महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आपल्या राज्यामधील 65 वर्ष किंवा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य हेतू वृद्ध नागरिकांना त्यांच्या वयानुसार ज्या कधी अडचणी येतात जसे की अपंगत्व, अशक्तपणा व इतर अडचणी अशा वेळेस त्या मदत करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरु केली आहे. Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजने मधे जे वयस्कर लोक पात्र असतात अश्या नागरिकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू जस चष्मा, श्रवणयंत्र किंवा व्हीलचेअर खरेदी करण्यासाठी ₹3,000 ची मदत दिली जाते याचा हेतू असा आहे की वाढत्या वयात आपल्या घरातील जेष्ठ लोकांना कोणावर अवलंबून राहायची गरज नको आणि त्यांना त्यांचे रोजचे जीवन सुखाने सन्मानाने जगता यावे हाच आहे.
आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर आपल्यासाठी खूप कष्ट केलेले असतात, पण वाढत्या वया मुळे त्यांना थकवा येतो आणि काही ना काही शारीरिक त्रास सुरू होतो त्यात त्यांना कधी व्यवस्थित दिसत नाही, तर कधी नीट ऐकू येत नाही काही जणांना तर चालता येत नाही अशा अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळी उपकरण मिळतात, पण गरिबी किंवा पैशांच्या कमतरतेमुळे अनेक लोकांन असे साधन घेता येत नाही. हीच अडचण दूर करण्यासाठी सरकार पात्र वृद्ध व्यक्तींना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करून मदत करत आहे. Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजनेचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार स्वतः उचलते.
मित्रांनो सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांसाठी आता दिलासादायक ठरत आहे. कारण या योजनेमुळे वृद्ध व्यक्तींना आवश्यक सर्व साधने वेळेवर मिळतात म्हणून त्यांचे रोजचे जीवन अधिक सोपे आणि सुरक्षित होत आहे. म्हटवच म्हणजे या योजनेअंतर्गत दिली जाणारी सर्व आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते, त्यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि लाभ थेट पात्र नागरिकांना मिळतो.
आपण ह्या पोस्ट मधे खालील पॉइंट्स पाहणार आहोत.
योजना काय आहे?
योजनेची उद्दिष्टे
योजने अंतर्गत मिळणारे लाभ
पात्रता व अटी
आवश्यक कागदपत्रे
अर्ज प्रक्रिया
लाभार्थी निवड प्रक्रिया
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
योजनेच्या सूचना
महत्त्वाच्या लिंक्स
निष्कर्ष
FAQ(सतत विचारले जाणारे प्रश्न)
योजना काय आहे?
Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 ही केंद्र सरकारच्या वयोश्री योजने सारखी आपल्या महाराष्ट्राची एक मोठी योजना आहे. या योजनेमधून आपल्या राज्यामधील 65 वर्ष किव्वा यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध लोकांना त्यांच्या अडचणी आणि गरजेनुसार वस्तू खरेदी करण्यासाठी ₹3,000 ची एकरकमी आर्थिक मदत दिली जाते.
हे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय डायरेक्ट पात्र व्यक्तिच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) म्हणजे थेट बँक ट्रान्सफरद्वारे जमा केले जातात. या पैशांमधून आजी-आजोबा चष्मा, श्रवणयंत्र किंवा व्हीलचेअर अशा गरजेच्या वस्तू विकत घेऊ शकतात, किव्वा कोणाला ह्याच्या ऐवजी मानसिक शांति हवी असेल तर त्यासाठी सुद्धा ते ही आर्थिक मदत वापरू शकतात योगा किव्वा मेडिटेशन सेंटर सारखे खर्च यातून करू शकता.
योजनेची उद्दिष्टे
Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजना सुरू करण्याचे मुख्य हेतू.
वृद्ध लोकांना आत्मनिर्भर बनवणे, ज्येष्ठ नागरिकांना कोणाच्याही मदतीची गरज नको असायला आणि त्यांना स्वतःचे काम स्वतः करता यावे आणि त्यांना फिरता बोलता यावे यासाठी मदत करणे.
शारीरिक त्रासांवर उपाय, वाढत्या वयामुळे येणारे त्रास जस अपंगत्व किंवा अशक्तपणा ह्या त्रासांसाठी आवश्यक उपकरणांची मदत करणे.
मानसिक आरोग्य जपणे, म्हातारपणात माणसाची चीड चीड होते म्हणून त्यांच्या मनाच्या शांततेसाठी योगोपचार केंद्र आणि मनःस्वास्थ केंद्रांच्या मदतीने त्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे.
आर्थिक आधार देणे, गरीब वृद्ध नागरिकांना आजारपण किंवा उपकरणांसाठी कोणाकडे पैशे मागावे लागू नये यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे.
योजनेअंतर्गत काय लाभ मिळतात?
Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजने मधे खालील लाभ मिळतात.
- प्रत्येक पात्र वृध्द व्यक्तीला ₹3000 ची मदत दिली जाते.
- त्यांना हव्या त्या वस्तू खरेदी करण्याची सूट दिली जाते या पैशांमधून वृद्ध नागरिक त्यांच्या गरजेनुसार डोळ्यांसाठी, कानासाठी, चालण्यासाठी, बसण्यासाठी किवा दुखापती साठी खर्च करता येतात.
- योगासने आणि मानसिक आरोग्य साठी सरकारमान्य योग केंद्रांमध्ये ते पैसे खर्च करू शकता.
पात्रता व अटी
Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजनेचा फायदा घेण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात.
वयाची अट, अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि त्यांचे वय 65 वर्ष पूर्ण असले पाहिजे.
उत्पन्नाची अट, त्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2 लाखांच्या आत असले पाहिजे.
आधार कार्ड, अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असले पाहिजे जर आधार कार्ड नसेल तर आधार काढल्याची पावती किंवा दुसरे सरकारी ओळखपत्र सुध्दा चालेल.
महिलांसाठी राखीव जागा, या योजने मधे एकूण लाभार्थ्यांपैकी 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहे.
आधी फायदा घेतला नसावा, अर्जदाराने मागील 3 वर्षा मधे दुसऱ्या कोणत्या सरकारी योजने मधून किंवा महानगरपालिकेकडून ती वस्तू मोफत घेतलेली नसली पाहिजे पण समजा जर आधी मिळालेली वस्तू खराब झाली असेल तर नवीन वस्तूसाठी अर्ज करता येईल.
बँक खाते, लाभार्थ्या कडे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे आणि ते आधार कार्डशी लिंक सुद्धा असले पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे (फॉर्मसोबत काय जोडायचे?)
Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 ला अर्ज करताना पुढील कागदपत्रांची झेरॉक्स तुमच्या सोबत ठेवा. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, लाभार्थ्याचे 2 पासपोर्ट साइज़ फोटो, उत्पन्न 2 लाखांच्या आत आहे यासाठी फॉर्मवर सही केलेले पत्र, वयाचा किंवा पेन्शनचा पुरावा, बीपीएल रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना किंवा दुसऱ्या कोणत्या पण सरकारी पेन्शन योजनेचा पुरावा चालेल.
अर्ज प्रक्रिया (फॉर्म कसा भरायचा?)
या योजनेच्या अर्जाची प्रोसेस खालील पद्धतीत आहे.
ह्या योजनेच्या ऑफिशल वेबसाइट ला भेट द्या.
या वेबसाईटवर जाऊन तुमची पूर्ण माहिती, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरा.
त्यानंतर सरकारी आरोग्य विभागाच्या मदतीने गावागावांत आणि शहरांत प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांच्या मदतीने तपासणी शिबिर घेतली जातात तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी योजने च्या मदतीने सुद्धा आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची तपासणी आणि नोंदणी करता.
त्यानंतर फॉर्मची आणि कागदपत्रांची तपासणी झाल्यावर लाभार्थ्याला ऑनलाईन इ टोकन किंवा ऑफलाईन नोंदणी असेल तर पावती दिली जाते.
लाभार्थी निवड प्रक्रिया
फॉर्म भरल्यानंतर योग्य लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी कमिटी तयार करण्यात आली आहे.
- शहरात (महानगर पालिका क्षेत्र): शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त या कमिटीचे अध्यक्ष असतात, तिथले वैद्यकीय अधिकारी आणि समाजकल्याण विभागाचे अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतात.
- गावात (जिल्हा स्तर): ग्रामीण भागात जिल्हाधिकारी (कलेक्टर) या कमिटीचे अध्यक्ष असता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सह अध्यक्ष असतात, आरोग्य अधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी मिळून जे लोक पात्र असतील त्यांची यादी तयार करतात.
सर्व कागदपत्रे बरोबर असले तर समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटवर पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी अपलोड केली जाते.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
100% सरकारी मदत, Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजनेचा पूर्ण पैसा महाराष्ट्र सरकार स्वतः देते.
थेट बँकेत पैसे, दलाल किंवा भ्रष्टाचार टाळण्यासाठी पैसे कोणाच्या हातात न देता सर्व पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होता
लाखो लोकांना लाभ, राज्यातीललाखो ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्याचा सरकारचा हेतू आहे.
महिलांना प्राधान्य, Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजनेच्या एकूण लाभार्थ्यांमध्ये 30% महिला असणे आवश्यक आहे, म्हणजे वृद्ध महिलांना याचा जास्त फायदा होईल.
महत्त्वाच्या सूचना (या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर पैसे परत द्यावे लागतील!)
- 30 दिवसांच्या आत बिल देणे गरजेचे असते बँक खात्यात ₹3000 जमा झाल्यानंतर तुम्हाला लागणारी गरजेची वस्तू खरेदी करायची आहे, त्या नंतर वस्तू खरेदी केल्याचे खरे खुरे बिल 30 दिवसांच्या आत समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागता किंवा पोर्टलवर अपलोड करावे लागतात की तुम्ही खरच त्या पैश्या मधून गरजेची वस्तू घेतली.
- पैसे वसूल केले जातील, जर तुम्हाला पैसे मिळाल्या नंतर 30 दिवसांच्या आत तुम्ही ती वस्तू खरेदी केल्याचे खरे बिल अपलोड केले नाही, तर सरकार तुमच्याकडून ते ₹3000 परत वसूल करेल हे लक्षात ठेवा.
- माहिती खरी असावी, तुम्ही दिलेल्या अर्जा मधे सर्व माहिती आणि तुमच्या उत्पन्नाचा आकडा खरा असला पाहिजे.
महत्त्वाच्या लिंक्स
योजनेचा अधिकृत GR
योजनेची अधिकृत वेबसाइट
निष्कर्ष
Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 ही आपल्या घरातील आजोबा किव्वा आजी आणि राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपच फायदेशीर योजना आहे. त्यांच्या वाढत्या वया मधे त्यांना होणारे त्रास आणि त्या साठी लागणारया वस्तूंसाठी त्यांच्या मुलांकडे किंवा दुसऱ्या कोणाकडे त्यांना पैसे मागता येत नाही, पण आता सरकारच्या ह्या ₹3000 च्या मदतीमुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या साठी चश्मा, कानचे मशीन किंवा चालण्याची काठी स्वतःच्या पैशाने स्वाभिमानाने खरेदी करता येईल, म्हणून जर तुमच्या घरात किंवा शेजारी कोणी 65 वर्ष वयाचे वृद्ध नागरिक असतील तर त्यांना Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजनेबद्दल नक्की सांगा आणि त्यांचा फॉर्म भरायला मदत करा.
FAQ (वारंवार विचारले जाणारे सोपे प्रश्न)
मुख्यमंत्री वयोश्री योजना नक्की काय आहे?
Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे, ज्यामध्ये 65 वर्ष आणि त्या पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र किंवा इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ₹3000 ची रोख मदत दिली जाते.
या योजनेचा फायदा कोणाला मिळू शकतो?
ज्यां लोकांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत अशा लोकांना या योजनेचा चा फायदा मिळू शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न किती असावे?
Mukhyamantri Vyoshree Yojana 2026 योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कुटुंबाच वार्षिक उत्पन्न हे ₹2 लाख किंवा त्यापेक्षा असले पाहिजे.
मिळणारे ₹3000 रुपये हातामध्ये मिळतात का?
नाही हे पैसे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या आधारकार्ड ला लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात.
या पैशातून काय काय खरेदी करता येते?
चष्मा, कानचे मशीन, चालण्याची काठी, व्हील चेअर किव्वा वॉकर, कमोड खुर्ची, आणि गुडघ्या साठी किंवा कंबरेचे बेल्ट ह्या गोष्टी खरेदी करता येतात.
65 वर्षांवरील प्रत्येक महिलेला यात लाभ मिळेल का?
हो, ज्या महिला पात्र असतील आणि सर्व अटी मधे बसतील अशा महिलांना लाभ मिळेल, बाकी या योजनेत 30% जागा खास महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत.
पैसे मिळाल्यावर बिल जमा करावे लागते का?
हो तुम्हाला पैसे मिळाल्यानंतर हवी ती वस्तू घेऊन तिचे बिल तुम्हाला 30 दिवसांच्या आत सरकारी पोर्टलवर अपलोड करावे लागतात.
जर वस्तू खरेदीचे बिल 30 दिवसांत अपलोड नाही केले तर काय होईल?
जर तुम्ही 30 दिवसाच्या आत बिल अपलोड केले नाही, तर सरकार ने दिलेले ₹3000 ते परत घेऊन घेतात.
आधी महापालिकेकडून मोफत चष्मा मिळाला असल्यास पुन्हा अर्ज करता येईल का?
जर मागच्या 3 वर्षांत तुम्ही सारखा लाभ घेतला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही, पण आधी मिळालेली वस्तू खराब झाली असेल तर तुम्हाला लाभ मिळू शकतो.
तक्रार किंवा मदतीसाठी काही संपर्क क्रमांक आहे का?
लाभार्थ्यांच्या मदतीसाठी आणि तक्रारींसाठी सरकार ने 18001208040 हा टोल फ्री नंबर दिला आहे.



