मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी समस्या आहे. शेतात फवारा म्हणजेच कीटकनाशक फवारायचं असेल तर माणसं लागतात वेळ लागतो आणि खर्च पण खूप होतो. वर त्या केमिकल चा थेट संपर्क शेतकऱ्यांच्या अंगावर होतो. आणि गावातल्या महिला SHG म्हणजे Self Help Group आणि याला सोपा शब्द म्हणजे बचत गट यामध्ये छोटे छोटे उद्योग महिला करतात पण त्यांना मोठं उत्पन्न मिळत नाही.
आता माझ्या ओळखीच्या एका ताईंचं उदाहरण सांगतो. यवतमाळ जिल्ह्यातील त्या एका छोट्या गावात SHG चालवतात. पूर्वी महिन्याला 3 ते 4 हजार रुपये उत्पन्न. मग त्यांना Namo Drone Didi Yojana 2026 याची माहिती मिळाली. त्यांच्या SHG ला ड्रोन मिळाल आणि पायलट ट्रेनिंग मिळाली. आज त्या आपल्या शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोन ने फवारणी करतात आणि वर्षाला तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत कमाई होते. एका गावातल्या बाईने Drone उडवायला शिकणं हे ऐकूनच किती अभिमान वाटतो ना?
मित्रांनो आज मी तुम्हाला या योजनेची सर्व डिटेल माहिती सांगणार आहे म्हणजे तुमच्या गावात शेजारी नातेवाईकांमध्ये कुणाची SHG असेल तर ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण ही माहिती त्यांच्या खूप कामात येणार आहे.
Namo Drone Didi Yojana 2026 म्हणजे नक्की काय? हे पण समजून घेऊ
भावांनो भारत सरकारच्या कृषी आणिशेतकरी कल्याण मंत्रालयाच्या Mechanization and Technology Division ने 28 October 2024 रोजी या योजनेचे GR सार्वजनिक केले आहेत. ही एक सेंट्रल सेक्टर ची योजन आहे जी DA&FW म्हणजे Department of Agriculture and Farmers Welfare DoRD म्हणजे Department of Rural Development आणि DoF म्हणजे Department of Fertilizers यांच्या एकत्रित प्रयत्नांनी राबवली जाते.
आता या योजनेमध्ये DAY NRLM म्हणजे Deendayal Antyodaya Yojana National Rural Livelihoods Mission यांच्या अंतर्गत महिलांचे जे बचत गट आहेत अश्या गटांना शेतातील फवारणीचे ड्रोन दिले जातात. हे ड्रोन शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करतात आणि यातून SHG ला चांगलं उत्पन्न मिळतं.
आता थोडक्यात सांगायचं तर Namo Drone Didi Yojana 2026 मध्ये सरकार SHG ला ड्रोन देतं ट्रेनिंग देतं आणि त्या ड्रोन ने शेतकऱ्यांची मदत करून SHG ला पैसे मिळतात. हे मॉडल खरंच खूप चांगलं आहे.
या योजनेसाठी सरकार ने किती पैसे दिले? चला सर्व बघूया
हे ऐकलं की खोट वाटतं पण हे खरं आहे. या योजनेसाठी भारत सरकारने तब्बल 1261 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेत 2024-25 ते 2025-26 या कालावधीत एकूण 14,500 निवडक महिला SHG ला ड्रोन दिले जाणार आहेत. म्हणजे 14,500 महिला बचत गट देशभरात ड्रोन सर्विस देणारे बनणार आहेत. हे ऐकलं की खरंच अभिमान वाटतो.
आता ड्रोन साठी नेमकी किती सब्सिडी मिळते?
आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे कारण या योजनेमध्ये SHG ला ड्रोन घेण्यासाठी नक्की किती पैसे द्यावे लागतात चला बघू.
पहिली गोष्ट म्हणजे सेंट्रल फाइनेंशिअल असिस्टेंस यामध्ये ड्रोन च्या एकूण किमतीच्या तब्बल 80% म्हणजेच जास्तीत जास्त 8 लाख रुपये सरकार कडून अनुदान म्हणजेच सबसीडी मिळते.
दुसरी गोष्ट म्हणजे AIF लोन म्हणजेच उरलेली रक्कम यात AIF म्हणजे National Agriculture Infra Financing Facility अंतर्गत लोन म्हणून मिळते.
तिसरी गोष्ट म्हणजे व्याजावरील अनुदान म्हणजे या AIF लोन वर 3% व्याज सूट तुम्हाला वर्षांपर्यंत मिळते ज्यात SHG लोन घेतलं तरी व्याजाचा बोजा खूप कमी असतो.
