Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026: तरुणांना दरमहा १० हजार रुपये पर्यंत स्टायपेंड! संपूर्ण माहिती.

भावांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रतेक वर्षी हजारो लाखो युवा शिक्षण पूर्ण करून घराबाहेर बाहेर पडतात त्यांची 12वी झाली ITI झाला डिग्री झाली. पण नोकरी मिळत नाही आणि त्याच कारण एकच आहे त्यांना अनुभव नाही आणि कंपन्या म्हणतात अनुभव द्या तेव्हा नोकरी देतो. आणि तरुण म्हणतो नोकरी द्या तेव्हा अनुभव मिळेल. हा आणि चक्रव्यूह तोडायचा कसा?

आता माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे नाशिकचा त्याच BBA झाला आणि तो 2 वर्षे नोकरी शोधत होता. तो Resume पाठवायचा मुलाखत द्यायचा पण रिजेक्ट व्हायचं. कारण तेच होत कामाचा एक्सपीरियन्स नाही. मग त्याला Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 याबद्दल कळलं. त्याने रजिस्ट्रेशन केलं. एका कंपनीमधे तो मध्ये 6 महिने इंटर्नशिप करत होता आणि सरकार दर महिना 10 हजार रुपये थेट त्याच्या खात्यात टाकत होतं. 6 महिने संपले आणि त्याच कंपनी ने त्याला फुल टाइम जॉब दिला.

त्यामुकेच ही योजना खूप महत्त्वाची आहे आणि आज मी तुम्हाला या योजनेची सर्व डिटेल माहिती सांगणार आहे म्हणजे तुमच्या घरात शेजारी नातेवाईकांमध्ये कुणीही बेरोजगार तरुण असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा म्हणजे ही माहिती त्यांच्या खूप कामात येणार आहे.

ही योजना म्हणजे नक्की काय? हे पण समजून घेऊ

महाराष्ट्र राज्यातील सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने 9 July 2024 रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 ही 2024-25 या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे.

आता थोडक्यात सांगायचं तर शिक्षण पूर्ण केलेल्या युवा मित्रांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढावी यासाठी सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेत तरुणांना 6 महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळते आणि त्या काळात सरकार दर महिना स्टायपंड थेट बँक खात्यात टाकते.

या योजनेच्या माध्यमातून नक्की काय मिळतं? खाली बघूया.

आता हा प्रश्न तर पडणारच. तर सांगतो. या योजनेमधून तुमच्या शिक्षणानुसार दर महिना स्टायपेंड मिळतं म्हणजे तुम्ही 12वी पास असाल तर दर महिना 6 हजार रुपये मिळतात. ITI किंवा डिप्लोमा असेल तर दर महिना 8 हजार रुपये मिळतात. डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर दर महिना 10 हजार रुपये मिळतात.

हे पैसे थेट त्यांच्या DBT म्हणजेच Direct Benefit Transfer पद्धतीने आधार लिंक बँक खात्यात जातात. कुठे जायची गरज नाही कुणाकडे हात पसरायची गरज नाही.

आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 मध्ये 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सर्टफिकेट सुधा मिळतं. म्हणजे अनुभव पण मिळतो आणि सर्टफिकेट पण मिळतं. हे दोन्ही पुढे नोकरीसाठी खूप कामात येतात.

या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का?

चला याचा प्रत्येक मुद्दा समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे वयाची अट यामध्ये तुमचं वय किमान 18 आणि कमाल 35 वर्षे असलं पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाची अट म्हणजे किमान 12वी पास, ITI, डिप्लोमा, डिग्री किंवा पोस्ट ग्रेजुएशन असलं पाहिजे. मात्र शिक्षण अजून चालू असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र नाहीत हे पण लक्षात घ्या, तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे, चौथी गोष्ट म्हणजे Aadhar Card Registration असणे आवश्यक आहे, पाचवी गोष्ट तुमचं बँक अकाउंट हे आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे, सहावी गोष्ट सांगतो कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या पोर्टल वर नोंदणी करून एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन नंबर मिळवलेला असावा.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 चा लाभ एकदाच घेता येतो. त्यामुळे एकदा संधी मिळाली की नीट काम करा.

