मुख्यपृष्ठ सरकारी योजना स्कॉलरशिप आमच्याबद्दल संपर्क करा

PMMSY Yojana 2026: मत्स्य व्यवसायासाठी सरकारकडून लाखोंची सबसिडी मिळणार ultimate guide!

pmmsy yojana 2026

आजच्या काळात शेतीसोबत एक चांगला जोडधंदा म्हणून मासेमारी म्हणजेच मत्स्य व्यवसायाकडे खूप लोक वळताना दिसत आहेत, शेतीला एक जोडधंदा हवा म्हणून PMMSY Yojana 2026 ही एक खूप चांगला पर्याय आहे, कारण कमी जागेत आणि कमी वेळेत ह्या धंद्या मधे चांगला नफा होतो म्हणून आता गावाकडे किव्वा ग्रामीण भगत सुद्धा हा धंदा खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि लोकांना या व्यवसायात मदत करावी म्हणून भारत सरकारसुद्धा मत्स्य व्यवसायाला पुढे आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि लोकांना प्रोत्साहन करते आहे.

सरकार अशा लोकांसाठी बऱ्याच योजना राबवत असते आणि त्या सगळ्या योजनांमध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना म्हणजे Pradhan mantri matsya Sampada Yojana किव्वा PMMSY Yojana 2026 ही आहे, या योजनेचा सर्वांत मोठा हेतू हा आहे की लोकांना माश्यांच्या व्यवसायासाठी आधुनिक साधन मिळावी, या योजने अंतर्गत सरकारकडून बायोफ्लॉक (Biofloc), फिश फार्मिंग (माश्यांची शेती), माशांची पैदास केंद्र (Fish Hatchery), शोभिवंत मासे पालन (Ornamental Fish Farming), मासे दुकान (Fish Shop), कोल्ड स्टोरेज (Cold Storage) आणि फीड मिल (Feed Mill) अशा अनेक कामांसाठी लाखो रुपयांची सबसिडी म्हणजे सरकारी अनुदान दिल जाते.

त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा तुमचा नवीन मासे व्यवसाय सुरू करायचा असेल, किंवा समजा तुम्ही आधी पासून हा धंदा करता तर तुमचा आधीचा धंदा अजून मोठा करायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायद्याची असू शकते, बरेच लोक या योजनेचा फायदा घेऊन आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवत आहेत आणि या लेखामध्ये आपण या PMMSY Yojana 2026 योजनेची पूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे बघणार आहे.

PMMSY Yojana 2026 नेमकी काय आहे?

PMMSY Yojana 2026 (PMMSY) ही भारत सरकारच्या मत्स्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेली एक खूप महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे, या योजनेची सुरुवात २०२० मध्ये केली होती, देशातील माश्यांच्या व्यवसायाला एक नवी दिशा देणे, तो व्यवसाय आधुनिक करणे आणि अधिक मजबूत करणे हा यामागचा एक मोठा उद्देश आहे, आपल्या देशात मासेमारी करणाऱ्या लोकांना आणि उद्योग करणाऱ्या लोकांना ह्या व्यवसाया मधून चांगला फायदा व्हावा, यासाठी सरकार या योजनेच्या माध्यमातून चांगला प्रयत्न करत आहे.

या योजने मधून देशातील मत्स्य उत्पादन वाढव आणि आपल्या मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट व्हाव हा या PMMSY Yojana 2026 चा उद्देश आहे. व्यवसायात जास्त फायदा व्हावा म्हणून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याला प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी होताय. आणि या सोबत मासे पकडण्यापासून ते त्यांच्या विक्रीपर्यंत लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा म्हणजे मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पायाभूत तयार करण्यावर सुद्धा ह्या योजने मधे लक्ष दिल जात.

वरील दिलेल्या सर्व गोष्टी होण्यासाठी आणि मच्छीमारांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने या योजनेसाठी तब्बल २०,०५० कोटी रुपयांची मोठी रक्कम मंजूर केली आहे, चांगली गोष्ट म्हणजे या निधी मधील एक खूप मोठा भाग सरळ लाभ घेणाऱ्या माणसांना सबसिडी म्हणजे सरकारी अनुदानाच्या रूपात दिला जातो, यामुळे सामान्य व्यक्तीला सुद्धा पैशांची चिंता न करता आपला माश्यांचा किव्वा मत्स्य व्यवसाय सुरू करण आणि मोठं कारण शक्य होत आहे.

PMMSY Yojana 2026 चा मुख्य उद्देश काय आहे?