भावांनो याचा अर्थ असा की Namo Drone Didi Yojana 2026 मध्ये SHG ला स्वतःच्या खिशातून जवळजवळ काहीच द्यावं लागत नाही. हे ऐकलं की खरंच विश्वास ठेवणं कठीण वाटतं पण हे खरं आहे.
या योजनेच्या माध्यमातून ड्रोन पॅकेज मध्ये नक्की काय काय मिळतं?
मेन ड्रोन पॅकेज मध्ये ड्रोन आणि फवारणीची असेंबली, एक बॅटरी सेट, खालच्या बाजूला तोंड असलेला कॅमेरा, ड्युअल चॅनेल फास्ट बॅटरी चार्जर, सहा पोर्ट असलेला बॅटरी चार्जर हब, ॲनेमोमीटर, पीएच मीटर आणि ड्रोन ठेवण्यासाठी बॉक्स मिळतो. त्याचबरोबर एक वर्षाची ऑनसाईट वॉरंटी पण असते.
खुल्या भागांमध्ये चार स्पेअर बॅटरी सेट्स, एक स्पेअर प्रोपेलर चा सेट म्हणजे सहा प्रोपेलर्स, ३ KVA चा पेट्रोल पोर्टेबल जनरेटर, सेंट्रीफ्युगल नोझल, होलो कोन हाय प्रेशर ऑटोमैटिक नोझल, फ्लॅट जेट स्प्रे नोझल, एक एक्स्ट्रा ड्युअल चॅनेल बॅटरी चार्जर आणि एक्स्ट्रा बॅटरी चार्जर हब मिळतो.
प्रशिक्षण पॅकेजमध्ये DGCA मान्यताप्राप्त RPTO कडून रिमोट पायलट सर्टिफिकेट सहित पंधरा दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि शेती कामासाठी जास्तीची ट्रेनिंग मिळते. बचत गटाच्या दुसऱ्या सदस्याला किंवा कुटुंबातील व्यक्तीला पाच दिवसांचे ड्रोन असिस्टंट ट्रेनिंग पण मिळते.
याशिवाय वॉरंटी संपल्यावर पुढे दोन वर्षांचा वार्षिक मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ड्रोनसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पण पॅकेजमध्येच असतो. म्हणजे ड्रोन घेतल्यापासून ते ट्रेनिंग, विमा आणि काळजी घेण्यासाठी सगळं एकाच पॅकेजमध्ये मिळतं.
आता याच प्रशिक्षण कसं असतं? डिटेल मधे बघू
या योजनेत प्रशिक्षण हा खूप महत्त्वाचा भाग आहे. बचत गटातील एका ऐक्टिव व्यक्तीला ड्रोन पायलट म्हणून निवडलं जातं आणि तिला पंधरा दिवसांचं प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण दोन भागांत असतं.
पहिला भाग म्हणजे मेन सिलॅबस. हे १० दिवस DGCA मान्यताप्राप्त रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कडून दिलं जातं. यात ड्रोन रूल्स 2021, ATC प्रोसिजर्स, हवामानशास्त्र, ड्रोनची काळजी, रिस्क आणि सेफ्टी साथीचे मैनेजमेंट, फ्लाइट सिम्युलेटर ट्रेनिंग आणि प्रत्यक्ष ड्रोन उडवणे यांचा समावेश असतो.
दुसरा भाग म्हणजे शेतीसाठी लागणार ट्रेनिंग. हे पाच दिवस ड्रोन तयार करणारी कंपनी म्हणजे OEM कडून दिलं जातं. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक फ्लाइट ट्रेनिंग, इमर्जन्सी साठी लागणारी हँडलिंग, बॅटरी ला लागणारे मॅनेजमेंट, काळजी व दुरुस्ती, आणि लीड खत कंपनी कडून खते व कीटकनाशके फवारण्याचं प्रशिक्षण असतं.
ड्रोन पायलट साठी पात्रता काय? हे माहित असणे आवश्यक आहे.
बचत गटातील तो व्यक्ती ऐक्टिव सदस्य असणं आवश्यक आहे आणि त्याचे वय किमान १८ ते ५० वर्षे यामध्ये असायला पाहिजे. कमीत कमी दहावी पास असणं आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावं आणि DGCA मान्यताप्राप्त संस्थेत टर्निंग घेण्याची त्यांची तयारी असावी.
ड्रोन असिस्टंट साठी वय १८ ते ५० वर्ष, कमीत कमी दहावी पास, आणि इलेक्ट्रिकल, फिटिंग व मेकॅनिकल कामात रुची असणं आवश्यक आहे. बचत गट मधले व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्ती म्हणजे मुलगा, नवरा किंवा मुलगी ट्रेनिंग घेऊ शकते करण हा असिस्टंट ड्रोन उडवत नाही, पण मेंटेनन्स करतो आणि पायलटला मदत करतो.
