मित्रांनो आपल्या कुणाच्या ना कुणाच्या घरात एकतारी मुलगी डिप्लोमा करत असेल आणि तिच्या घरची परिस्थिती थोडी कमीआहे तर हे वाचा. कारण आज मी तुम्हाला एका अशा स्कॉलरशिप बद्दल सांगणार आहे जी खूप कमी मुलींना माहित आहे आणि ज्यामुळे दरवर्षी हजारो मुलींचं शिक्षण पूर्ण होतं.
आता तुम्हाला सांगतो माझ्या ओळखीची एक मुलगी आहे नाशिकजवळची. घरची परिस्थिती बेताची आणि तिची इच्छा Diploma करायची होती पण तिची फी भरायला पैसे नाहीत आणि मग तिच्या कॉलेज च्या एका सरांनी सांगितलं की AICTE Pragati Scholarship Yojana 2026 आहे ज्यात प्रेत वर्षी ५० हजार रुपये मिळतात. तिने अर्ज केला तिची निवड झाली आणि आज ती मस्तपणे डिप्लोमा करतेय. फी ची काळजी नाही आणि पुस्तकांची पण ची काळजी नाही.
त्यामुळे आज मी तुम्हाला याची सर्व डिटेल माहिती सांगणार आहे म्हणजे तुमच्या घरात, शेजारी, नातेवाईकांमध्ये कुणीही डिप्लोमा करणारी मुलगी असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण ही माहिती त्यांच्या खूप कामात येणार आहे.
AICTE Pragati Scholarship Yojana 2026 म्हणजे नक्की काय?
भावांनो AICTE म्हणजेच All India Council for Technical Education या संस्थेने AICTE Pragati Scholarship Yojana 2026 ही सुरू केली आहे आणि या योजनेचा उद्देश अगदी साधा आणि सुंदर आहे कारण डिप्लोमा सारखं तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना आर्थिक मदत द्यायची आणि त्यांना शिक्षणात पुढे जाण्याची संधी द्यायची आहे आणि Empowering Women through Technical Education हा या योजनेचा मुख्य उद्देश आहेच म्हणजे तांत्रिक शिक्षणाद्वारे महिलांना सक्षम करणे हीच या योजनेची मूळ भावना आहे.
AICTE Pragati Scholarship Yojana 2026 मध्ये नक्की किती पैसे मिळतात?
मित्रांनो हा प्रश्न तर पडणारच की, तर सागतो तुम्हाला सांगतो. दरवर्षी 50 हजार रुपये मिळतात. हे पैसे कॉलेज फी, कंप्यूटर, पुस्तके, स्टेशनरी, वस्तू, सॉफ्टवेयर यासाठी वापरता येतात आणि हे lump sum amount म्हणून दिलं जातं असं लिहिलंय म्हणजे कशासाठी वापरलं हे सांगायची गरज नाही, कुठलंही Documentary Proof द्यायचीपण गरज नाही.
आता किती वर्षे हे मिळते हे पण समजून घ्या. जर तुम्ही डिप्लोमा च्या पहिल्या वर्षात एडमिशन घेतलं असेल तर जास्तीत जास्त 3 वर्षे म्हणजे 3 वर्षे गुणिले 50 हजार रुपये म्हणजे एकूण 1 लाख 50 हजार रुपये मिळू शकतात. जर तुम्ही Lateral Entry म्हणजे थेट दुसऱ्या वर्षात एडमिशन घेतलं असेल तर जास्तीत जास्त 2 वर्षे म्हणजे 1 लाख रुपये मिळू शकतात.
आता मित्रांनो हे पैसे DBT म्हणजेच Direct Benefit Transfer पद्धतीने थेट बँक खात्यात येतात. कुठे जायची गरज नाही, कुणाकडे हात पसरायची गरज नाही. निवड झाल्यावर दरवर्षी पैसे थेट खात्यात पडतात.
आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हॉस्टेल चार्जेस आणि मेडिकल चार्जेस साठी वेगळे पैसे तुम्हाला मिळत नाहीत. ५० हजार रुपये हीच एकमेव रक्कम आहे आणि त्यातूनच सगळं भागवायचं आहे. हे सर्वांना माहीत असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का? चला बघूया.
