मित्रांनो शेतात काम करताना सगळ्यात मोठा खर्च कोणता असतो तर तो म्हणजे ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीचा. बैलजोडी घेऊन नांगरणी करायची म्हटलं तर वेळ जास्त लागतो आणि मजुरीचा खर्चही वाढत जातो सोबतच हवामान बदलल्यामुळे कमी वेळेत जास्त काम उरकावं लागतं. अशा वेळी ट्रॅक्टर असेल तर काम लवकर होतं
वेळेवर पेरणी होते आणि उत्पन्नही वाढतं, पण नवीन ट्रॅक्टर घ्यायचं म्हटलं की लाखो रुपये लागतात आणि सामान्य शेतकऱ्याला हे परवडणं अवघड होऊन बसतं. याच अडचणीवर उपाय म्हणून सरकारने Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 सुरू ठेवली आहे, ज्याअंतर्गत ट्रॅक्टर आणि इतर शेती यंत्रांच्या खरेदीवर थेट अनुदान मिळतं आणि आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत कोणतीही गोष्ट न लपवता बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कुठेही अडचण येणार नाही.
माझ्या ओळखीचे एक काका आहेत नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहतात आणि त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे आणि आजपर्यंत ते बैलजोडीवरच सगळी कामं करत होते पण पावसाळा जवळ आला की त्यांची खूप धावपळ व्हायची, कारण वेळेवर नांगरणी झाली नाही तर पेरणी उशिरा व्हायची आणि उत्पादनावर परिणाम व्हायचा. मागच्या वर्षी त्यांनी Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 अंतर्गत MahaDBT पोर्टलवर अर्ज केला आणि पात्र ठरल्यावर त्यांना ट्रॅक्टर खरेदीवर जवळपास निम्म्या किमतीचं अनुदान मिळालं. आता त्यांचं नांगरणीचं काम जे आधी आठ दहा दिवस चालायचं ते आता दोन तीन दिवसांत होतं आणि उरलेल्या वेळेत ते शेजारच्या शेतकऱ्यांचं कामही भाड्याने करून देतात त्यामुळे त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. काका नेहमी सांगतात की या एका निर्णयामुळे त्यांचं संपूर्ण शेतीचं गणितच बदलून गेलं.
तुम्हालाही किंवा तुमच्या ओळखीत कोणी शेतकरी असेल जो अजून जुन्या पद्धतीने शेती करतोय आणि यंत्रसामग्रीअभावी अडचणीत आहे, तर ही पोस्ट नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण बरेच शेतकरी बांधव अशा योजना असूनही त्यांच्यापर्यंत माहिती न पोहोचल्यामुळे लाभापासून वंचित राहतात, आणि नंतर वेळ निघून गेल्यावर त्यांना पश्चाताप करावा लागतो.
चला बघूया Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 म्हणजे नक्की काय?
भावांनो ही योजना केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्रात ती राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना या नावाने राबवली जाते आणि ही योजना बऱ्याच वर्षांपासून सुरू असून वेळोवेळी तिच्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत, आणि 2026 मध्येही ती पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीमधील यंत्रांचं प्रमाण वाढवणं आणि यासोबतच प्रति हेक्टर उर्जेचा वापर वाढवणं आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत महागडी यांते सहज पोहोचवणं. केंद्र आणि राज्य सरकार मिळून यासाठी निधी देतात, केंद्राचा वाटा साठ टक्के तर राज्याचा वाटा 40% असतो आणि अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवरून होते.
या योजनेत किती अनुदान मिळतं ते सविस्तर बघूया.
आता Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 अंतर्गत अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक तसेच महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांच्या किमतीच्या 50% अनुदान मिळतं आणि तर इतर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% अनुदान दिलं जातं. फक्त ट्रॅक्टरच नाही तर पॉवर टिलर, अवजारे, यंत्रे,प्रक्रिया संच, काढणी तंत्रज्ञान आणि फलोत्पादन यंत्रांसाठीसुद्धा या योजनेतून अनुदान मिळू शकतं. याशिवाय ज्यांना पूर्ण यंत्र विकत घेणं परवडत नाही अशा शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे बँक आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा सुविधा केंद्रे उभारण्यासाठीही अर्थसहाय्य दिलं जातं जेणेकरून गावातल्या इतर शेतकऱ्यांनाही भाड्याने यंत्रे वापरता येतील. काही ठिकाणी निवडक गावांमध्ये संपूर्ण गावाचं यांत्रिकीकरण करण्यासाठी विशेष निधीही दिला जातो, तसेच कमी यांत्रिकीकरण असलेल्या भागात प्रति हेक्टर मशागतीच्या खर्चासाठीही मदत दिली जाते. बाकीच्या राज्यांसाठी वेगळी तरतूद असून तिथे केंद्राचा वाटा 90% राज्याचा वाटा फक्त 10%, कारण तिथे यांत्रिकीकरणाचं प्रमाण खूपच कमी आहे.
या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे सरकारने वेळोवेळी टेस्टिंग सेंटर्सची संख्या वाढवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना यंत्राचा दर्जा आणि कार्यक्षमता तपासून घेणं सोपं झालं आहे. देशभरात चार प्रमुख फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट्स आहेत एवढच काय तर राज्य कृषी विद्यापीठं आणि आयसीएआर संस्थांमध्येही यंत्रांची चाचणी केली जाते. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्रांचा दर्जा नियंत्रित राहतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण सुधा दिले जातात जेणेकरून नवीन यंत्र कसं वापरायचं आणि त्याची देखभाल कशी करायची हे शेतकऱ्यांना नीट समजेल.
आता तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठीपात्र आहात का ते सविस्तर समजून घेऊ.
पहिली गोष्ट म्हणजे अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर सातबारा उतारा आणि 8अ दाखला असणं आवश्यक आहे आणि संयुक्त मालकी असेल तर इतर मालकांसह संमतीपत्र लागू शकतं.
तिसरी गोष्ट म्हणजे एका शेतकऱ्याला एका वेळी फक्त एकाच मोठ्या यंत्रासाठी म्हणजे एका ट्रॅक्टरसाठी अनुदानाचा लाभ घेता येतो, त्यामुळे आधीच या किंवा यासारख्या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुन्हा यासाठी अर्ज करता येत नाही.
चौथी गोष्ट म्हणजे Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 साठी अर्जदाराचा आधार क्रमांक त्याच्या बँक खात्याशी लिंक असणं बंधनकारक आहे कारण अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होते.
पाचवी गोष्ट म्हणजे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी वेगवेगळे अर्ज केले तरी शासन नियमांनुसार पडताळणी करूनच लाभ दिला जातो, त्यामुळे खोटी माहिती देणं टाळावं. सहावी गोष्ट म्हणजे अर्जदाराचं वय आणि शेतीचं क्षेत्रफळ यानुसारही काही योजनांतर्गत प्राधान्यक्रम ठरवला जातो, त्यामुळे अर्ज भरताना सगळी माहिती अचूक भरणं गरजेचं आहे.
लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात?
कागदपत्रांबद्दल बोलायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड लागतं जे बँक खात्याशी लिंक असलेलं असावं. दुसरी गोष्ट म्हणजे 7/12 उतारा आणि 8अ दाखला लागतो जो जमिनीची मालकी सिद्ध करतो. तिसरी गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असाल तर जातीचा दाखला लागतो. चौथी गोष्ट म्हणजे ज्या अधिकृत डीलरकडून यंत्र खरेदी करायचं आहे त्याचं कोटेशन लागतं. पाचवी गोष्ट म्हणजे केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेने दिलेला त्या यंत्राचा टेस्टिंग रिपोर्ट लागतो कारण विनाचाचणी झालेल्या मॉडेलसाठी अनुदान मिळत नाही. सहावी गोष्ट म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स लागते. जिथे अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. सातवी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो लागतो आणि आठवी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं गरजेचं आहे कारण अर्जाच्या स्टेटसची माहिती sms कळवली जाते.
अर्ज कसा करायचा ते आता स्टेप बाय स्टेप बघूया.
पहिली गोष्ट म्हणजे mahaDBT पोर्टलवर जाऊन शेतकरी विभागात नवीन USER ID आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करायची. दुसरी गोष्ट म्हणजे लॉगिन केल्यावर कृषी विभागाच्या योजनांमध्ये जाऊन यंत्र सहाय्य योजना हा पर्याय निवडायचा. तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये ट्रॅक्टर किंवा जे यंत्र हवं आहे ते निवडून वैयक्तिक आणि शेतीविषयक सगळी माहिती अचूक भरायची आणि जमिनीचं क्षेत्रफळ, पीक पद्धत आणि बँक तपशील यांचा समावेश असतो. चौथी गोष्ट म्हणजे वर सांगितलेली सगळी कागदपत्रे स्कॅन करून स्पष्ट दिसतील अशी अपलोड करायची कारण अस्पष्ट कागदपत्रांमुळे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता असते.
पाचवी गोष्ट म्हणजे अर्ज सबमिट केल्यावर मिळणारा अप्लिकेशन नंबर जपून ठेवायचा कारण याच्याच आधारे पुढे स्टेटस ट्रॅक करता येतो. सहावी गोष्ट म्हणजे अर्ज मंजूर झाल्यावर अधिकृत डीलरकडून यंत्र खरेदी करून त्याचं बिल आणि डिलिव्हरी संबंधित कागदपत्रे पुन्हा पोर्टलवर अपलोड करायची आणि यानंतर संबंधित कृषी अधिकारी प्रत्यक्ष पडताळणी करतात आणि सगळं व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. साधारणपणे ही संपूर्ण प्रक्रिया पंधरा ते तीस दिवसांत पूर्ण होते.
योजनेच्या महत्त्वाच्या लिंक्स
| योजनेचा Official शासन निर्णय (GR) | इथे क्लिक करा |
| योजनेची Official Website | इथे क्लिक करा |
काही महत्त्वाच्या अटी लक्षात ठेवा.
भावांनो 2025-26 पासून लॉटरी पद्धत बंद करून प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य ही नवीन पद्धत लागू करण्यात आली आहे, त्यामुळे अर्ज लवकरात लवकर भरणं फायद्याचं ठरतं. साधारणपणे महाराष्ट्रात अर्जाची विंडो डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात उघडते.
महागड्या गोष्टींसाठी पूर्ण किंमतीच्या प्रमाणात अनुदान मिळेलच असं नाही कारण शासनाने ठरवलेल्या कमाल मर्यादेतच अनुदान दिलं जातं. तसंच अर्ज मंजूर झाल्याशिवाय यंत्र खरेदी करू नये म्हणजे आधी खरेदी करून नंतर अर्ज केल्यास अनुदान नाकारलं जाऊ शकतं. याशिवाय जुने प्रलंबित अर्ज असतील तर त्यांची कागदपत्रे ठरलेल्या मुदतीत अपलोड करणं गरजेचं आहे, अन्यथा तो अर्ज रद्द होऊ शकतो. काही अडचण आल्यास शेतकरी हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत सोमवार ते शुक्रवार संपर्क करू शकतात.
अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला योजनेचं महत्त्व अजून चांगलं समजेल. सोलापूर जिल्ह्यातील एका ताईंनी स्वतःच्या नावावर असलेल्या दोन एकर शेतीसाठी पॉवर टिलरसाठी अर्ज केला होता आणि त्या एकट्याच शेती सांभाळत होत्या मजूर मिळणं त्यांच्यासाठी अवघड होतं कधी कधी मजूर वेळेवर न मिळाल्यामुळे पेरणीला उशीर व्हायचा पण अनुदान मंजूर झाल्यावर त्यांनी पॉवर टिलर घेतला आणि आता त्या स्वतः वेळेवर पेरणी आणि मशागतीची कामं करू शकतात शिवाय गावातल्या इतर लहान शेतकऱ्यांनाही त्या भाड्याने पॉवर टिलर देतात त्यामुळे त्यांना थोडं जास्तीचं उत्पन्नही मिळतं.
आता थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो.
Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजना आहे ज्याअंतर्गत अनुसूचित जाती जमाती अल्प अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना 50% तर इतरांना 40% अनुदान मिळतं अर्ज हा mahaDBT पोर्टलवर ऑनलाईन करावा लागतो 2025-26 पासून प्रथम अर्ज करणाऱ्याला प्राधान्य ही नवीन पद्धत लागू झाली आहे, तर अर्ज विंडो साधारण डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान उघडते.
| घटक | तपशील |
| अनुदान (SC/ST/महिला/अल्पभूधारक) | 50 टक्क्यांपर्यंत |
| अनुदान (सर्वसाधारण प्रवर्ग) | 40 टक्क्यांपर्यंत |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन, MahaDBT पोर्टल |
| अर्ज विंडो | साधारण डिसेंबर ते फेब्रुवारी |
| अनुदान जमा होण्याचा कालावधी | साधारण 15 ते 30 दिवस |
याचा नेमका काय निष्कर्ष सांगतो.
शेती हा आपल्या देशाचा कणा आहे हे तुम्हाला माहितच असेल आणि शेतकऱ्याचं आयुष्य सुकर करणारी अशी योजना असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 मुळे अनेक शेतकरी बांधवांचं आयुष्य खरोखर बदलू शकतं म्हणजे वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो, उत्पादन वाढतं आणि आर्थिक मदतही मिळते फक्त गरज आहे ती योग्य माहिती वेळेवर मिळण्याची आणि कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवण्याची.
आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे की ही माहिती तुमच्या गावातल्या, नात्यातल्या किंवा ओळखीतल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य सोपं होईल.
Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 साठीचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 साठी अर्ज कुठे करायचा?
mahaDBT शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
या योजनेत जास्तीत जास्त किती अनुदान मिळतं?
पात्रतेनुसार 40 ते 50% अनुदान मिळतं.
अर्जासाठी कोणती मुख्य कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ अ दाखला, डीलर कोटेशन आणि टेस्टिंग रिपोर्ट लागतो.
एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त यंत्रांसाठी अनुदान मिळू शकतं का?
एका वेळी फक्त एकाच मोठ्या यंत्रासाठी अनुदान मिळतं.
अर्ज विंडो साधारण कधी उघडते?
साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात अर्ज विंडो उघडते.
अनुदान खात्यात कधी जमा होतं?
यंत्र खरेदी आणि पडताळणीनंतर अनुदान थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होतं, साधारण पंधरा ते तीस दिवसांत.
Tractor Subsidy Yojana Maharashtra 2026 मधे लॉटरी पद्धत अजूनही आहे का?
नाही, 2025/26 पासून प्रथम अर्ज करणाऱ्याला प्राधान्य ही पद्धत लागू आहे.
अर्ज मंजूर होण्याआधी यंत्र खरेदी केलं तर काय होतं?
अशा परिस्थितीत अनुदान नाकारलं जाण्याची शक्यता असते.
कोणत्याही डीलरकडून यंत्र खरेदी करता येतं का?
नाही, केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त टेस्टिंग रिपोर्ट असलेल्या अधिकृत डीलरकडूनच खरेदी करावी लागते.

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
