Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026: हुशार मुलांना थेट अमेरिकेत नासाला जाण्याची संधी! पात्रता, निवड प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती.

भावानो तुमच्यासुद्धा घरामध्ये एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल ज्यांना विज्ञानाची प्रचंड आवड आहे आणि जो सतत काहीतरी नवीन प्रयोग करत असतो आणि शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात दरवर्षी भाग घेतो पण पुढे काय करायचं हे त्याला किंवा तिला कधीच नीट समजत नाही गावाकडच्या शाळेत शिकणाऱ्या अशा हुशार मुलांना नेहमी वाटत राहतं की मोठ्या शहरातल्या मुलांसारखं आपल्यालाही एखादी मोठी संधी मिळावी पण साधनं नसल्यामुळे, पैसे नसल्यामुळे आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ती संधी कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आता महाराष्ट्र सरकारने अशा गुणवंत Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 ही भारी योजना आणली आहे.

माझ्या ओळखीच्या एका काकांचा मुलगा आहे जो बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहतो. दरवर्षी शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात तो काहीतरी वेगळं मॉडेल बनवून आणायचा, कधी सौरऊर्जेवर चालणारा पंखा तर कधी पाण्याच्या पुनर्वापराचं मॉडेल, पण त्या मॉडेलचं पुढे काय होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. काका नेहमी म्हणायचे की पोराला विज्ञानाची खूपच आवड आहे, पण आमच्याकडे साधनं नाहीत, मोठ्या शहरात नेऊन दाखवायला पैसे नाहीत आणि पुढे कुठे संपर्क करायचा हेसुद्धा माहीत नाही. आता ही योजना आल्यावर काकांना कळलं की जर मुलगा तालुका स्तरावर चांगली कामगिरी करेल तर त्याला थेट सायन्स सेंटरला भेट मिळू शकते आणि जर आणखी पुढे गेला तर बंगळूरूच्या इस्रोपर्यंत किंवा अगदी अमेरिकेच्या नासापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो.

सरकारने यावेळी खरोखरच मनापासून विचार करून ही योजना आखली आहे आणि पैशाचीसुद्धा मोठी तरतूद केली आहे, फक्त घोषणा करून सोडून दिलेली नाही. त्यामुळे ज्यांच्या घरात शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांनी ही माहिती नक्की वाचा आणि आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, गावातल्या शिक्षकांना, गरजू कुटुंबांनासुद्धा नक्की शेअर करा.

Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 म्हणजे नक्की काय, हे पण समजून घेऊ

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 6 मे 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळाने 24 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत आधीच मंजुरी दिली होती, आणि हा निर्णय 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधीच जाहीर करण्यात आला होता. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये विज्ञान शिक्षणाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे, आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान अधिक सहज समजावं यासाठी डिजिटल लॅब्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय विचार यांचा शिक्षणात समावेश व्हावा, आणि संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावं हा या योजनेचा मूळ हेतू आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, आणि ही संस्था आधीपासूनच राज्यातील विज्ञान प्रदर्शनांची यंत्रणा म्हणून काम करत आली आहे.

खरं तर महाराष्ट्रात दरवर्षी तालुका असो जिल्हा आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शने भरवली जातातच, यात लाखो विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यातल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना आधीपासूनच बक्षिसं दिली जायची. पण या प्रदर्शनांचं स्वरूप आता पूर्णपणे बदलून जाणार आहे कारण नुसतं बक्षीस देऊन थांबण्याऐवजी आता या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगातल्या मोठ्या वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा एक जागतिक व्यासपीठ मिळणार आहे.

किती संधी मिळतात? चला सर्व बघूया

पहिली गोष्ट म्हणजे तालुका स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना म्हणजे राज्यभरातील 358 तालुक्यांमधून मिळून एकूण 2148 विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या रमन सायन्स सेंटर नागपूर, पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर पुणे किंवा नेहरू तारांगण मुंबई यापैकी एका ठिकाणी भेट देण्याची संधी मिळणार आहे. या भेटीसाठी विद्यार्थी आणि सोबतच्या 20 पर्यवेक्षक किंवा विज्ञान शिक्षकांना मिळून एकूण 2168 व्यक्तींसाठी प्रतिव्यक्ती जास्तीत जास्त 20,000 रुपयांपर्यंत खर्च त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती म्हणजे DPDC मधून केला जाणार आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा स्तरावर निवड झालेल्या एकूण 180 विद्यार्थ्यांना, यामध्ये सर्वसाधारण, दिव्यांग आणि आदिवासी गटातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी दोन्ही येतात त्यांना सोबतच्या 8 पर्यवेक्षक किंवा शिक्षकांसह थेट बंगळूरू येथील इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. या भेटीसाठी प्रतिव्यक्ती जास्तीत जास्त 35,000 रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे, आणि हासुद्धा खर्च जिल्हा नियोजन समितीतूनच केला जाणार आहे.