दादांनो ही एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. चला प्रत्येक मुद्दा नीट समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मुलगी असणं आवश्यक आहे. ही स्कॉलरशिप फक्त मुलींसाठीच आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही AICTE Approved कॉलेज मध्ये डिप्लोमा च्या पहिल्या वर्षात किंवा Lateral Entry द्वारे दुसऱ्या वर्षात एडमिशन घेतलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे जे कॉलेज AICTE Approved नाही तिथे शिकत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कॉलेज हे AICTE Approved आहे का हे आधी तपासा.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सर्व स्त्रोतांमधून मिळून 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. यासाठी स्टेट किंवा UT Government ने दिलेलं उत्पनाचा दाखला लागतो. हे सर्टफिकेट नसेल तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे आधीच ते काढून ठेवा.
चौथी गोष्ट म्हणजे फक्त एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो म्हणजे काय ते बघा की जर घरात 3 बहिणी डिप्लोमा करत असतील तर तिघींना मिळणार नाही, फक्त 2 जणींना मिळेल.
म्हणजे तुमच्या घरची परिस्थिती थोडी बेताची आहे, AICTE Approved कॉलेज मध्ये डिप्लोमा करताय आणि उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे तर ही Scholarship तुमच्यासाठीच आहे.
या स्कॉलरशिप ची निवड कशी होते? तर सविस्तर बघूया.
मित्रांनो हे पण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे या स्कॉलरशिप ची निवड पूर्णपणे Merit म्हणजेच गुणवत्तेच्या आधारावर होते.
10वी च्या परीक्षेत म्हणा किंवा सिमिलर असलेल्या परीक्षेत मिळालेल्या गुणानुसार स्टेट आणि UT निहाय मेरिट लिस्ट तयार केली जाते. म्हणजे ज्या मुलीला 10वी मध्ये जास्त मार्क्स मिळाले असतील तिला याचा लाभ मिळण्याची शक्यता जास्त असते.
आता समजा दोन मुलींचे मार्क समान असतील तर काय? तर अशा वेळी आधी वयाचा निकष वापरतात म्हणजे जास्त वय असलेल्या मुलीला प्राधान्य मिळतं. त्यानंतरही समानता असेल तर कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलीला प्राधान्य दिलं जातं.
आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी मुलगी Reserved Category मध्ये येत असेल आणि सामान्य कॅटेगिरी च्या मेरिट लिस्ट मध्ये पण तिचं नाव आलं तर तिला सामान्य कॅटेगिरी मध्येच धरलं जातं.
भारतात एकूण नेमक्या किती Scholarships मिळतात?
हे ऐकलं की खरंच आश्चर्य वाटेल की दरवर्षी एकूण 5000 स्कॉलरशिप दिल्या जातात. या 5000 स्कॉलरशिप राज्य आणि Union Territory निहाय वाटल्या जातात आणि Annexure A नुसार प्रत्येक राज्याचा वाटा ठरवलेला आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी खूप चांगली बातमी आहे. AICTE च्या अधिकृत Annexure A नुसार महाराष्ट्राला 624 स्कॉलरशिप मिळतात. म्हणजे महाराष्ट्रातील 624 मुलींना दरवर्षी या योजनेचा लाभ मिळतो. हा आकडा छोटा वाटत असला तरी दरवर्षी 624 मुलींच्या घरात आनंद येतो हे विसरू नका.
याशिवाय ईशान्य भारतातील बाकीचे राज्ये म्हणजे आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणचा प्रदेश आणि काही Union Territories म्हणजे Andaman Nicobar Islands, Jammu Kashmir, Ladakh, Dadra Nagar Haveli आणि Daman Diu, Lakshadweep या ठिकाणच्या सर्व पात्र मुलींना लाभ दिला जातो. म्हणजे तिथे Quota नाही, सगळ्या पात्र मुलींना याचा लाभ मिळतो.
या स्कॉलरशिप चा लाभ घेण्यासाठीअर्ज कसा करायचा?