PMMSY Yojana 2026 योजनेचा मुख्य उद्देश फक्त subsidy/अनुदान देणे नाही, तर संपूर्ण मत्स्य क्षेत्र विकसित करणे हा आहे.

मत्स्य उत्पादन वाढवणे

देशात अधिक प्रमाणात मासे उत्पादन होण्यासाठी आधुनिक पद्धतींचा वापर वाढवणे.

मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट करणे

लहान मच्छीमार आणि मत्स्य शेती करणाऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

आधुनिक मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन

बायोफ्लॉक, RAS सिस्टम, केज कल्चर, यांसारख्या आधुनिक व्यवसायांना मदत करणे.

रोजगार निर्मिती

ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.

फिशरीज इंफ्रास्ट्रक्चर तयार करणे

कोल्ड स्टोरेज, फिश मार्केट , फीड मिल यांसारख्या सुविधा वाढवणे.

कोण पात्र आहेत?

PMMSY Yojana 2026 ही एक मोठी योजना आहे आणि याचा फायदा अनेक लोकांना घेता येतो:

  • पारंपरिक मच्छीमार लोक, जे समुद्रात किंवा नद्यांमध्ये मासेमारी करतात.
  • जे लोक स्वतःच्या शेतात किंवा जागेत तळे तयार करून मत्स्य शेती करता.
  • बाजारामध्ये मासे विकणारे छोटे मोठे विक्रेते सुद्धा या योजनेचा फायदा घेऊन शकता.
  • महिलांना या योजनेमध्ये चांगले प्राधान्य आणि पात्रता दिलेली आहे.
  • समाजातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील नागरिक याचा फायदा घेऊ शकतात.
  • ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट म्हणजे (SHG गट) सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • मत्स्य व्यवसायाशी संबंधित असलेले वेग वेगळे सहकारी संस्था म्हणजेच Fisheries Cooperative Societies सुद्धा पात्र आहेत.
  • तरुण आणि युवक उद्योजक या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि नवीन उद्योग सुरू करू शकता.
  • मत्स्य व्यवसायात मोठे काम करणाऱ्या खाजगी कंपन्यांनासुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकता.
  • मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या संस्था (FFPO) या योजनेचा मोठा फायदा घेऊ शकतात.
  • समाजातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेमध्ये संधी देण्यात आली आहे.

PMMSY Yojana 2026 योजनेत किती सबसिडी मिळते?

General Category: या मधे प्रकल्प खर्चाच्या ४०% subsidy तुम्हाला दिली जाते.

SC/ST/महिला: या मधे तुम्हाला प्रकल्प खर्चाच्या ६०% subsidy दिली जाते.

ह्या योजने मधून कोणकोणते व्यवसाय करता येतात?

PMMSY Yojana 2026 योजनेत अनेक प्रकारचे व्यवसाय समाविष्ट आहेत.

मत्स्य तलाव बांधणे:

यात प्रति हेक्टर ला जवळ जवळ ७ लाख रुपये खर्च येतो ज्यात General Category साठी ४०% म्हणजे २.८० लाख रुपये आणि SC/ST आणि महिला ना ६०% म्हणजे ४.२० लाख चे सरकारी अनुदान भेटते.

फ्रेश पाण्याची बायोफ्लॉक मत्स्य शेती:

यात जवळ जवळ १४ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो ज्यात General Category साठी ४०% म्हणजे ५.६० लाख रुपये तर SC/ST आणि महिलान साठी ६०% म्हणजे ८.४० लाख पर्यंत चे सरकारी अनुदान दिले जाते.

खऱ्या पाण्याची बायोफ्लॉक मत्स्य शेती:

यात सरासरी १८ लाख रुपयांपर्यंत खर्च येत असतो ज्यात General Category साठी ४०% म्हणजे ७.२० लाख रुपये आणि SC/ST आणि महिलान साठी ६०% म्हणजे १०.८० लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते.

स्मॉल RAS सिस्टम :

RAS मधे तेच पाणी पुन्हा वापरले जाते आणि कमी जागेत जास्त मासे उत्पादन करता येत.

यात सरासरी ७.५० लाख रुपयांपर्यंत खर्च येत असतो ज्यात General Category साठी ४०% म्हणजे ३ लाख रुपये आणि SC/ST आणि महिलान साठी ६०% म्हणजे ४.५० लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते.

मीडियम RAS सिस्टम:

हा प्रोजेक्ट स्मॉल RAS सिस्टम पेक्षा मोठा असतो आणि यात जवळ जवळ २५ लाख रुपयांपर्यंत खर्च येत असतो ज्यात General Category साठी ४०% म्हणजे १० लाख रुपये तर SC/ST आणि महिलान साठी ६०% म्हणजे १५ लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते.