यामध्ये महत्वाचा प्रश्न म्हणजे बचत गटाची निवड कशी होते? चला बघू
मित्रांनो यामध्ये राज्यस्तरीय समिती ही बचत गटांची निवड करते. क्लस्टर निवडताना १० ते १५ गावांचा एकत्रित परिसर असावा. १ हजार ते १२०० हेक्टर क्षेत्रात कापूस, भात, ऊस, मिरची, गहू अशी पीक असावीत. कस्टम हायरिंग करणारे सेंटर चालत असलेले आणि मोठे FPO असलेले क्लस्टर यांना प्राधान्य दिलं जातं.
निवड झाल्यावर लीड खताची कंपनी ड्रोन खरेदी करते, बचत गटाशी MOU करते आणि ड्रोनची मालकी ही बचत गटाला दिली जाते. महाराष्ट्रात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड म्हणजेच RCF ही स्टेट लेव्हल लीड खताची कंपनी आहे.
Namo Drone Didi Yojana 2026 साथी महत्त्वाच्या लिंक्स
याच्या माध्यमातून एकूण किती उत्पन्न मिळू शकतं?
आता या योजनेच्या GR नुसार १ बचत गट वर्षाला कमीत कमी २ हजार ते २.५ हजार एकर क्षेत्रावर ड्रोन फवारणी देण्याचं टार्गेट ठेवतो. यातून वर्षाला १ लाख रुपयांपर्यंत जास्तीचे उत्पन्न मिळू शकतं.
1 ड्रोन पायलट आणि 1 असिस्टंट दोघं मिळून देशभरात ३० हजार महिलांना थेट रोजगार मिळणार आहे. लीड खताच्या कंपन्या नॅनो फर्टिलायझर फवारणीसाठी नियमित काम देतात, त्यामुळे बचत गटाला वर्षभर काम मिळतं.
यातून शेतकऱ्यांना काही फायदा होतो का?
मित्रांनो ही योजना फक्त महिलांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण वेळेची बचत होते. माणूस लौन केलेल्या फवारणीपेक्षा ड्रोनने खूप कमी वेळात जास्त एरिया कव्हर होतो. दहा माणसं एक दिवसात जे काम करतात ते एक ड्रोन काही तासांत करतो.
यामुळे पाण्याची बचत देखील होते. ड्रोन फवारणीत पाण्याचा वापर खूप कमी असतो.
त्याचबरोबर आरोग्य सुरक्षित राहतं. ड्रोनने फवारणी केल्यावर केमिकलचा थेट संपर्क शेतकऱ्यांना होत नाही, त्यामुळे पॉयझनिंगचा धोका नाही.
नॅनो युरियाचा फायदा मिळतो. ड्रोनने नॅनो युरिया फवारल्यावर ते जास्त इफेक्टिव्ह होतं. पारंपरिक युरियावरील अवलंबित्व कमी होतं.
शेतकऱ्यांच पीक उत्पादन वाढतं. डिटेल फवारणीमुळे पीक वाढतं आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो.
आता याच एक उदाहरण पाहूया
रेखाताई या विदर्भातील एका गावच्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. आधी त्यांचा बचत गट पापड आणि लोणचं बनवायचा, पण उत्पन्न खूप कमी होतं. नमो ड्रोन दीदी योजनेबद्दल कळल्यावर त्यांनी अर्ज केला. राज्यस्तरीय समितीने त्यांच्या बचत गटाची निवड केली. RCF ड्रोन पॅकेज दिलं. DGCA मान्यताप्राप्त संस्थेत पंधरा दिवसांचं ट्रेनिंग झालं. रिमोट पायलट च सर्टिफिकेट मिळालं. आता रेखाताई ड्रोन दीदी आहेत.
आज त्या आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोनने कीटकनाशके आणि नॅनो युरिया फवारतात. वर्षाला १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. बचत गटाच्या दुसऱ्या सदस्याने ड्रोन असिस्टंट ट्रेनिंग घेतलं आहे. आता दोघी मिळून काम करतात आणि स्वाभिमानाने जगतात.
रेखाताई म्हणतात मला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की एक दिवस मी ड्रोन उडवीन. या योजनेने आमचं आयुष्यच बदलून टाकलं. आता आमच्या गावातील सगळ्या बचत गटांना आम्ही सांगतो. हीच या पोस्टची भावना आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त पसरवा.
थोडक्यात सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी
Namo Drone Didi Yojana 2026 चा GR 28 ऑक्टोबर 2024 रोजी जारी झाले. एकूण निधी 1261 कोटी रुपये आहे. 14500 महिला बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहेत. ड्रोन सबसिडी ८०% म्हणजे जास्तीत जास्त ८ लाख रुपये मिळते. AIF कर्जावर ३% व्याज सबव्हेन्शन सात वर्षांपर्यंत मिळते. ड्रोन पायलटला पंधरा दिवस आणि ड्रोन असिस्टंटला पाच दिवस ट्रेनिंग मिळते. वर्षाला १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. ३० हजार महिलांना थेट रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्रात RCF ही लीड फर्टिलायझर कंपनी आहे.
| विषय | तपशील |
|---|---|
| एकूण निधी | 1261 कोटी रुपये |
| कालावधी | 2024-25 ते 2025-26 |
| एकूण लाभार्थी बचत गट | 14,500 |
| सरकारी अनुदान | 80 टक्के (जास्तीत जास्त 8 लाख रुपये) |
| AIF कर्जावर व्याज सवलत | 3 टक्के (7 वर्षांपर्यंत) |
| पायलट ट्रेनिंग कालावधी | 15 दिवस |
| असिस्टंट ट्रेनिंग कालावधी | ५ दिवस |
| पायलट वयोमर्यादा | 18 ते 50 वर्षे |
| किमान शिक्षण | १०वी पास |
| वॉरंटी | 1 वर्ष ऑनसाईट |
यातून काय निष्कर्ष निघतो.
मित्रांनो Namo Drone Didi Yojana 2026 ही एक खूप मोठी आणि ऐतिहासिक योजना आहे. एकीकडे ग्रामीण महिला बचत गटांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळते. दुसरीकडे शेतकऱ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा फायदा मिळतो. आणि हे दोन्ही एकाच योजनेतून साधलं जातंय हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
जर तुमच्या गावात किंवा नातेवाईकांमध्ये कुणाचा महिला बचत गट असेल तर त्यांना नमो ड्रोन दीदी योजनेबद्दल नक्की सांगा. स्टेट मिशन डायरेक्टर किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधा आणि या योजनेत सहभागी व्हा.
तुम्ही हे वाचलंत तर तुम्हाला माहित आहे, आणि ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या आजूबाजूला गावात कुणाचा बचत गट असेल त्यांना ही पोस्ट नक्की पाठवा. एखाद्या महिलेला ड्रोन पायलट बनवायला तुम्ही कारणीभूत ठराल, आणि यापेक्षा मोठं समाधान काय असेल?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Namo Drone Didi Yojana 2026 म्हणजे काय?
भारत सरकारची ही Central Sector Scheme आहे ज्यात DAY NRLM अंतर्गत Women SHG ला Drone दिले जातात. SHG या Drone ने शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी सेवा देतात आणि त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळवतात.
या योजनेमध्ये किती सब्सिडी मिळते?
ड्रोन च्या एकूण किमतीच्या 80% म्हणजेच जास्तीत जास्त 8 लाख रुपये सरकारी अनुदान मिळतं.
या योजनेसाठी नेमक्या किती बचत गट निवडल्या जाणार?
2024 ते 25 ते 2025 ते 26 या काळात एकूण 14,500 महिला बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहेत.
यासाठी ट्रेनिंग किती दिवस असते?
ड्रोन पायलट ला 15 दिवस ट्रेनिंग आणि असिस्टेंट ला 5 दिवस ट्रेनिंग दिली जाते.
Namo Drone Didi Yojana 2026 मधून SHG ला किती उत्पन्न मिळू शकतं?
यामध्ये वर्षाला 1 लाख रुपयांपर्यंत जास्तीचे उत्पन्न मिळू शकतं.
यात ड्रोन पायलट कोण होऊ शकतं?
वय 18 ते 50 वर्षे आणि 10वी Pass मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि महिला बचत गटामध्ये सामील असणारा होऊ शकते.
महाराष्ट्रात Namo Drone Didi Yojana 2026 साठी Lead Fertilizer Company कोणती आहे?
महाराष्ट्रात Rashtriya Chemicals and Fertilizers Limited म्हणजेच RCF ही Lead Fertilizer Company आहे.
या योजनेसाठी संपर्क कुठे करायचा?
State Mission Director DAY NRLM किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे

मी तेजस्विनी भोसले, माझी exam (Majhiexam.com) ची लेखिका. महाराष्ट्रातील सरकारी योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक माहिती सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे. विविध अधिकृत व सार्वजनिक स्रोतांचा अभ्यास करून, सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत योजनांची अचूक माहिती देणे, हेच माझे ध्येय आहे.