मित्रांनो AICTE Pragati Scholarship Yojana 2026 यासाठी अर्ज करणं अगदी सोपं आहे. पण प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या म्हणजे चुका होणार नाहीत.
पहिली गोष्ट म्हणजे National Scholarship Portal म्हणजेच NSP वर जायचं आणि ऑनलाइन अर्ज करायचा आहे. AICTE च्या वेबसाइट वर नोटिस आल्यावर Application Process सुरू होते. नोटिस आली की लगेच अर्ज करा, उशीर करू नका.
दुसरी गोष्ट म्हणजे अर्ज केल्यावर तुमचं कॉलेज म्हणजे Host Institution तुमचा ऑनलाइन एप्लीकेशन ची खात्री करतं. यासाठी कॉलेज शी संपर्कात राहा आणि वेरिफिकेशन झालं का हे वेळोवेळी तपासा.
तिसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर तुमच्या राज्याचा DTE म्हणजे Department of Technical Education दुसऱ्या स्तरावर अप्लिकेशन वेरिफिकेशन करतो. म्हणजे अगदी दोन स्तरांवर डिटेल वेरिफिकेशन होतं.
चौथी गोष्ट म्हणजे Merit List AICTE च्या पोर्टल वर जाहीर केली जाते. जर मेरिट लिस्ट बद्दल काही प्रश्न असेल तर लिस्ट जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत Grievance नोंदवता येतो. एक महिन्यानंतर कोणताही प्रश्न विचारता येत नाही. हर समजून घेणं पण महत्वाचं आहे.
या स्कॉलरशिपसाठी महत्त्वाच्या लिंक्स.
ही स्कॉलरशिप प्रत्येक वर्षी Renewal कसं करायचं?
ही स्कॉलरशिप दरवर्षी रिन्यू करावी लागते. Renewal साठी NSP पोर्टल वर जाऊन पास झाल्याचं सर्टफिकेट किंवा मार्कशीट आणि कॉलेज च्या हेड चं लेटर अपलोड करायचं आहे. हे वेळेत केलं नाही तर पुढच्या वर्षाचे पैसे मिळणार नाहीत.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पुढच्या वर्षात प्रमोट झाला नाहीत म्हणजे नापास झालात तर स्कॉलरशिप बंद होते. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे बँक अकाउंट बाबत. जर अकाउंट नंबर चुकीचं असेल किंवा Invalid असेल तर मेरिट लिस्ट जाहीर झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत तक्रार नोंदवता येते. त्यानंतर या विषयावर विचारणा केली जात नाही.
काही महत्त्वाच्या अटी आहेत त्या पण समजून घेऊ.
बऱ्याचदा असं होतं की अर्ज केल्यावर रिजेक्ट होतो कारण महत्त्वाच्या अटी माहित नसतात. म्हणून या अटी नीट वाचा.
10वी पास झाल्यानंतर आणि डिप्लोमा एडमिशन मधला गैप २ वर्षांपेक्षा जास्त हा कधीच नसावा आणि हो अपूर्ण एप्लीकेशन लगेच रिजेक्ट होतो आणि फक्त Verified Online Applications विचारात घेतल्या जातात. दुसऱ्या कोणत्याही सोर्स कडून म्हणजे इतर कोणतीही स्कॉलरशिप, स्टायपंड किंवा पगार मिळत असेल तर ही स्कॉलरशिप बंद होते आणि मिळालेले सगळे पैसे AICTE ला परत करावे लागतात.
जर CGPA असेल तर Percentage काढण्यासाठी CGPA गुणिले 9.5 हे सूत्र वापरलं जातं. जर मार्कशीट मध्ये CGPA आणि टोटल मार्क्स दोन्ही असतील तर टोटल मार्क्स विचारात घेतले जातात. आणि जर A1 A2 B1 B2 असे Grades असतील तर आधी ते CGPA मध्ये कन्व्हर्ट करायचे मग 9.5 ने गुणायचे.