लार्ज RAS सिस्टम:

हा प्रोजेक्ट हा सर्वांत मोठा RAS सिस्टम असतो आणि यात ५० लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, ज्या मधे General Category साठी ४०% म्हणजे २० लाख रुपये तर SC/ST आणि महिलान साठी ६०% म्हणजे ३० लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते. (हा प्रोजेक्ट छोट्या शेतकऱ्या साठी योग्य नाही, मोठे उद्योजक किवा संस्था साठी योग्य आहे)

केज कल्चर:

धरण किंवा तलावात लोखंडी जाळे वापरून मासे पालन करतात.

ह्या प्रोजेक्ट मधे ३ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, ज्या मधे General Category साठी ४०% म्हणजे १.२० लाख रुपये तर SC/ST आणि महिलान साठी ६०% म्हणजे १.८० लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते.

ओर्नमेंटल मत्स्य शेती:

म्हणजे Aquarium मध्ये ठेवले जाणारे सजावटी मासे.

ह्या प्रोजेक्ट मधे सुद्धा ३ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, ज्या मधे General Category साठी १.२० लाख रुपये तर SC/ST आणि महिलान साठी १.८० लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते.

मिनी फिश फीड मिल:

माशांचे खाद्य तयार करण्याचा व्यवसाय.

प्रोजेक्ट खर्च ३० लाख रुपये, ज्या मधे General Category साठी १२ लाख रुपये तर SC/ST आणि महिलान साठी १८ लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते.

कोल्ड स्टोरेज:

मासे साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज बनवणे.

ज्यात १० टन च्या कपैसिटी साठी जवळ जवळ ४० लाख खर्च येतो, त्यानुसार General Category साठी १६ लाख तर SC/ST आणि महिलान साठी २४ लाख चे अनुदान मिळते.

फिश शॉप:

मासे विकण्याचा business सुरू करण्यासाठी अनुदान

प्रोजेक्ट खर्च १० लाख रुपये, ज्या मधे General Category साठी ४ लाख रुपये तर SC/ST आणि महिलान साठी ६ लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते.

बॉट्स आणि नेट्स:

पारंपरिक मच्छीमारांसाठी.

प्रोजेक्ट खर्च ५ लाख रुपये, ज्या मधे General Category साठी २ लाख रुपये तर SC/ST आणि महिलान साठी ३ लाख पर्यंत चे अनुदान दिले जाते.

PMMSY Yojana 2026 योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

PMMSY योजना 2026 साथी हे खालील कागदपत्रे लागतात.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • फोटो
  • जमीन कागदपत्रे
  • प्रकल्प अहवाल (DPR)
  • मोबाईल नंबर
  • मत्स्य व्यवसाय संबंधित परवाने (लागू असल्यास)

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

१. व्यवसाय निवडा

आधी तुम्हाला कोणता प्रोजेक्ट करायचा ते ठरवावे लागते.
उदा: बायोफ्लॉक , फिश पौंड, केज कल्चर , फिश शॉप

२. DPR तयार करा

यात तुमच्या प्रकल्पाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो.

३. फिशरीज ऑफिस मध्ये अर्ज

जिल्हा फिशरीज ऑफिसर कडे अर्ज जमा करावा लागतो.

४. पडताळणी

तुमच्या जागेची आणि कागदपत्रांची तपासणी होते.

५. अप्रूवल

प्रकल्प मंजूर झाल्यावर subsidy/अनुदानाची प्रक्रिया सुरू होते.

तुमचा हिस्सा आणि सबसिडी

  • काही रक्कम स्वतःची
  • काही Bank Loan
  • उर्वरित Government Subsidy

अशा स्वरूपात प्रकल्प पूर्ण केला जातो.

PMMSY Yojana 2026 योजनेतील महत्वाच्या अटी

प्रकल्प खरा असणे आवश्यक

फक्त subsidy घेण्यासाठी खोटा प्रकल्प चालणार नाही.

जागेची उपलब्दात

फिश पोंड किंवा बायोफ्लॉक प्रोजेक्ट साठी जागा आवश्यक आहे.

DPR योग्य असावा

प्रोजेक्ट रिपोर्ट हा योग्य असला पाहिजे.

नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे

सर्व अटींचे पालन केल्या नंतर व सरकारी निरीक्षणानंतरच सबसिडी मिळते.