तुम्हाला कोणत्या कंपनी मध्ये इंटर्नशिप मिळते? हे खाली बघू

हे ऐकून तर तुम्हाला खूपच आनंद होईल या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात Companies सहभागी होऊ शकतात आणि यात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील SME म्हणजे छोटे, मध्यम आणि मोठे उद्योग या योजनेत सहभागी होऊ शकतात

सोबतच शासकीय आणि निमशासकीय तसेच महामंडळे सहभागी होऊ शकतात. DPIIT मध्ये नोंदणीकृत स्टार्टअप सहभागी होऊ शकतात. सहकारी संस्था जसे जिल्हा सहकारी बँका साखर कारखाने सुत गिरणी सहभागी होऊ शकतात. सेवा क्षेत्रातील कंपन्या म्हणजे CA Firm, Law Firm, Media, NBFC, Retail, Insurance, Hospitality, Health, Taxation, Logistics, Tourism अशा अनेक क्षेत्रांत संधी मिळू शकते.

म्हणजे तुमच्या शिक्षणाच्या आणि आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशिप तुम्हाला मिळू शकते. एकाच वर्षात 10 लाख तरुणांना संधी मिळणार आहे.

या योजनेचा अर्ज नेमका कसा करायचा?

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणं अगदी सोपं आहे. पहिली गोष्ट म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता यांच्या पोर्टल वर जायचं आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं.

दुसरी गोष्ट म्हणजे तुमची शैक्षणिक माहिती जस आधार नंबर फोन नंबर बँक अकाउंट डिटेल आणि एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन नंबर भरायचा आहे.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्टल वर उपलब्ध असलेल्या कंपन्यांच्या यादीतून तुमच्या आवडीची आणि शिक्षणाला योग्य अशी कंपनी निवडा.

चौथी गोष्ट म्हणजे निवड झाल्यावर ठरलेल्या ठिकाणी रुजू व्हायचं आणि 6 महिने प्रशिक्षण पूर्ण करायचं.

पाचवी गोष्ट म्हणजे दररोजची ऑनलाईन अटेंडंस कंपनी द्वारे नोंदवली जाते. त्याच्या आधारे दर महिना स्टायपेंड थेट बँक खात्यात येतो.

यो योजनेसाठीच्या महत्वाच्या लिंक्स.

योजनेचा Official GR.लिंक
योजनेची Official वेबसाईटलिंक

स्टायपेंड कधी मिळत नाही? हे तुम्ही जाणून घेणं पण तेवढच महत्वाचं आहे.

हे पण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं की छोट्या चुकीमुळे स्टायपेंड मिळत नाही.

एखाद्या महिन्यात 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्ही गैरहजर असाल तर त्या महिन्याचं स्टायपेंड मिळत नाही. पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेलात तर स्टायपेंड मिळत नाही. कायमस्वरूपी जॉब किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळाल्यास Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 चं प्रशिक्षण थांबतं आणि स्टायपेंड बंद होतं. आधीच NAPS किंवा MAPS अप्रेंटिस पूर्ण केलेले उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत.

यात कंपन्यांसाठी साठी अट काय आहे? खाली प्रत्येक गोष्ट बघू.

मित्रांनो सहभागी होणाऱ्या कंपन्यांमध्ये महाराष्ट्रात कार्यरत असणं हे सर्वात महत्वाचं आणि आवश्यक आहे यात कंपनी ची स्थापना किमान 3 वर्षे जुनी असावी. EPF, ESIC, GST, सर्टफिकेट of Incorporation DPIIT आणि उद्योग आधार रजिस्ट्रेशन असणं हे पण आवश्यक आहे आता कंपनी मधे कमीत कमी 20 कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा या योजनेत सहभागी होऊ शकतात.

त्याचबरोबर प्राइवेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या 10% आणि सर्व्हिस क्षेत्रासाठी 20% उमेदवार प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात.

एक उदाहरण पाहूया.

प्रियांका या कोकणातील एका छोट्या गावातील मुलगी त्याच BA झालाय पण 2 वर्षे त्यांना नोकरी नाही. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 बद्दल कळलं त्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलं. एका NGO मध्ये 6 महिने इंटर्नशिप मिळाली आणि दर महिना 10 हजार रुपये सरकारने खात्यात टाकले. 6 महिने पूर्ण झाले सर्टफिकेट मिळालं आणि त्याच NGO ने तिला फूल टाईम जॉब दिला आहे.

थोडक्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो

मित्रांनो या योजनेचा GR 9 July 2024 रोजी जारी झाला यात वयाची अट 18 ते 35 वर्षे आहे. किमान शिक्षण 12वी पास असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असणे आणि आधार लिंक बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.

तुमच्या शिक्षणानुसार स्टायपेंड मिळतो जस 12वी ला 6 हजार रुपये ITI, डिप्लोमा ला 8 हजार रुपये आणि डिग्री ला 10 हजार रुपये दर महिना थेट बँक खात्यात DBT द्वारे येतात. प्रशिक्षण कालावधी 6 महिने आहे आणि शेवटी सर्टफिकेट मिळतं.

एखाद्या महिन्यात 10 दिवसांपेक्षा जास्त गैरहजर राहिल्यास त्या महिन्याचे स्टायपेंड मिळत नाही. पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडले तरी स्टायपेंड मिळत नाही. हा लाभ आयुष्यात फक्त एकदाच घेता येतो आणि या योजनेत दर वर्षी 10 लाख तरुणांना संधी मिळणार आहे. दर 2 वर्षांनी योजनेचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार बदल केले जातात

या योजनेचा निष्कर्ष बघू.

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांसाठी उचललेलं हे एक खूप मोठं पाऊल आहे करण बर्याच मुलांचं शिक्षण झालं पण अनुभव नाही म्हणून नोकरी नाही या समस्येवर Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 हे एक उत्तम उत्तर आहे. 6 महिने काम शिका स्टायपेंड मिळवा सर्टफिकेट घ्या आणि नोकरी मिळवा.

जर तुमच्या घरात कुणी 18 ते 35 वयाचे शिक्षण पूर्ण केलेले बेरोजगार तरुण असतील तर वेळ न वाया घालता त्यांना या योजनेबद्दल सांगा आणि रजिस्ट्रेशन करायला मदत करा. एक छोटासा अर्ज त्यांचं आयुष्य बदलू शकतो.

आता तुम्ही हे सर्व वाचल तर तुम्हाला या योजनेबद्दल आता माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे की, तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये गावात कुणी बेरोजगार तरुण असेल त्यांना ही पोस्ट नक्की पाठवा. एखाद्या तरुणाला नोकरी मिळवून द्यायला तुम्ही कारणीभूत ठराल आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 म्हणजे नक्की काय?

सरकारची ही योजना आहे ज्यात 18 ते 35 वयाच्या शिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगार तरुणांना 6 महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्या काळात सरकार दर महिना Stipend थेट बँक खात्यात देते.

या योजनेतून तरुणांना किती पैसे मिळतात?

12वी Pass ला 6 हजार रुपये ITI Diploma ला 8 हजार रुपये आणि Degree Post Graduate ला 10 हजार रुपये दर महिना मिळतात.

याचा लाभ घेण्यासाठी वयाची अट काय आहे?

किमान 18 आणि कमाल 35 वर्षे वय असणे आवश्यक आहे यासाठी आवश्यक आहे.

प्रशिक्षण किती महिने असते?

6 महिने प्रशिक्षण असते आणि त्यानंतर Certificate मिळते.

Apply करण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या Portal वर Online Registration करायचे आहे.

याचा लाभ किती वेळा घेता येतो?

हा लाभ आयुष्यात फक्त एकदाच घेता येतो.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2026 मध्ये Stipend कधी मिळत नाही?

एखाद्या महिन्यात 10 पेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिल्यास त्या महिन्याचे Stipend मिळत नाही

Leave a Comment