चला याच एक उदाहरण पाहूया
भावानो सायलीताई या सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहतात त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची. डिप्लोमा करायचं होतं पण फी भरायला पैसे नव्हते. कॉलेज च्या नोटिस बोर्ड वर AICTE Pragati Scholarship Yojana 2026 या बद्दल वाचलं. NSP Portal वर अर्ज केला. 10वी मध्ये 85% होते त्यामुळे मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं. दरवर्षी ५० हजार रुपये थेट खात्यात येतात. आता त्या छान डिप्लोमा करत आहेत.
आता सायलीताई म्हणतात की जर ही स्कॉलरशिप बद्दल मला माहित नसतं तर शिक्षण सोडावं लागलं असतं. आता आमच्या गावातील सगळ्या मुलींना आम्ही सांगतो.
हीच तर या पोस्टची भावना आहे त्यामुळे माहिती जास्तीत जास्त तुमच्या परिवारात मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.
थोडक्यात सांगायचं तर.
AICTE ने सुरू केलेल्या Pragati Scholarship यामध्ये प्रटेक वर्षी ५० हजार रुपये मिळतात. पहिल्या वर्षात एडमिशन असेल तर 3 वर्षांत एकूण 1 लाख 50 हजार रुपये मिळतात. Lateral Entry असेल तर 2 वर्षांत 1 लाख रुपये मिळतात. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. एका कुटुंबातील 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. दरवर्षी एकूण 5000 Scholarships दिल्या जातात ज्यात महाराष्ट्राला 624 Scholarships आहेत. NSP पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. निवड 10वी च्या मेरिट वर होते. स्कॉलरशिप DBT द्वारे थेट बँक खात्यात येते.
या योजनेचा निष्कर्ष समजून घेऊ.
मित्रांनो AICTE Pragati Scholarship Yojana 2026 ही स्कॉलरशिप म्हणजे डिप्लोमा करणाऱ्या मुलींसाठी एक मोठी संधी आहे. पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडायची गरज नाही. दरवर्षी 50 हजार रुपये मिळतात आणि 3 वर्षांत एकूण 1 लाख 50 हजार रुपये मिळू शकतात. हे पैसे थेट बँक खात्यात येतात आणि कुठलाही Documentary Proof द्यायची गरज नसते.
जर तुमच्या घरात, नातेवाईकांमध्ये, गावात कुणी डिप्लोमा करणारी मुलगी असेल आणि घरची परिस्थिती बेताची असेल तर वेळ न दवडता NSP पोर्टल वर अर्ज करा.
आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या आजूबाजूला कुणी डिप्लोमा करणारी मुलगी असेल त्यांना ही पोस्ट नक्की पाठवा. एखाद्या मुलीचं शिक्षण पूर्ण व्हायला तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
AICTE Pragati Scholarship Yojana 2026 म्हणजे काय?
AICTE ने सुरू केलेली ही Scholarship आहे ज्यात डिप्लोमा करणाऱ्या मुलींना दरवर्षी ५० हजार रुपये दिले जातात. Technical Education मध्ये मुलींना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे.
यातून नेमके किती पैसे मिळतात?
दरवर्षी 50 हजार रुपये मिळतात. पहिल्या वर्षी Admission असेल तर 3 वर्षांत एकूण 1 लाख 50 हजार रुपये मिळतात.
लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे?
कुटुंबाचं प्रत्येक वर्षच उत्पन्न सर्व ठिकाणी मिळून 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.
AICTE Pragati Scholarship Yojana 2026 यासाठी अर्ज कुठे करायचा?
National Scholarship Portal म्हणजेच NSP वर Online अर्ज करायचा आहे.
AICTE Pragati Scholarship Yojana 2026 यासाठी निवड कशी होते?
10वी च्या Marks च्या आधारावर Merit List तयार केली जाते आणि त्यानुसार निवड होते.
महाराष्ट्रात एकूण नेमक्या किती Scholarships आहेत?
AICTE च्या Annexure A नुसार महाराष्ट्रात दरवर्षी 624 Scholarships उपलब्ध आहेत.
एकाच कुटुंबातील किती मुलींना याचा लाभ मिळतो?
एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.
AICTE Pragati Scholarship Yojana 2026 Renewal कसं करायचं?
NSP Portal वर Passing Certificate आणि College Head चं Letter Upload करून दरवर्षी Renewal करता येतं.

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