स्वतःचा हिस्सा आवश्यक

तुम्हाला स्वतः काही हिस्सा प्रोजेक्ट मधे टाकाव लागतो, १००% खर्च सरकार देत नाही.

PMMSY Yojana 2026 योजनेचे फायदे

  • कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो
  • महिलांसाठी मोठी संधी
  • ग्रामीण भागात रोजगार
  • आधुनिक फिश फार्मिंग ला प्रोत्साहन
  • मोठ्या प्रमाणात सबसिडी
  • फिश बिझनेस मध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्याची संधी

महत्त्वाची टिप (PMMSY Yojana 2026)

कोणता प्रोजेक्ट कोणासाठी फायदेशीर आहे?

लहान शेतकरी

फिश पोंड, बायोफ्लॉक, ओर्नमेंटल फिश, हे चांगले आणि सोपे पर्याय आहेत.

तरुण युवा उद्योजक

फिश शॉप, केज कल्चर, फिश फीड बिझनेस, हे चांगले व्यवसाय आहेत.

मोठे उद्योजक

RAS सिस्टम, कोल्ड स्टोरेज, फीड मिल, ह्या मधून मोठ्या प्रमाणात कमाई होऊ शकते.

निष्कर्ष

PMMSY Yojana 2026 ही भारतातील मत्स्य व्यवसायासाठी खूप महत्वाची योजना आहे, या योजनेमुळे छोटे मच्छीमार, युवक, महिला आणि शेतकरी यांना आधुनिक माश्यांचा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी मिळते.

आणि सर्वांत चांगल म्हणजे सरकारकडून ४०% ते ६०% पर्यंत सब्सिडी दिली जाते ज्या मुळे कमी भांडवला मधे सुद्धा मोठा व्यवसाय उभा करता येऊ शकतो, बायोफ्लॉक, मत्स्य शेती, RAS सिस्टम, फिश शॉप, केज कल्चर, कोल्ड स्टोरेज अशा अनेक व्यवसायांसाठी ही योजना खूप जास्त फायद्याची ठरू शकते.

जर तुम्हालाही मत्स्य व्यवसाय सुरू करायचा असेल तर PMMSY Yojana 2026 तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे, योग्य माहिती, योग्य DPR आणि योग्य नियोजन केल्यास या योजनेतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

PMMSY योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

PMMSY Yojana 2026 योजनेचा मुख्य उद्देश हा मत्स्य व्यवसायाचा विकास करणे हा आहे. याचसोबत संपूर्ण भारतातील मच्छीमार आणि मत्स्य शेतकरी यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

PMMSY योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

PMMSY Yojana 2026 योजनेचा लाभ मत्स्य शेतकरी, मासेमारी करणारे कामगार/विक्रेते, महिलांचे बचत गट (SHG), मत्स्य सहकारी संस्था, नवीन तरुण उद्योजक आणि खाजगी कंपन्या घेऊ शकतात. यामध्ये महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (differently abled) व्यक्तींना प्राधान्य दिलेले आहे.

या योजनेअंतर्गत किती सबसिडी (अनुदान) दिली जाते?

सबसिडीचे प्रमाण तुम्ही निवडलेल्या प्रकल्पावर असते, पण या योजने मधे ते दोन भागांत विभागले गेले आहे
सामान्य प्रवर्ग (General Category): यात प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ४०% पर्यंत सबसिडी दिली जाते.
SC / ST / महिला प्रवर्ग: यात प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ६०% पर्यंत सबसिडी दिली जाते.

मी PMMSY योजनेसाठी कसा अर्ज करू शकतो/शकते?

१. नोंदणी: सर्वात आधी मत्स्य व्यवसाय विभागाच्या (Department of Fisheries) अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करा आणि प्रोफाइल तयार करा. २. प्रकल्प अहवाल तयार करा : तुमच्या व्यवसायाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा. ३. अर्ज करा: ऑनलाइन अर्ज भरा, हा अर्ज नंतर स्थानिक आणि राज्य पातळीवरील मत्स्य व्यवसाय विभागाकडून तपासला जातो. ४. पैसे मिळणे: अर्ज मंजूर झाल्यानंतर, मिळणारी सबसिडी थेट बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाते.

मच्छीमारांसाठी काही विमा योजना उपलब्ध आहे का?

हो, PMMSY अंतर्गत मच्छीमारांसाठी वार्षिक अपघात विमा योजना दिली जाते, यामध्ये दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास ५,००,००० रुपये आणि अंशता अपंगत्व आल्यावर २,५०००० रुपये पर्यंत विमा दिला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *