर Online अर्ज करायचा आहे.

Solar Pump साठी किती अनुदान मिळतं?

Solar Pump साठी 50000 रुपयांपर्यंत अनुदान मिळतं.

ठिबक सिंचनासाठी किती मिळतं?

ठिबक सिंचन संचासाठी 97000 रुपयांपर्यंत अनुदान मिळतं.

एकदा लाभ मिळाला तर पुन्हा कधी अर्ज करता येतो?

एकदा पूर्ण लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्षे त्याच शेतकऱ्याला किंवा कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळत नाही.

यातून शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतात?

Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 यात पैसे थेट आधार संलग्न बँक खात्यात PFMS द्वारे जमा होतात.

Leave a Comment