आता तिसरी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या 51 विद्यार्थ्यांना सोबत जाणाऱ्या 1 शिक्षक असेल 1 शिक्षिका आणि 2 प्रशासकीय अधिकारी मिळून एकूण 55 व्यक्तींना थेट अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थेला भेट देण्याची संधी मिळणार आहे. ही भेट तब्बल 8 दिवसांची असणार आहे आणि यामध्ये विमान प्रवास, व्हिसा खर्च, राहण्याची व्यवस्था आणि तिथला स्थानिक प्रवास खर्च या सगळ्यासाठी प्रतिव्यक्ती जास्तीत जास्त 6 लाख रुपये याप्रमाणे एकूण 55 व्यक्तींसाठी 3 कोटी 30 लाख रुपयांच्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे.

Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 कोण कोण पात्र आहेत समजून घेऊ.

भावांनो इयत्ता सहावी ते आठवीमधील उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी आणि इयत्ता नववी ते बारावीमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी या दोन्ही गटांना या योजनेत सहभागी होता येतं म्हणजे शाळेतल्या जवळपास प्रत्येक इयत्तेतल्या मुलाला यात संधी आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसाधार असेल दिव्यांग आणि आदिवासी या तिन्ही गटातील विद्यार्थ्यांनासुद्धा खास प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे, त्यामुळे कोणतेही मूल यात मागे राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. उदाहरणार्थ राज्यस्तरीय नासा भेटीसाठी निवड करतानासुद्धा प्रत्येक गटातून ठराविक विद्यार्थी घेतले जाणार आहेत प्राथमिक सर्वसाधारण गटातून 17 विद्यार्थी, प्राथमिक दिव्यांग गटातून 4 विद्यार्थी, प्राथमिक आदिवासी गटातून 4 विद्यार्थी, माध्यमिक सर्वसाधारण गटातून 18 विद्यार्थी, माध्यमिक दिव्यांग गटातून 4 विद्यार्थी आणि माध्यमिक आदिवासी गटातून 4 विद्यार्थी, असे मिळून एकूण 51 विद्यार्थी नासा भेटीसाठी निवडले जाणार आहेत.

तिसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याने आपल्या शाळेतून तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणं आवश्यक आहे कारण संपूर्ण निवड प्रक्रिया याच प्रदर्शनांमधून सुरू होते म्हणजे थेट अर्ज करून यात सहभागी होता येत नाही, तर शाळेच्या विज्ञान शिक्षकांमार्फतच विद्यार्थ्यांना यात उतरवलं जातं.

यात निवड कशी होते, चला खाली बघू

पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी शाळेच्या स्तरावर विद्यार्थ्यांनी आपला विज्ञान प्रकल्प तयार करून तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सादर करायचा असतो. यासाठी शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या स्तरावर आधीच समित्या गठित करण्यात आल्या आहेत आणि तालुका स्तरावरील संपूर्ण निवड प्रक्रियेची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे असते.

दुसरी गोष्ट म्हणजे तालुका स्तरावर प्रत्येक गटातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनासाठी होते. राज्यातील एकूण 34 जिल्हे आणि मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण असे तीन विभाग मिळून एकूण 37 ठिकाणी हे जिल्हास्तरीय प्रदर्शन दरवर्षी आयोजित केलं जातं आणि यातील 16 जिल्हे हे आदिवासी जिल्हे म्हणून गणले जातात. जिल्हा स्तरावरील निवड प्रक्रियेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठित करण्यात आलेली आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे जिल्हास्तरीय प्रदर्शनातून उत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनासाठी केली जाते आणि याच राज्यस्तरीय प्रदर्शनातून 51 विद्यार्थ्यांची अंतिम निवड नासा भेटीसाठी होते. ही निवड महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेली विशेष समिती करते, आणि हीच समिती संपूर्ण नासा भेटीचं नियोजनसुद्धा करणार आहे.

या योजनेच्या महत्त्वाच्या लिंक

योजनेची Official Website इथे क्लिक करा
योजनेची Official GRइथे क्लिक करा

महत्त्वाच्या अटी आणि काही गोष्टी यासुद्धा लक्षात ठेवा

भावांनो निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे म्हणजे विद्यार्थ्याने सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पाच्या दर्जावरच पुढची निवड अवलंबून असते आणि कोणतीही शिफारस किंवा ओळख इथे चालत नाही. या शिवाय ही योजना दरवर्षी होणाऱ्या नियमित विज्ञान प्रदर्शन प्रक्रियेशी जोडलेली आहे त्यामुळे यासाठी वेगळा स्वतंत्र अर्ज भरायची गरज नसून शाळेमार्फतच विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेतलं जातं. तालुका आणि जिल्हा स्तरावरील निवडलेल्या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च संबंधित जिल्हा नियोजन समिती म्हणजे DPDC मधून केला जाणार आहे तर नासा भेटीचा संपूर्ण खर्च राज्य शासनाकडून थेट उचलला जाणार आहे. NCRT नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसारच सर्व स्तरांवरील बाल वैज्ञानिक प्रदर्शनांचं आयोजन केलं जाणार आहे, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध राहील.

अशीच एक गोष्ट माझ्या माहितीतल्या एका ताईंच्या मुलीची आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यावरची. लहानपणापासून तिला पाण्याच्या शुद्धीकरणाबद्दल खूप कुतूहल होतं आणि तिने साध्या घरगुती सामानातून एक छोटं फिल्टर मॉडेल बनवलं होतं. या योजनेची माहिती मिळाल्यावर तिच्या शिक्षकांनी तिला तालुका स्तरावरील प्रदर्शनासाठी तयार केलं तिचा प्रकल्प जिल्हा स्तरावरही पोहोचला. आज ती ताई सांगतात की माझी मुलगी कधी मोठ्या शहरातसुद्धा गेली नव्हती पण या योजनेमुळे तिला सायन्स सेंटर बघायला मिळालं आणि आता तिचा आत्मविश्वास पूर्णपणे बदलला आहे ती म्हणते की मला आता खरोखर शास्त्रज्ञ व्हायचं आहे आणि पुढच्या वर्षी थेट नासापर्यंत पोहोचायचं आहे.

आता थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो

तालुका स्तरावर 2148 विद्यार्थ्यांना नागपूर पुणे मुंबई सायन्स सेंटरला भेट देण्याची संधी मिळते तर जिल्हा स्तरावर 180 विद्यार्थ्यांना बंगळूरू इस्रोला भेट आणि राज्य स्तरावर सर्वोत्कृष्ट 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासाला 8 दिवसांची भेट देण्याची संधी मिळते यासाठी एकूण 3 कोटी 30 लाख रुपयांची तरतूद झाली आहे आणि इयत्ता सहावी ते बारावीचे सर्वसाधारण दिव्यांग आणि आदिवासी गटातील विद्यार्थी यासाठी पात्र आहेत आणि संपूर्ण निवड शाळेतून सुरू होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनांमार्फत होते यासाठी वेगळा अर्ज भरायची गरज नाही.

स्तरविद्यार्थी संख्याठिकाणखर्च मर्यादा
तालुका2148नागपूर/पुणे/मुंबई20,000 रुपये
जिल्हा180बंगळूरू इस्रो35,000 रुपये
राज्य51अमेरिका नासा6 लाख रुपये

याचा नेमका निष्कर्ष काय निघतो

खरं सांगायचं तर Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 फक्त एक सहल नाही तर ग्रामीण भागातल्या हुशार मुलांना जगातल्या सर्वात मोठ्या वैज्ञानिक संस्थांचं दार उघडून देणारी संधी आहे. ज्या मुलांच्या घरात कधी परदेश प्रवासाचं स्वप्नसुद्धा बघितलं जात नव्हतं अशा मुलांना आता स्वतःच्या मेहनतीवर आणि गुणवत्तेवर नासापर्यंत पोहोचता येणार आहे आणि हीच खरी या योजनेची ताकद आहे भावांनो पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव मुलांना जास्त शिकवतो आणि याच तत्त्वावर ही योजना उभी आहे.

आता तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे की तुमच्या ओळखीतल्या शाळकरी मुलांपर्यंत असो शिक्षकांपर्यंत आणि पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मूल थेट नासापर्यंत पोहोचेल.

Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ही योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे?

भावांनो ही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ही योजना सुरू केली आहे.

या योजनेसाठी वेगळा अर्ज भरावा लागतो का?

नाही विद्यार्थ्यांना शाळेमार्फत विज्ञान प्रदर्शनात सहभागी करून घेतलं जातं.

Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 साठी कोणत्या इयत्तेतील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात?

इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.

नासा भेटीसाठी किती विद्यार्थी निवडले जातात?

राज्यस्तरीय प्रदर्शनातून सर्वोत्कृष्ट 51 विद्यार्थी नासा भेटीसाठी निवडले जातात.

या योजनेसाठी शासनाने किती निधी मंजूर केला आहे?

Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 यासाठी एकूण 3 कोटी 30 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांना कुठे भेट मिळते?

जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांना बंगळूरू येथील इस्रो केंद्राला भेट मिळते.

दिव्यांग विद्यार्थ्यांना Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 यात वेगळं प्रतिनिधित्व आहे का?

हो, प्रत्येक स्तरावर दिव्यांग गटातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Leave a Comment